मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /एक तेल फायदे अनेक; हिवाळ्यातील प्रत्येक समस्येवर रामबाण आहे हे ऑईल

एक तेल फायदे अनेक; हिवाळ्यातील प्रत्येक समस्येवर रामबाण आहे हे ऑईल

हिवाळ्यातील बहुतेक समस्यांपासून मिळवण्यासाठी या तेलाचा वापर करण्याचा सल्ला आयुर्वेदामध्ये देण्यात आला आहे.

हिवाळ्यातील बहुतेक समस्यांपासून मिळवण्यासाठी या तेलाचा वापर करण्याचा सल्ला आयुर्वेदामध्ये देण्यात आला आहे.

हिवाळ्यातील बहुतेक समस्यांपासून मिळवण्यासाठी या तेलाचा वापर करण्याचा सल्ला आयुर्वेदामध्ये देण्यात आला आहे.

  मुंबई, 07 जानेवारी : सध्या हिवाळा ऋतू (Winter Season) सुरू असून हवेमध्ये गारवा वाढला आहे. हिवाळ्यात शरीर उबदार रहावं यासाठी आपलं शरीर अधिक उर्जेचा वापर करतं. उर्जानिर्मितीसाठी आणि चयापचय क्रियेचा वेग वाढविण्यासाठी अधिक पोषक तत्वांची आवश्यकता असते (Winter health problem). याशिवाय हिवाळ्यात आपली रोगप्रतिकार शक्ती काहीशी कमकुवत होते. हिवाळ्यात शरीराला अनेक प्रकारचे त्रास जाणवतात (Winter health care tips) . थंड वातावरणामुळे आपली त्वचा (Skin), केस (Hairs) आणि हाडांवर (Bones) परिणाम होतो. ज्यांचं हाड काही काळापूर्वी फ्रॅक्चर (Fracture) झालं आहे किंवा कधीतरी हाडांना दुखापत झाली आहे, अशा व्यक्तींना तर हिवाळ्यात जास्त त्रास होतो. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांनादेखील हिवाळ्यात अंगदुखी आणि सांधेदुखी (Joint pain) जास्त प्रमाणात जाणवते. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अक्रोडाच्या तेलाचा (Walnut oil) वापर करण्याचा सल्ला आयुर्वेदामध्ये (Ayurveda) देण्यात आला आहे.

  हेल्थशॉट्स डॉट कॉमनुसार अक्रोड खाल्ल्यानं हाडं मजबूत होतात हे तर आपल्याला माहिती असेलच. याशिवाय अक्रोड तेलामध्येही अनेक औषधी गुणधर्म असतात. या तेलाचा मसाज हाडांसाठी खूप फायदेशीर असतो. थंडीच्या ऋतूमध्ये एखाद्या व्यक्तीच्या जुनाट दुखापतीनं डोकं वरती काढलं असेल तर उन्हात बसून अक्रोड तेलानं मालिश करावी. यामुळे दुखण्यापासून आराम मिळतो. वेबमेडनं दिलेल्या (WebMed) वृत्तानुसार, एक चमचा अक्रोड तेलामध्ये 120 कॅलरीज आणि 14 ग्रॅम फॅट्स असतात, तर प्रोटिन, कार्बोहायड्रेट, फायबर आणि शुगरचं प्रमाण शून्य टक्के असतं. अक्रोड तेल हे व्हिटामिन के, व्हिटामिन ई, कोलीन, फॉस्फरस, झिंक यांचा पोषक घटकांचा चांगला स्रोत आहे. त्यात सेलेनियम (Selenium) या अँटिऑक्सिडंटचं (Antioxidant) प्रमाणही जास्त असतं. सेलेनियम हेल्दी थायरॉइडच्या कार्यास मदत करतं. यामुळे कॉग्निटिव्ह डिक्लाईन, हार्ट डिसीज आणि कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.

  हे वाचा - हिवाळ्यातही त्वचा राहील मुलायम, चमकदार; घरच्या-घरी संत्र्याचा असा करा वापर

  अक्रोड तेलाचा वापर केल्यामुळे केसांच्या विविध समस्यांपासून सुटका मिळू शकते. हिवाळ्यात आपले केस खूप ड्राय होतात. या समस्येवर अक्रोड तेल प्रभावी ठरतं. कारण, अक्रोड तेलामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड (Omega 3 fatty acids) असतं त्यामुळे केस गळती थांबते आणि केसांचा कोरडेपणा नाहीसा होतो. या तेलामध्ये नैसर्गिक अँटी-डँड्रफ (Anti-dandruff) गुणधर्म असतात, जे तुम्हाला निरोगी स्कॅल्प राखण्यात मदत करू शकतात. हे तेल केवळ केसांतील घाण आणि डेड सेल्सच काढून टाकत नाही तर केसांना मजबूत देखील करतं.

  अक्रोड तेलातील अल्फा लिनोलेनिक अॅसिड (alpha linolenic acid) नावाचं ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतं. हे अॅसिड शरीरासाठी चांगलं असतं. यामुळे कोलेस्ट्रॉल (Cholesterol) कमी होण्यास मदत होते. परिणामी, हार्ट डिसिज होण्याचा धोका जवळपास 10 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. त्यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये अक्रोड तेलाचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. याशिवाय अक्रोड तेलामुळं स्मरणशक्तीदेखील चांगली होते.

  हिवाळ्याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या त्वचेवर होतो. अशावेळी अक्रोड तेलामध्ये असलेले पोषक घटक त्वचेच्या आरोग्यासाठी फार उपयुक्त असतात. आपल्या शरीरात काही एएलए (ALA) ओमेगा-3 फॅटी अॅसिड दीर्घ स्वरूपासाठी रूपांतरित होतात. या अॅसिड्सला इकोसापेंटेनोइक अॅसिड (EPA) आणि डोकोसाहेक्सॅनोइक अॅसिड (DHA) म्हणतात. हे दोन्ही अॅसिड आपल्या त्वचेतील संरचनात्मक घटक तयार करण्यात मदत करतात. अक्रोड तेलामध्ये असलेलं ओमेगा -3 त्वचेच्या निर्मितीस उत्तेजन देऊ शकतं, दाहक त्वचा विकारांशी लढा देऊ शकतं. त्यामुळे जर तुम्ही हिवाळ्यात तुम्ही त्वचेच्या कोरडेपणानं त्रस्त असाल, तर अक्रोडाचं तेल तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकते.

  हे वाचा - या 5 चुकांमुळं तुमचं वजन कधीच नाही होत कमी; Weight Loss च्या मार्गातील दुश्मन

  हिवाळ्यात पौष्टिक आणि आरोग्यदायी घटकांनी समृद्ध असलेल्या अन्नपदार्थांची निवड करणं गरजेचं ठरतं. या काळात अक्रोड तेलाचा खाण्यात किंवा मालिशसाठी वापर केल्यास आरोग्यासाठी फायदा होतो.

  First published:

  Tags: Health, Lifestyle, Winter