मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Weight Loss Simple Steps: New Year Party साठी वजन कमी करायचंय? फॉलो करा या तीन सोप्या स्टेप्स

Weight Loss Simple Steps: New Year Party साठी वजन कमी करायचंय? फॉलो करा या तीन सोप्या स्टेप्स

Weight Loss Easy And Simple Steps: वजन कमी करण्यासाठी या तीन स्टेप्स फॉलो करणं फायद्याचं ठरेल.

Weight Loss Easy And Simple Steps: वजन कमी करण्यासाठी या तीन स्टेप्स फॉलो करणं फायद्याचं ठरेल.

Weight Loss Easy And Simple Steps: वजन कमी करण्यासाठी या तीन स्टेप्स फॉलो करणं फायद्याचं ठरेल.

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर:  एखादी पार्टी किंवा कौटुंबिक समारंभासाठी तुम्हाला वजन कमी (Weight Loss Tips) करायचं आहे का? तुम्ही पक्कं ठरवलं तर लवकरात लवकर वजन कमी ( Weight Loss) करू शकता; पण त्यासाठी काही उपाय करावे लागतील. यासाठी तुम्हाला काही फिटनेस टिप्स ( fitness tips) लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. 'ओन्ली माय हेल्थ डॉट कॉम'ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

शरीराने फिट राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम ( exercise) करण्याचा संकल्प अनेक जण नवीन वर्षात करीत असतात. परंतु वर्ष संपायला अजून एक महिना बाकी आहे. त्यामुळे तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचा फिटनेस प्रवास आताच सुरू करू शकता. नवीन वर्षात विविध कार्यक्रम आणि पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत असतं. यामध्ये तुम्हाला वेगळं दिसायचे असेल, तर स्वतःला फिट बनवण्यासाठी काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे. तुम्ही काही सोप्या मार्गांनी वजन कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला 3 महत्त्वाच्या स्टेप्स ( important steps) फॉलो कराव्या लागतील. नवीन वर्ष येण्यापूर्वीच फिट होण्यासाठी 3 सोप्या स्टेप्सवर चर्चा करू. लखनौ येथील केअर इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सेसमधील एमडी फिजिशियन डॉ. सीमा यादव (Seema Yadav) यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

हेही वाचा-  महिलांच्या अंडरवेअरमध्ये असतो गुप्त खिसा?, आतापर्यंत महिलांनाही माहित नसेल त्यामागचं महत्त्व

 डॉक्टरांच्या मते, तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर आठवड्यातून अर्धा किलो वजन कमी करायला हरकत नाही. याचाच अर्थ तुम्ही एका महिन्यात दोन ते तीन किलो वजन सहज कमी करू शकाल. एका महिन्यात 2 ते 3 किलो वजन कमी करणं सुरक्षित मानलं जातं. कमी वेळेत जास्त वजन कमी करण्याचा विचार केला तर शरीराच्या अवयवांवर वाईट परिणाम होऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी या तीन स्टेप्स फॉलो करणं फायद्याचं ठरेल.

- वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात आवश्यक ते बदल करावे लागतील. तुमच्या आहारात एखादी भाजी किंवा फळ नक्कीच समाविष्ट करा. तसंच दररोज किमान 8 ग्लास पाणी प्यावं. तुम्हाला आवडत असणारे कोणतेही 2 स्नॅक्स पदार्थ खाणं टाळा. तसा नियमच स्वतःच्या आहाराबाबत बनवा.

- नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी फिट होण्यासाठी दररोज किमान 15 मिनिटांचा व्यायाम करा. या 15 मिनिटांच्या वर्कआउटमध्ये 2 मिनिटं वॉर्म अप, 5 मिनिटं योगासन, 3 मिनिटं दीर्घ श्वास घेणं, उर्वरित 10 मिनिटांत कार्डिओ, पुश-अप्स, अॅब्ज एक्सरसाइज करता येईल. महिनाभर व्यायाम करून तुम्ही ३ किलोपेक्षा जास्त वजन कमी करू शकणार नाही; पण यामुळे पूर्वीपेक्षा अधिक पावलं चालण्याची क्षमता वाढणं, स्लीपिंग पॅटर्न सुधारणं, मूड स्विंगची समस्या कमी होणं, तणाव कमी होणं, मन शांत राहणं असे फायदे तुम्हाला होतील.

हेही वाचा-  3 पत्नींची 'ती' इच्छा पूर्ण करण्यासाठी नवऱ्याने Government job चाही दिला राजीनामा; कारण ऐकून बॉसही हैराण

 - वजन कमी करण्यासाठी दररोज किमान 10 हजार पावलं चाललं पाहिजे. 10 हजार पावलं चालायला साधारपणे 20 ते 30 मिनिटांचा वेळ लागतो. 10 हजार पावलं म्हणजे जवळपास 2.5 किलोमीटर अंतर होय. नवीन वर्षात तुम्हाला फिट दिसायचं असेल, तर सकाळी उठून चालायला सुरुवात करा. आठवडाभरात तुम्हाला स्वतःमध्ये फरक जाणवेल.

पोटावरची चरबी घटवणं थोडेसं कठीण काम आहे; पण या काही ट्रिक्स आहेत, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. तुम्ही दिवसभरात काय खाता, किती वेळ व्यायाम करता, या सर्व गोष्टी वजन कमी करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.

First published:

Tags: Weight loss, Weight loss tips