मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

घरी सहज वजन कमी करायचय? या 4 गोष्टी पाण्यात मिसळून प्या, महिन्याभरात दिसेल परिणाम

घरी सहज वजन कमी करायचय? या 4 गोष्टी पाण्यात मिसळून प्या, महिन्याभरात दिसेल परिणाम

जर तुम्ही वजन कमी करण्याचे काही सोपे उपाय शोधत असाल तर या टिप्स तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. या काही गोष्टी पाण्यात मिसळून प्यायल्याने तुमचे वजन सहज आणि कोणतेही नुकसान न होता कमी होऊ लागते.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 11 ऑगस्ट : निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे. हे केवळ तुमची पचनक्रिया उत्तम कार्य करण्यास मदत करत नाही तर तुम्हाला हायड्रेटेडदेखील ठेवते. यामुळे तुम्हाला एनर्जी मिळते, तुमची त्वचा चांगली राहते, गॅसची समस्या दूर राहते आणि वजन कमी करण्यासही मदत होते. इटधिसनॉटदॅटच्या मतानुसार, कधी कधी आपल्याला तहान लागत नाही आणि पाण्याची गरजही भासत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही काही गोष्टी पाण्यात मिसळून प्यायल्या तर त्याही तुम्हाला वारंवार पाणी पिण्यास भाग पाडतील आणि तुम्ही वजनही झपाट्याने कमी करू शकाल. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. या गोष्टी पाण्यात मिसळून प्या लिंबू लिंबामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. हे सामान्य पाण्याला चव देते. ज्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा पाणी प्यावेसे वाटते. एवढेच नाही तर संशोधनात असे आढळून आले आहे की, व्हिटॅमिन सी आणि डेलामोनाइटच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये वजन वाढण्याची समस्या सामान्य आहे. लिंबामध्ये हे दोन्ही घटक आढळतात. जर तुम्ही लिंबू पाण्यात मिसळून प्यायले तर तुम्हाला फायदा होऊ शकतो.

Weight Loss v/s Fat Loss : वेट लॉस आणि फॅट लॉसमध्ये आहे मोठा फरक; तुम्ही या चुका तर करत नाही ना?

काकडी काकडी हलकी आणि कुरकुरीत असते जी वजन कमी करण्यासाठी काम करते. जर तुम्ही काकडी पाण्यात टाकून पिली तर तुम्ही सहज वजन कमी करू शकता. काकडीत कॅलरीज कमी असतात आणि त्यात भरपूर पाणी असते. याच्या सेवनामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि त्यातील कॅलरी कमी असल्याने तुम्ही वजन कमी करण्यासाठी याचा वापर करू शकता. पुदिना पुदिन्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि पचन सुधारण्यासही मदत होते. तसेच ते भूक कमी करण्याचे काम करते. संशोधनात असे आढळून आले आहे की लठ्ठपणाची समस्या याच्या सेवनाने कमी होऊ शकते आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही पुदिन्याचे सेवन पाण्यासोबत करू शकता. Running Benefits : वजन कमी करण्यासाठी रोज इतके किलोमीटर धावा; अनेक आजारांपासूनही राहाल दूर सफरचंद आणि बेरी फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने जर तुम्ही सफरचंद आणि बेरीचे तुकडे पाण्यात टाकून ते दिवसभर प्यायले तर तुमचे पोट भरलेले राहील आणि तुम्ही याच्या अप्रतिम चवीमुळे पाणी पुन्हा पुन्हा प्याल.
First published:

Tags: Drink water, Lifestyle, Weight loss tips

पुढील बातम्या