मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नॉर्मल डिलिव्हरीत व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीची साथ, प्रसूती वेदना कमी करणार

नॉर्मल डिलिव्हरीत व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीची साथ, प्रसूती वेदना कमी करणार

अनेक महिलांना सिझेरियन (Cesarean delivery) नव्हे तर नॉर्मल डिलिव्हरी (normal delivery) हवी असते. मात्र या प्रक्रियेत होणाऱ्या वेदनांची भीतीही त्यांच्या मनात असते. मात्र व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (Virtual reality) याच प्रसूती वेदना कमी करणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Priya Lad

लॉस एंजेल्स, 25 फेब्रुवारी ः अनेक महिलांना सिझेरियन (Cesarean delivery) नव्हे तर नॉर्मल डिलिव्हरी (normal delivery) हवी असते. मात्र या प्रक्रियेत होणाऱ्या वेदनांची भीतीही त्यांच्या मनात असते. मात्र आता या नॉर्मल डिलिव्हरीत व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (Virtual reality) तुम्हाला साथ देणार आहे, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी प्रसूती वेदना कमी करणार आहे.

टेक्सासमध्ये (texas) झालेल्या एका अभ्यासात प्रसूतीदरम्यान व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीचा वापर केल्याने महिलांच्या प्रसूती वेदना कमी झाल्या असं दिसून आलं. सोसायटी मॅटर्नल फेटल मेडिसीनच्या वार्षिक बैठकीत हे संशोधन मांडण्यात आलं.

लॉस एंजेल्सच्या सेडर्स सिनाइ मेडिकल सेंटर्समधील स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. मेलिसा वाँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा अभ्यास केला. ज्या महिलांना पहिलं मूल होणार आहे आणि त्यांनी वेदना कमी करणारी औषधं घेतली नाहीत, अशा गरोदर महिलांवर या व्हीआर हेडसेडचा (VR headset) प्रयोग करून पाहण्यात आला, टेक्सासच्या रुग्णालयात दाखल असलेल्या 40 महिलांचा यात समावेश होता.

हेदेखील वाचा - प्रेग्नन्सीत ब्लीडिंगमुळे होणारा गर्भपात टळणार, 'ही' हार्मोन थेरेपी वरदान ठरणार

जवळपास 30 मिनिटांसाठी ही चाचणी करण्यात आली. दर 5 मिनिटांनी या महिलांना प्रसूतीसाठी जोर द्यावा लागत होता, शिवाय त्यांच्या वेदनांची तीव्रता 4 ते 7 पॉईंटदरम्यान होती. 10 पॉईंटवरील वेदना म्हणजे अति तीव्र अशा वेदना.

संशोधकांना दिसून आलं,

ज्यांनी प्रसूतीच्यावेळी व्हीआर हेडसेड लावला त्यांच्या प्रसूती वेदनांची तीव्रता 30 मिनिटांनंतर सरासरी 0.52 ने कमी झाली.

तर ज्यांनी हा व्हीआर हेडसेट लावला नव्हता त्यांच्या प्रसूती वेदनांची तीव्रता 30 मिनिटांनंतर सरासरी 0.58 ने वाढली. शिवाय त्यांच्या हृदयाचे ठोकेही लक्षणीय वाढले होते.

अर्धा तास चाचणी करण्यात आली, ज्यांनी व्हर्च्युअल रिअलिटी हेडसेट घातले होते, त्यांना रिलॅक्सिन सिन्स आणि मेसेजच दाखवण्यात आले. ज्यांनी हे हेडसेट घातले नव्हते त्यांच्या तुलनेत या महिलांना प्रसूती वेदना कमी झाल्यास त्यांनी सांगितलं.

हेदेखील वाचा - प्रेग्नन्सीनंतरही तुम्ही दिसाल स्लीम ट्रिम, 'हे' खाल्ल्यानंतर कमी होईल वाढलेलं वजन

फोनिक्समधल्या युनिव्हर्सिटी ऑफ एरिजोनाच्या स्त्रीरोग आणि प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. मायकल फोले म्हणाले, हे तंत्रज्ञान खूपच विश्वासार्ह असं आहे. वेदना कमी करणारी औषधं घेण्यापेक्षा रुग्णांसाठी हा वेगळा असा पर्याय आहे, मायकल फोले या संशोधनात सहभागी नाहीत, मात्र त्यांनीदेखील VR चा प्रसूती वेदना कमी करण्याबाबत अभ्यास केला होता.

“भविष्यात संशोधनासाठी आधुनिक आणि जास्त कालावधीसाठी वापरण्यास सोयीस्कर असेल असा हेडसड वापरला जाईल. शिवाय वेगवेगळे व्हिज्युअलायझेशनही वापरले जातील आणि ३० मिनिटांपेक्षा जास्त कालावधीसाठी हे तंत्रज्ञान कितपत फायदेशी ठरते हेदेखील पाहिलं जाईल.”, असं डॉ. मेलिसा वाँग  यांनी सांगितलं.

हेदेखील वाचा - हेल्दी म्हणून मुलांना ज्युस देताय, मुलांचं आरोग्य धोक्यात घालताय

First published:

Tags: Child labour, Pregnant woman, Women delivery