मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुळशीच्या लग्नानंतर एप्रिलपर्यंत आहेत भरपूर शुभमुहूर्त; विवाह लाभणारे मुहूर्त कुठले?

तुळशीच्या लग्नानंतर एप्रिलपर्यंत आहेत भरपूर शुभमुहूर्त; विवाह लाभणारे मुहूर्त कुठले?

 एकादशीनंतर शुभमुहूर्तांना सुरवात झाली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने विवाहेच्छुकांसाठी महत्त्वाचे आहेत. या महिन्यांत विवाह सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात शुभमुहूर्त आहेत

एकादशीनंतर शुभमुहूर्तांना सुरवात झाली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने विवाहेच्छुकांसाठी महत्त्वाचे आहेत. या महिन्यांत विवाह सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात शुभमुहूर्त आहेत

एकादशीनंतर शुभमुहूर्तांना सुरवात झाली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने विवाहेच्छुकांसाठी महत्त्वाचे आहेत. या महिन्यांत विवाह सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात शुभमुहूर्त आहेत

दिल्ली, 16 नोव्हेंबर: चातुर्मासादरम्यान भगवान श्री विष्णू (Lord Vishnu) योगनिद्रा घेतात. त्यामुळे या कालावधीत विवाहासारखी शुभ कार्यं निषिद्ध मानली जातात. दिवाळीनंतर येणाऱ्या ( Dev Uthani Ekadashi) अर्थात प्रबोधिनी एकादशीला भगवान श्री विष्णू योगनिद्रेतून जागे होतात, असं मानलं जातं. त्यामुळे या दिवसानंतर सर्व शुभकार्यांना, विशेषतः विवाह सोहळ्यांना पुन्हा सुरुवात होते. त्यामुळे विवाहच्छुक या हंगामाची वाट पाहत असतात. यंदाही या एकादशीनंतर शुभमुहूर्तांना सुरवात झाली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने विवाहेच्छुकांसाठी महत्त्वाचे आहेत. या महिन्यांत विवाह सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात शुभमुहूर्त आहेत. ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी ही माहिती दिली आहे. नोव्हेंबर-डिसेंबर, तसंच आगामी वर्षातल्या विवाह मुहूर्तांविषयीची (Vivah Muhurat) माहिती `आज तक`ने प्रसिद्ध केली आहे.

`या` 3 राशीच्या व्यक्तींपासून राहायला हवं सावध; कधीही देऊ शकतात दगा

सामान्यतः प्रबोधिनी एकादशी किंवा तुळशीच्या लग्नानंतर शुभकार्यांला, त्यातही विवाह सोहळ्यांना (Marriage Ceremony) सुरुवात होते. नोव्हेंबर 2021 ते एप्रिल 2022 पर्यंत विवाहासाठी मोठ्या प्रमाणात शुभ मुहूर्त (Shubh Muhurat) आहेत. त्यात नव्या वर्षाच्या (New Year) पहिल्याच महिन्यात अर्थात जानेवारी 2022 मध्ये 14 जानेवारीपर्यंत मलमास असेल. त्यानंतर 22, 23,24 आणि 25 जानेवारीला विवाहासाठी शुभ मुहूर्त आहेत. त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये देखील विवाहाकरिता शुभमुहूर्त आहेत. 5,6,7,9,10,11, 12, 18, 19, 20 आणि 22 फेब्रुवारीला शुभमुहूर्त असल्यानं विवाह, तसंच अन्य कोणतंही शुभ कार्य करणं शक्य आहे. नव्या वर्षाच्या मार्च महिन्यात 4 आणि 9 मार्च असे केवळ दोनच शुभमुहूर्त आहेत. एप्रिल 2022 मध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर शुभ मुहूर्त आहेत. 14,15,16,17,19,20,21, 22, 23, 24 आणि 27 एप्रिलला शुभमुहूर्त असल्यानं त्या दिवशी विवाह किंवा अन्य शुभकार्यं करणं श्रेयस्कर ठरणार आहे.

Long Life Foods: दीर्घायुष्य जगायचं असेल तर या गोष्टी खायला करा सुरुवात

ज्योतिष तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबर 2021 मध्ये विवाहासाठीचा पहिला शुभ मुहूर्त हा 14 नोव्हेंबर होता. त्यानंतर 15, 16, 20, 21, 22, 28, 29 आणि 30 या तारखा विवाहासह अन्य शुभकार्यांसाठी अनुकूल आहेत. डिसेंबर 2021 मध्ये 1,2,6,7,8,9, 11 आणि 13 या तारखा विवाह सोहळ्यासाठी शुभ आहेत.

प्रबोधिनी एकादशीनंतर 14 डिसेंबरपर्यंत म्हणजेच सुमारे एक महिन्याचा कालावधी हा विवाह सोहळ्यासाठी अनुकूल आहे. 14 डिसेंबर 2021 ते 14 जानेवारी 2022 पर्यंत मलमास असल्यानं या कालावधीत विवाहासाठी शुभ मुहूर्त नाहीत. हिंदू धर्मात मलमास हा सर्व शुभ कार्यांसाठी निषिद्ध मानला जातो. 14 जानेवारीला मल मास संपल्यानंतर पुन्हा विवाहासह अन्य शुभकार्यं करता येणार आहेत.

First published:

Tags: Astrology and horoscope, Wedding