• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • लग्नानंतर कौमार्य सिद्ध करण्याच्या दबावात मुली उचलताहेत हे भयंकर पाऊल, वाचा काय आहे प्रकार

लग्नानंतर कौमार्य सिद्ध करण्याच्या दबावात मुली उचलताहेत हे भयंकर पाऊल, वाचा काय आहे प्रकार

सहसा मुली हे काम लग्नापूर्वी करतात. खासदार रिचर्ड होल्डन यांनी या दोन पद्धतींवर बंदी घालण्यासाठी आरोग्य आणि काळजी विधेयक मांडलं आहे. या विधेयकावर स्वाक्षरी करणाऱ्या 51 सदस्यांमध्ये हिगिनबोथम आणि मिस ब्रिटक्लिफ यांचा समावेश आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : इंग्लंडमधील बर्नले येथे कौमार्य चाचणीचा (virginity test) मुद्दा जोर पकडत आहे. ब्रिटीश खासदार अँटनी हिगिनबोथम आणि त्यांच्या मदतनीस सारा ब्रिटक्लिफ क्रॉस-पार्टी युतीमध्ये सामील झाल्या आहेत. हे खासदार सातत्याने हायमेन रिपेअर सर्जरी (Hymen repair surgery) बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी करत आहेत. सध्या, 'कौमार्य चाचणी' (virginity test) आणि हायमेन ‘रिपेअर’ सर्जरी किंवा हायमेनोप्लास्टी (Hymenoplasty) दोन्ही येथे कायदेशीर आहेत. यूकेमधील डॉक्टर 'कौमार्य तपासणी' किंवा 'हायमेन दुरुस्ती' करतात. सहसा मुली हे काम लग्नापूर्वी करतात. खासदार रिचर्ड होल्डन यांनी या दोन पद्धतींवर बंदी घालण्यासाठी आरोग्य आणि काळजी विधेयक मांडलं आहे. या विधेयकावर स्वाक्षरी करणाऱ्या 51 सदस्यांमध्ये हिगिनबोथम आणि मिस ब्रिटक्लिफ यांचा समावेश आहे. हिगिनबोथम म्हणाले, "स्त्रिया आणि मुलींनी 'विवाहाच्या पहिल्या आपल्याला रात्री रक्तस्त्राव होणे आवश्यक आहे' या कल्पनेपासून स्वतःला मुक्त केलं पाहिजे." या वेदनादायक पद्धतींना वैद्यकीय शास्त्राचा कोणताही आधार नाही. अशा पद्धती केवळ स्त्रियांना हानी पोहचवतात आणि 'शुद्धते'विषयी धोकादायक समज निर्माण करतात. 'कौमार्य चाचणी' आणि हायमेन 'दुरुस्ती' शस्त्रक्रिया दोन्ही टाळण्यासाठी आपण त्वरित पावले उचलली पाहिजेत. मी सरकारला विनंती करतो की महिला आणि मुलींवरील हा हिंसाचार संपवावा.’ हे वाचा - Narendra Modi Birthday: मीराबाई, सायना आणि या भारतीय खेळाडूंनी पंतप्रधान मोदींना अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! होल्डन यांनी हिगिनबोथम आणि ब्रिटक्लिफ यांनी या विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, 'आरोग्य आणि सामाजिक काळजी विधेयक ही गैरप्रकारांवर बंदी घालण्याची उत्तम संधी आहे. महिला आणि मुलींवरील हिंसाचाराचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं ही बाब खूप चांगली आहे. त्याचवेळी, रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनेकोलॉजिस्ट असोसिएशनचे म्हणणे आहे की, येथील महिलांना अशा प्रक्रिया स्वीकारण्यास भाग पाडले जातं किंवा त्यांनी स्वत: नाईलाजास्तव सक्तीनं अशी पावलं उचलली आहेत. त्यांच्यावर त्यांच्या लग्नाच्या रात्री शारीरिक संबंधांनंतर रक्तस्त्राव होण्याचा दबाव आहे, जेणेकरून त्या त्यांच्या पतीसमोर कुमारी असल्याचं सिद्ध करू शकतील. महिलांना अन्यायकारक प्रथेपासून वाचवण्यासाठी असोसिएशननं यूकेमध्ये कौमार्य चाचणी आणि हायमेनोप्लास्टीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: