फक्त 50 हजारात फिरा जगातले हे सर्वात सुंदर देश

फक्त 50 हजारात फिरा जगातले हे सर्वात सुंदर देश

परदेशात फिरायला जायचं म्हणजे लाखभर रुपयांची तरी किमान तरतूद करावीच लागणार असा अनेकांचा समज असतो. पण प्रत्येक देशासाठी हा नियम लागू होतोच असं नाही.

  • Share this:

ओमान- या देशाचं सौंदर्य शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. इथे तुम्ही वाळवंट आणि निळ्याशार समुद्राचा एकत्र आनंद घेऊ शकता. जर तुम्हाला या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी हव्या असतील तर या देशाला भेट द्या. या देशात जाण्यासाठी तुम्हाला अहमदाबादवरून जावं लागेल. ओमानला जाण्यासाठी एक वेळचं तिकिट फक्त 6 हजार 887 रुपयांपासून सुरू होतं.

जवळपास 5 तासांमध्ये तुम्ही अहमदाबादवरून ओमानला पोहचू शकता. ओमानमध्ये तुम्ही मस्कत, मिस्फात अल अबरीन, पश्चिमी हजर, मूत्राह, अल बतिनाह आणि वाडी बनी अशी अनेक ठिकाणं तुम्ही पाहू शकता. ओमानमध्ये थांबण्यासाठी कुर्म बीच हॉटेल फार स्वस्त आहे. इथे एका रात्रीचं भाडं 2 हजार 080 रुपयांनी सुरू होतं.

संयुक्त अरब अमिराती- हे एक लग्झरी डेस्टिनेशन आहे. इथे उंच इमारतींवरून उडी मारणं आणि झिप- लायनिंग अशा अॅडव्हेंचर गोष्टी फार प्रसिद्ध आहेत. जर तुम्ही संयुक्त अरब अमिराती येथे जाण्याचा विचार करत असाल तर दुबईला नक्की जा. कोच्चीवरून जर तुम्ही विमान केलं तर एकावेळचं तिकीट सुमारे 6 हजार 534 रुपये आहे. दुबईला पोहोचायलाही सुमारे पाच तास लागतात. संयुक्त अरब अमिराती येथे तुम्ही अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, शॉपिंग, सांस्कृतिक स्थळं, लग्झरी स्थळं, वाळवंटाची सफारी, वॉटर स्पोर्ट्स अशा अनेक गोष्टींचा आनंद लुटू शकता. इथे तुम्ही दुबई, अबू धाबी, शारजाह फिरू शकता. इथे एका रात्रीचं हॉटेलचं भाडं 1020 रुपयांनी सुरू होतं.

कतार- हा एक छोटासा द्वीपकल्प आहे. याच्या दक्षिणेला सौदी अरबिया तर इतर तीन बाजूंनी पर्शियन आखात आहे. त्यामुळे हा देश किती सुंदर असेल याचा फक्त तुम्ही विचार करा. जर तुम्हाला कतारला जायचं आहे तर तुम्ही कोझिकोडवरून फ्लाइट पकडा. या देशात जाण्याचं एका वेळचं तिकीट जवळपास 10 हजार रुपये आहे. तसं पाहायला गेलं तर पूर्ण कतारच पाहण्यासारखं आहे.

खोर अल अदैद नॅचरल रिसर्व्स, ढल अल मिस्फीर, दोहा, कटारा सांस्कृतिक गाव, रस अब्रोक नॅचरल रिसर्व्स भंडार, जुबराह किला अशी काही प्रसिद्ध ठिकाणं अवश्य पाहा. तुम्ही कतारला जाऊन हॅलीकॉप्टरची सैर, उंटावरची सैर नक्की करा. कमी बजेटमध्ये तुम्हाला इथे अनेक हॉटेल उपलब्ध आहेत. इथे एका रात्रीचं भाडं सुमारे 1 हजार 803 रुपये आहे.

तुर्की- या देशाच्या तुम्ही प्रेमात पडला नाहीत तर नवल. इथे जाऊन तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. जर तुम्ही या देशाला भेट देऊ इच्छिता तर मुंबईवरून विमान पकडा. तुर्की जाण्यासाठी एका वेळची किंमत ही सुमारे 21 हजार रुपयांपासून सुरू होते. जर तुम्ही तुर्कीत आहात तर इस्तांबुल, ट्रॉय, इफिसस, पामुक्कले, ट्रेबजन जायला विसरू नका.

...म्हणून मुलं त्यांच्याहून जास्त वयाच्या मुलीच्या प्रेमात पडतात

वेळीच व्हा सावध, या आजाराची लक्षणं कळत नाहीत आणि अचानक होतो मृत्यू

Iron च्या कमतरतेमुळे होऊ शकता हा आजार, दुर्लक्ष केलं तर जाऊ शकतो जीव!

नियमितपणे करताय व्यायाम तर चुकूनही करू नका डाएटिंग, शरीराचं होईल मोठं नुकसान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 10:09 PM IST

ताज्या बातम्या