मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सुविधा वाटणारे व्हॉइस असिस्टंट अ‍ॅप्स मुलांच्या भावनिक विकासासाठी धोकादायक, संशोधकांचा दावा

सुविधा वाटणारे व्हॉइस असिस्टंट अ‍ॅप्स मुलांच्या भावनिक विकासासाठी धोकादायक, संशोधकांचा दावा

व्हॉइस असिस्टंट अ‍ॅपचा अतिवापर केल्याने मुलांच्या सामाजिक संवाद शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. खरं तर, जेव्हा मुलं लोकांशी सामान्यपणे संवाद साधतात तेव्हा त्यांना रचनात्मक प्रतिक्रिया मिळते आणि ते स्वत: ला सुधारण्यास सक्षम होतात, जे या स्मार्ट उपकरणांमुळे शक्य नाही.

व्हॉइस असिस्टंट अ‍ॅपचा अतिवापर केल्याने मुलांच्या सामाजिक संवाद शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. खरं तर, जेव्हा मुलं लोकांशी सामान्यपणे संवाद साधतात तेव्हा त्यांना रचनात्मक प्रतिक्रिया मिळते आणि ते स्वत: ला सुधारण्यास सक्षम होतात, जे या स्मार्ट उपकरणांमुळे शक्य नाही.

व्हॉइस असिस्टंट अ‍ॅपचा अतिवापर केल्याने मुलांच्या सामाजिक संवाद शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. खरं तर, जेव्हा मुलं लोकांशी सामान्यपणे संवाद साधतात तेव्हा त्यांना रचनात्मक प्रतिक्रिया मिळते आणि ते स्वत: ला सुधारण्यास सक्षम होतात, जे या स्मार्ट उपकरणांमुळे शक्य नाही.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 ऑक्टोबर : हल्लीचा काळ खूप डिजिटल झालाय. कोरोनानंतर तर मोठ्या परमानावर वर्क फ्रॉम होम आणि स्टडी फ्रॉम होम या संकल्पना रुजल्या आहेत. आता अनेक लोक घरून काम करणे आणि ऑनलाईन क्लासेस, अभ्य्सा करणे पसंत करतात. मुलांच्या शाळा मध्यन्तरीच्या काळापर्यंत घरूनच ऑनलाईन पद्धतीने सुरु होत्या. आता शाळांना सुरुवात झाली आहे मात्र तरीही काही क्लासेस मुलांचे ऑनलाईन होतात. त्यामुळे मुलं स्मार्टफोन आणि त्यासोबतच व्हॉइस असिस्टंट अ‍ॅप्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.

मात्र तुम्हाला माहित आहे का? अ‍ॅलेक्सा आणि सिरीसारखे व्हॉइस असिस्टंट अ‍ॅप्स मुलांच्या सामाजिक आणि भावनिक विकासात अडथळा आणू शकतात. असे एका संशोधनातून समोर आले आहे. अधिक व्हॉईस अ‍ॅप्स वापरल्याने मुलांची विचार करण्याची क्षमता कमी होते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. याशिवाय त्यांच्यामध्ये भावना, करुणा आणि शिकण्याची क्षमतादेखील बाधित होते. पाहूया याबद्दल सविस्तर माहिती.

बाळाला तापाचं औषध (पॅरासिटामॉल) देण्यापूर्वी या 8 गोष्टी नीट समजून घ्या

काय आहे शास्त्रज्ञांचे मत

अभ्यासानुसार, केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या अनमोल अरोरा यांनी एका मीडिया रिलीझमध्ये माहिती दिली की व्हॉईस असिस्टंट अ‍ॅपचा जास्त वापर मुलांच्या सामाजिक संवाद शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतो. खरं तर, जेव्हा मुलं लोकांशी सामान्यपणे संवाद साधतात तेव्हा त्यांना रचनात्मक प्रतिक्रिया मिळते आणि ते स्वत: ला सुधारण्यास सक्षम होतात, जे या स्मार्ट उपकरणांमुळे शक्य नाही. मात्र एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्धांसाठी ही उपकरणे एकाकीपणावर मात करण्याचे काम करतात, असे संशोधनात आढळून आले आहे, परंतु मुलांच्या विकासात हे स्पष्टपणे सांगता येत नाही.

व्हॉइस असिस्टंट अ‍ॅपचे इतर तोटे

मुलांमध्ये शिष्टाचाराचा अभाव

संशोधनात असे आढळून आले आहे की, जी मुले स्मार्ट व्हॉइस उपकरणे अधिक वापरतात, त्यांची शिष्टाचार शिकण्याची क्षमता कमी होते. सॉरी, थँक्यू अशा शब्दांचा वापर ते कमी करू लागतात. यामुळे त्यांच्या मॅनर्स रुजवणे कधी कधी अवघड होते.

भावनिक विकासाचा अभाव

अशा उपकरणांशी संवाद साधणाऱ्या मुलांच्या दीर्घकालीन परिणामांवर तातडीने संशोधन करणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर अशा मुलांमध्ये भावनिक विकास म्हणजेच सहानुभूती, करुणा इत्यादींचा अभाव असतो.

World Mental Health Day : सामान्य नाहीत मुलांमधील 'ही' लक्षणं; दिसली तर समजा मानसिक समस्यांना बळी पडलंय तुमचं मुल

पालकांनी काय करावे

जेव्हा मुले डिव्हाइसेसवरून प्रश्न विचारतात, तेव्हा घरातील मोठ्या व्यक्तींनी त्यांना ते प्रश्न आणि आवश्यक असलेली माहिती परत विचारावी. जेणेकरून मुलं त्यांना मिळाली माहिती तुम्हाला परत सांगतील. यामुळे त्यांचे ज्ञानही वाढेल आणि त्यांचा तुमच्यासोबत संवादही होईल. असे केल्याने त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती मिळू शकते आणि मुलांवर त्याचा चुकीचा परिणाम कमी होतो.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Mental health, Parents and child