मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

झोपेत पाहिलेलं स्वप्न लक्षात ठेवायचं असेल तर ही गोष्ट नक्की खा!

झोपेत पाहिलेलं स्वप्न लक्षात ठेवायचं असेल तर ही गोष्ट नक्की खा!

अॅलर्जी- ढेकूण चावल्यामुळे त्वचा जळल्यासारखी वाटते आणि लाल चट्टे उठतात. तसेच काही वेळा फोडही येतात. याशिवाय कधी- कधी गंभीर अॅलर्जीही होऊ शकते.

अॅलर्जी- ढेकूण चावल्यामुळे त्वचा जळल्यासारखी वाटते आणि लाल चट्टे उठतात. तसेच काही वेळा फोडही येतात. याशिवाय कधी- कधी गंभीर अॅलर्जीही होऊ शकते.

एक सर्वसामान्य व्यक्ती त्याच्या आयुष्यातील सहा तास झोपेत स्वप्न पाहण्यात घालवते. जर आपण स्वप्नांवर नियंत्रण मिळवू शकलो तर आपण स्वप्न पाहण्याच्या वेळेचा उपयोग करू शकतो.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असं दिसून आलं की, विटामिन B6 खाल्ल्याने लोकांना गाढ झोपेत पडलेली स्वप्न लक्षात राहू शकतात. सुरुवातीला ऑस्ट्रेलियातील 100 लोकांना सलग पाच दिवस विटामिन B6 चा हाय डोस देण्यात आला.

'परसेप्चुअल अँड मोटर स्किल्स' नावाच्या एका जर्नलमध्ये या संशोधनाचा निष्कर्ष छापून आला. यूनिवर्सिटी स्कूल ऑफ सायकॉलॉजी येथील संशोधक आणि लेखक डॉ. डेनहोम अस्पी म्हणाले की, 'आमच्या संशोधनानुसार, विटामिन B6 घेतल्यामुळे स्वप्न जास्त लक्षात राहू लागली. मात्र विटामिन B6 ने स्वप्नांच्या जीवंतपणा, विचित्रपणात किंवा रंगांमध्ये कोणताही परिणाम झाला नाही. याशिवाय झोपण्याच्या सवयीवरही याचा कोणताही परिणाम झाला नाही.'

डॉ. डेनहोम अस्पी पुढे म्हणाले की, पहिल्यांदा असं झालं की, स्वप्नांवर विटामिन B आणि विटामिन B6 च्या परिणामांवर अभ्यास झाला. संशोधनाच्या सुरुवातीला लोकांवर याचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही. मात्र संशोधनाच्या शेवटी लोकांना त्यांच्यातील हा सुधार दिसू लागला. या संशोधनाचा एक भाग असलेल्या एका व्यक्तिने सांगितले की, 'वेळेनुसार मला माझी स्वप्न स्पष्टपणे लक्षात राहू लागली.' तर दुसऱ्या एकाने सांगितले की, 'मला माझी स्वप्न आधीपेक्षा स्पष्ट आणि खरी दिसू लागली.'

डॉ. अस्पी म्हणाले की, एक सर्वसामान्य व्यक्ती त्याच्या आयुष्यातील सहा तास झोपेत स्वप्न पाहण्यात घालवते. जर आपण स्वप्नांवर नियंत्रण मिळवू शकलो तर आपण स्वप्न पाहण्याच्या वेळेचा उपयोग करू शकतो. विटामीन बी 6 हे धान्य, केळी आणि एवोकॅडो अशा फळांमधून तसेच दूध, पनीर, अंड, लाल मांस आणि माशांमधून मोठ्या प्रमाणात मिळतं.

आता प्रेमाला म्हणा नकोच, कारण त्याचाही आहे अनोखा फायदा!

हॉट योगा करून या आजारापासून होऊ शकता मुक्त

या रामबाण उपायांनी मिळवा मायग्रेनपासून सुटका!

हे चार ड्रायफ्रूट्स तुम्हाला अनेक आजारांपासून ठेवतं दूर!

VIDEO: मुंबईत असल्फा इथे घराची भिंत कोसळली

First published:

Tags: Health, Lifestyle, Sleep