Home /News /lifestyle /

Vitamin Deficiency: तुम्हाला माहीत आहे का? या Vitamin च्या कमतरतेमुळं स्मरणशक्ती होत जाते कमी, जाणून घ्या उपाय

Vitamin Deficiency: तुम्हाला माहीत आहे का? या Vitamin च्या कमतरतेमुळं स्मरणशक्ती होत जाते कमी, जाणून घ्या उपाय

Vitamin B12 Deficiency : व्हिटॅमिन सी, ई आणि के प्रमाणे व्हिटॅमिन बी 12 देखील शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. वृद्ध लोकांमध्ये विस्मृती ही सर्वात मोठी समस्या आहे. वाढत्या वयाबरोबर स्मरणशक्ती कमकुवत होते आणि प्रकृती बिघडली तर ही समस्या डिमेंशियाचे रूप घेऊ शकते.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 05 जानेवारी : निरोगी राहण्यासाठी जीवनशैलीसोबतच आहाराकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. दैनंदिन आहारातून शरीराला आवश्यक प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळाल्यास शरीरात दीर्घकाळ रोगांशी लढण्याची क्षमता राहते. व्हिटॅमिन सी, ई आणि के प्रमाणे व्हिटॅमिन बी 12 देखील शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. वृद्ध लोकांमध्ये विस्मृती ही सर्वात मोठी समस्या आहे. वाढत्या वयाबरोबर स्मरणशक्ती कमकुवत होते आणि प्रकृती बिघडली तर ही समस्या डिमेंशियाचे रूप घेऊ शकते. स्मरणशक्ती कमी होण्याचे किंवा स्मृतिभ्रंश या आजाराचे मुख्य कारण म्हणजे शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता (Vitamin B12 Deficiency) असते. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालानुसार, शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे मिनिमल कॉगनिटिव इम्पेयरमेंट (Minimal Cognitive Impairment) आणि डिमेंशियाचा त्रास उद्भवू शकतो. टोडोडिस्काच्या बातमीनुसार, व्हिटॅमिन बी 12 आपल्यासाठी अनेक कारणांसाठी खूप महत्त्वाचे आहे. याचे वैज्ञानिक नाव कोबालामिन आहे. हे केवळ यकृतामध्ये साठवले जाते आणि शरीराची अनेक महत्त्वपूर्ण कार्ये करते. बहुतेक व्हिटॅमिन बी 12 डुकराचे मांस, गोमांस यकृत, चीज, दूध, ऑक्टोपस इत्यादींमध्ये आढळते. या समस्या व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे होतात शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास त्याचा आपल्या डीएनए संश्लेषणावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे, लाल रक्तपेशी तयार होण्याचा वेग मंदावतो. यामुळे मेगालोब्लास्टिक अॅनिमिया हा घातक रोग होण्याचा धोका वाढतो. हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पचनसंस्थेतील बिघाडामुळे देखील निर्माण होऊ शकते. कारण त्यामुळे जीवनसत्व योग्यरित्या शोषले जात नाही. शाकाहारी आहार घेणार्‍या लोकांमध्येही व्हिटॅमिन बी12 ची कमतरता दिसून येते. ज्यामुळे डिमेंशियासारखे आजार होऊ शकतात. याचा समजून घेण्याच्या क्षमतेवर मोठा परिणाम होतो. हे वाचा - Healthy Breakfast: नवीन वर्षासोबत ब्रेकफास्‍टमध्ये करा हे 5 हेल्दी बदल; नेहमी निरोगी आणि तंदुरुस्त रहाल या गोष्टी काळजी घ्या - स्मरणशक्ती कमी होणे, बोलण्यात अडचण. - नेहमी विचलित वाटणे. - सतत थकवा, अशक्तपणा, गोंधळाची भावना कायम राहते. - त्वचेचा रंग पिवळसर होणे. - प्रतिक्षेप कमी होणे
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Mental health

    पुढील बातम्या