रेशमी केसांसाठी ही पाच व्हिटॅमिन्स गरजेची

रेशमी केसांसाठी ही पाच व्हिटॅमिन्स गरजेची

केस गळणं ही हल्ली सगळ्यांची समस्या बनलीय. शरीरात 5 व्हिटॅमिन्स कमी पडल्यानं त्याचा परिणाम केस गळण्यावर होतो.

  • Share this:

04 मे : केस गळणं ही हल्ली सगळ्यांची समस्या बनलीय. शरीरात 5 व्हिटॅमिन्स कमी पडल्यानं त्याचा परिणाम केस गळण्यावर होतो.

पाहू या त्यासाठी काय काय करावं?

1. व्हिटॅमिन ए - केसात तेलाचं प्रमाण चांगलं राहण्यासाठी अ जीवनसत्त्वाची गरज लागते. त्यामुळे केस लांबसडक आणि मजबूत राहतात. अर्थात, ए व्हिटॅमिनचा अति वापरही टाळावा.

पालक, गाजर यात ए व्हिटॅमिन जास्त असते.

2. व्हिटॅमिन बी - व्हिटॅमिन बीमुळे केसाची चमक चांगली राहते. शिवाय केसांची वाढ होण्यासाठीही याचा उपयोग होतो.

मशरूम, अंडी यात व्हिटॅमिन बी असतं

3. व्हिटॅमिन सी - यामुळे शरीरातली रोगप्रतिकार शक्ती वाढते. अॅलर्जीही होत नाही. दुबळे झालेले केस यामुळे मजबूत होतात.

स्ट्राॅबेरी, संत्र, मोसंबं, द्राक्ष, किवी यात जास्त सी जीवनसत्त्व असतं.

4. व्हिटॅमिन डी - सूर्यप्रकाशात फिरल्यानं शरीरातलं डी जीवनसत्त्व वाढतं. केसांच्या वाढीसाठी ते पोषक आहे. त्यामुळे रोज माॅर्निंग वाॅक केला,तर केसांना चांगलं.

5. व्हिटॅमिन ई - तुटणाऱ्या केसांसाठी व्हिटॅमिन ई अतिशय उपयोगी आहे. त्यानं केस तुटण्याचे थांबतात आणि मजबूत दिसतात.

बदाम, ब्राॅकली यात ई व्हिटॅमिन भरपूर असतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 4, 2017 04:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading