मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Vitamin A Deficiency : व्हिटॅमिन Aच्या कमतरतेचे डोळ्यांवर होऊ शकतात गंभीर परिणाम, ही आहेत लक्षणे

Vitamin A Deficiency : व्हिटॅमिन Aच्या कमतरतेचे डोळ्यांवर होऊ शकतात गंभीर परिणाम, ही आहेत लक्षणे

व्हिटॅमिन Aच्या कमतरतेची लक्षणे

व्हिटॅमिन Aच्या कमतरतेची लक्षणे

जीवनसत्त्वे हा आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. शरीराच्या सर्व अवयवांचे कार्य व्यवस्थित आणि निरोगी होण्यासाठी विविध प्रकारची जीवनसत्त्वे आवश्यक असतात. त्यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन ए. निरोगी डोळे, त्वचा, केस आणि अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या, संसर्गापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी या जीवनसत्त्वाची गरज असते.

पुढे वाचा ...
  मुंबई, 19 ऑगस्ट : आपल्या शरीरात व्हिटॅमिन ए तयार होत नसल्यामुळे, त्याचा पुरवठा अन्नातून होतो. जेव्हा पोट हे पोषक तत्व योग्य प्रकारे शोषत नाही तेव्हा शरीरात व्हिटॅमिन ए ची कमतरता उद्भवते. त्याच्या कमतरतेमुळे अंधत्व येऊ शकते. काहीवेळा त्याच्या कमतरतेमुळे काही गंभीर संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेची लक्षणे आणि धोके जाणून घेऊया. शरीरातील अ जीवनसत्वाच्या कमतरतेची मुख्य लक्षणे - रातांधळेपणा, कॉर्नियामध्ये कोरडेपणा, जळजळ - कोरडी त्वचा - वारंवार संक्रमण - त्वचेची जळजळ - कोरड्या डोळ्याचा कॉर्निया - मुलांच्या हाडांचा योग्य विकास न होणे - वंध्यत्व समस्या

  Increase Eyesight : निरोगी डोळ्यांसाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश; मिळतील सर्व पोषक घटक

  व्हिटॅमिन ए च्या कमतरतेचे दुष्परिणाम जेव्हा शरीराला व्हिटॅमिन ए पुरेशा प्रमाणात पुरवले जात नाही, तेव्हा हळूहळू तुम्हाला अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण होऊ लागतात. यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या, प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, गोवर, अगदी गंभीर स्थितीत व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोग असलेल्या लोकांमध्ये व्हिटॅमिन एची कमतरतादेखील होऊ शकते. अशा लोकांमध्ये अ जीवनसत्वाचे शोषण योग्य प्रकारे होत नाही. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे डोळ्यांशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे डोळे दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ए युक्त पदार्थांचे सेवन करा. डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर व्हिटॅमिन ए च्या कमतरतेवर उपाय रक्त तपासणीद्वारे डॉक्टर अ जीवनसत्वाची कमतरता ओळखतात. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन ए ची कमतरता असेल तर तुम्हाला त्यासाठी भरपूर पदार्थ आणि सप्लिमेंट्सचे सेवन करावे लागेल. तेलकट मासे, कॉड लिव्हर ऑइल, शेलफिश, भाज्यांमधील हिरव्या भाज्या, भोपळा, रताळे, गाजर, चीज, दूध, फ्लॉवर, क्रीम, दूध, आंबा, पपई, टरबूज, जर्दाळू इत्यादींचे सेवन करा.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Eyes damage, Health Tips, Lifestyle

  पुढील बातम्या