मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सकाळी लवकर उठण्याचे सर्व प्रयत्न कुचकामी ठरलेत? मग हे उपाय करून पहा, होईल इच्छा पूर्ण

सकाळी लवकर उठण्याचे सर्व प्रयत्न कुचकामी ठरलेत? मग हे उपाय करून पहा, होईल इच्छा पूर्ण

थंडीच्या काळात तर सकाळी लवकर उठणं हे एखाद्या मोठ्या आव्हानापेक्षा कमी नसतं. सकाळी लवकर उठणे हे आपल्या शरीराबरोबरच मानसिक आरोग्यासाठी आणि मनासाठीही खूप (Wake up Early Morning) फायदेशीर आहे.

थंडीच्या काळात तर सकाळी लवकर उठणं हे एखाद्या मोठ्या आव्हानापेक्षा कमी नसतं. सकाळी लवकर उठणे हे आपल्या शरीराबरोबरच मानसिक आरोग्यासाठी आणि मनासाठीही खूप (Wake up Early Morning) फायदेशीर आहे.

थंडीच्या काळात तर सकाळी लवकर उठणं हे एखाद्या मोठ्या आव्हानापेक्षा कमी नसतं. सकाळी लवकर उठणे हे आपल्या शरीराबरोबरच मानसिक आरोग्यासाठी आणि मनासाठीही खूप (Wake up Early Morning) फायदेशीर आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : सकाळी लवकर उठणं कामे लवकर होण्याबरोबच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. सकाळी लवकर उठल्यानं संपूर्ण दिवस शरीरात ऊर्जा भरगच्च राहते. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांना सकाळी लवकर उठण्याची इच्छा असते परंतु काही कारणास्तव ते उठू शकत नाहीत. सकाळी लवकर न उठण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आळस. थंडीच्या काळात तर सकाळी लवकर उठणं हे एखाद्या मोठ्या आव्हानापेक्षा कमी नसतं. सकाळी लवकर उठणे हे आपल्या शरीराबरोबरच मानसिक आरोग्यासाठी आणि मनासाठीही खूप (Wake up Early Morning) फायदेशीर आहे.

सकाळी लवकर उठणे अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यामुळे आपण दिवसभर चपळ राहतोच, पण आपली अनेक कामेही आधी पूर्ण होतात. उशिरा उठल्यावर शरीरात तणाव आणि सुस्तीची भावना राहते. सकाळी लवकर उठणे हा अनेक आजारांपासून बचाव करण्याचा नैसर्गिक उपाय आहे. जर तुम्हालाही सकाळी लवकर उठायचे असेल तर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला सकाळी लवकर उठणं सोपं (Wake up Early Morning Tips) जाईल.

सकाळी लवकर उठण्यासाठी हे उपाय करा

1. रात्री चहा, कॉफीपासून दूर राहा –

रात्रीच्या जेवणानंतरही अनेकांना चहा किंवा कॉफी प्यायला आवडते. जर तुम्हाला चांगली झोप घ्यायची असेल आणि सकाळी लवकर उठायचे असेल तर रात्रीच्या वेळी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय ताबडतोब बंद करा. यामुळं तुम्हाला झोप लागणं सोपं होईल आणि सकाळी लवकर उठणंदेखील सोपं होईल.

2. मोबाईलला करा लवकर गुड नाईट –

झोपण्यापूर्वी टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सला चिकटून राहणं आपल्या सर्वांच्याच सवयीचं झालं आहे. ही सवय आपल्या झोपेमध्ये अडथळा आणण्यात आणि सकाळी उशिरा उठण्यात मोठी भूमिका बजावते. झोपण्याच्या एक तास आधी कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरणे थांबवा. रात्री झोपतानाही मोबाईल किंवा लॅपटॉप जवळ ठेवू नका.

3. खोलीच्या तापमानाची काळजी घ्या –

रात्री झोपताना तुमच्या बेडरूमचे तापमान राखण्यासाठी विशेष काळजी घ्यावी. जर तुम्हाला एसी रूममध्ये झोपायची सवय असेल, तर खोलीचे तापमान राखणे जास्त गरजेचे आहे. अशा स्थितीत बेडरूमचे तापमान 20 ते 22 अंशांच्या आसपास असावे.

4. झोपण्याची वेळ निश्चित करा - सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री वेळेवर झोपण्याची शिस्त असणे आवश्यक आहे. तुम्हाला दररोज कोणत्या वेळी उठायचे आहे आणि त्याच वेळी झोपायला जायचे आहे, त्यानुसार तुमची झोपण्याची वेळ निश्चित करा. ज्या वेळेस उठायचे असते त्या वेळेच्या 7 ते 8 तास आधी झोपणे चांगले.

हे वाचा - VIDEO : पहिल्यांदाच सासरी आलेल्या वहिनीच्या मांडीवर बसला दीर; प्रताप पाहून लावाल डोक्याला हात

5. रात्री हलके अन्न घ्या - रात्री जड अन्न घेणं टाळा. त्याऐवजी खिचडी, थुली आणि तत्सम हलके जेवण घेणे सुरू करा. रात्रीचे हलके जेवण पोट हलके ठेवते त्यामुळे सकाळी उठण्यात कोणतीही अडचण येत नाही. रात्री प्रथिनयुक्त आहार घेतल्यानेही झोप उशिरा येते, त्यामुळे ते टाळावे.

हे वाचा - lose weight with lemon: वजन कमी करण्यात फक्त 1 लिंबू आहे फायदेशीर; आहारात असा करा समावेश

6. अलार्म दूर ठेवा - अनेकांना घड्याळात किंवा मोबाईलवर अलार्म लावण्याची सवय असते, सकाळी लवकर उठण्याचा त्यांचा विचार असतो, पण सकाळी अलार्म वाजला की ते झोपेत बंद करतात आणि पुन्हा झोपतात. तुम्ही देखील त्यांच्यापैकी एक असाल तर आजपासून अलार्म लावून जवळ ठेवण्याऐवजी तो सुमारे 10 ते 12 फूट अंतरावर ठेवा. त्यामुळे सकाळी अलार्म वाजला की उठून तो बंद करण्यासाठी जावे लागते. त्यामुळे सकाळी उठणे सोपे होईल.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle