नवी दिल्ली, 05 जुलै : हिंदू धर्मामध्ये एकादशीला अतिशय महत्त्व आहे. 5 जुलैला सोमवारी योगिनी एकादशी आहे. 4 जुलैला संध्याकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी एकादशी सुरू होत असली तरी, 5 तारखेला एकादशीचं व्रत सुरू होणार आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला व्रत केलं जातं. योगिनी एकादशीच्या दिवशी विष्णू देवाची
(Lord Vishnu) आराधना केली जाते. हे व्रत केल्यामुळे पापांचा नाश होऊन मोक्ष मिळतो अशी धारणा आहे. जाणून घेऊयात योगिनी एकादशीच व्रत कसं करावं.
योगिनी एकादशीचा पूजाविधी
योगिनी एकादशीच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठून घराची साफसफाई करा. त्यानंतर स्नान आणि नित्यकर्म करून सूर्याला जलं अर्पण करा. पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करा. त्यानंतर विष्णूच्या मूर्तीला स्नान घालून शुंगार करा. विष्णू देवाला पिवळी फुलं, प्रसाद अर्पण करा. त्यानंतर धूप दिप दाखवून व्रताला सुरुवात करा. विष्णू देवाला पिवळा रंग प्रिय आहे. त्यामुळे शक्यतो पिवळ्या रंगाचा प्रसादच तयार करा. एकादशीच्या दिवशी तांदळाचा भात किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत.
(
साप्ताहिक राशीभविष्य: या राशीच्या लोकांनी प्रकृती सांभाळा; कसा जाईल तुमचा आठवडा)
योगिनी एकादशी व्रत मुहूर्त:
एकादशी तिथि प्रारंभ - जुलै 04, 2021 ला रात्री 07:55
एकादशी तिथि समाप्ती - जुलै 05, 2021 ला रात्री 10:30
व्रत समाप्तीची वेळ - 6 जुलै, सकाळी 05:29 ते सकाळी 08:16 पर्यंत.
(
Chanakya Niti: तोडांवर ताबा ठेवा नाहीतर संपत्तीही गमवा; होईल लक्ष्मीची अवकृपा)
लक्ष्मी मंत्राचा 108 वेळा जप करावा
ईश्वरीकमला लक्ष्मीश्चलाभूतिर्हरिप्रिया।
पद्मा पद्मालया सम्पद् रमा श्री: पद्मधारिणी।।
द्वादशैतानि नामानि लक्ष्मी संपूज्य य: पठेत्।
स्थिरा लक्ष्मीर्भवेत्तस्य पुत्रदारादिभिस्सह।।
(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.