कॅन्सर... शब्द जरी उच्चारला तरी पायाखालची जमीन सरकते... कॅन्सरसारखा महाभयानक आजार आपल्याला होऊ नये, असं प्रत्येकाला वाटतं, यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाते. तुम्हाला जर कोणी सांगितलं, की तुम्हाला कॅन्सरला दूर ठेवायचं असेल, तर फक्त दररोज किमान 20 मिनिटं चाला तर... विश्वास बसणार नाही ना? चालण्याने कॅन्सर कसा काय दूर राहिल असंच तुम्ही म्हणाल ना... मात्र दररोज किमान 20 मिनिटं चालण्याने एक ना दोन तर चक्क 7 प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी करता येऊ शकतो, असं संशोधकांनी म्हटलं आहे.
जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजीमध्ये (Journal of Clinical Oncology) मध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
संशोधकांनी ऑस्ट्रेलिया, युरोप आणि यूएसमधील 7,50,000 प्रौढ व्यक्तींचा अभ्यास केला, वॉकिंग, सायकलिंग, जॉगिंग केल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो की नाही हे त्यांनी तपासलं.
संशोधनात संशोधकांना दिसून आलं की,
नियमित चालण्याने myeloma, non-Hodgkin lymphoma आणि कोलोन, ब्रेस्ट, किडनी, लिव्हर आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो.
अडीच तास अशा एक्सरसाईज केल्याने लिव्हर कॅन्सरचा धोका 18 टक्क्यांनी कमी होतो. आठवड्यातून 5 तास फिजिकल अक्टिव्हिटी केल्याने हा धोका 27 टक्क्यांनी कमी होतो.
महिलांनी नियमित 150 मिनिटं अशा एक्सरसाईज केल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका 6 टक्क्यांनी तर 5 तास एक्सरसाईज केल्याने 10 टक्क्यांनी कमी होतो. तर गर्भाशयाचा कॅन्सर आणि non-Hodgkin’s lymphoma चा धोका 18 टक्क्यांनी कमी होतो.
समान लेव्हलच्या एक्सरसाईज करणारे महिला आणि पुरुष दोघांनाही किडनी कॅन्सर होण्याचा धोका 11 ते 17 टक्क्यांनी आणि blood cancer myeloma 19 टक्क्यांनी कमी होतो
पुरेशा प्रमाणा शारीरिक कार्य केल्याने पुरुषांमधील कोलोन कॅन्सरचा धोका 14 टक्क्यांनी कमी होऊ शकतो
लोकं ज्याप्रमाणे प्रत्येक आठवड्याला आपली physical activity वाढवतात, त्यानुसार त्यांचा कॅन्सरचा धोकाही कमी होत जातो, असं संशोधकांनी म्हटलं आहे.
दरम्यान ज्या अहवालावर हा अभ्यास करण्यात आला आहे, तो संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. त्यामुळे मॉडरेट एक्सरसाईजमुळे कॅन्सरचा धोका कसा कमी होतो, हे समजण्यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचंही संशोधकांनी स्पष्ट केलं आहे.
सोर्स – मेडिकल डेली
सूचना- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
अन्य बातम्या
चालण्या-धावण्यापेक्षा 'हा' व्यायाम ठरतो निरोगी हृदयासाठी परिणामकारक
व्यायाम न करता फिट राहायचं असेल, तर परफेक्ट आहे 'हा' उपाय मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.