विराट कोहलीनं का सोडलं दूध, दही आणि पनीर? जाणून घ्या कारण

विराट कोहलीनं का सोडलं दूध, दही आणि पनीर? जाणून घ्या कारण

विराटनं गेल्या वर्षापासून वेगन डाएट सुरू केलंय. म्हणजे त्यानं अॅनिमल प्रोटिन घेणं बंद केलंय.

 • Share this:

मुंबई, 06 मार्च : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं आॅस्ट्रेलियाबरोबरच्या नागपूरला खेळलेल्या सामन्यात शतक काढलंय. त्याच्या या शतकाची गरज होतीच. एका बाजूला विकेट पडत होत्या आणि दुसऱ्या बाजूला कप्तानानं सर्व जबाबदारी उचलत भारताला विजय मिळवून दिला. पण तुम्हाला कल्पना आहे का, की विराट कोहली वेगन डाएटवर आहे.

विराटनं गेल्या वर्षापासून वेगन डाएट सुरू केलंय. म्हणजे त्यानं अॅनिमल प्रोटिन घेणं बंद केलंय. हे डाएट करणारी व्यक्ती प्राण्यांपासून मिळणारं दूधही घेत नाही. त्याबरोबर अंड, दूध, पनीर, चीज, दही, आइस्क्रीम हेही खात नाही.

वेगन डाएट घेणारी व्यक्ती प्रोटिन्सची गरज धान्य, डाळ, शेंगदाणे, फळं यांचं सेवन करून पूर्ण करतात. पालेभाज्या, पालक, नट्स, सीड्स, स्प्राउट, टोफू, 108 अंश फॅरेनाइटवर शिजवलेल्या किंवा उकडलेल्या भाज्या या डाएटचा महत्त्वाचा भाग असतो. यामुळे पचनसंस्था चांगली राहते.

वेगन डाएट शाकाहारी असतो. वजन कमी करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. यात तुम्ही खात असलेल्या अन्नातून कॅलरीज मिळतात. पण फॅट जमा होत नाही.

या डाएटमध्ये विराटनं डेअरी प्राॅडक्ट बंद केलंय. तो फक्त प्रोटिन शेक, भाज्या आणि सोया खातो. या डाएटमुळे त्याला खूप चांगलं वाटतं, निरोगी वाटतं, असं तो म्हणाला. गेले काही दिवस त्याचा खेळही सुधारलाय.

वेगन डाएटमध्ये खाणाऱ्या पदार्थांमध्ये फायबर आणि प्रोटिन असतं. ते खाल्यानं शरीराला भरपूर कॅलरीज मिळतात. पोट लवकर भरतं आणि भूक कमी लागते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खाणं होत नाही.

कोहलीबद्दल म्हटलं जातं की, तो आपल्या खेळासाठी जितका वेळ देतो, तेवढीच मेहनत स्वत:च्या फिटनेसवर घेतो. दोन वर्षांपूर्वी कोहली सर्वसाधारण डाएटवर होता. त्यावेळी तो म्हणाला होता, संधी मिळाली तर मी पूर्ण शाकाहारी बनेन.

हे वेगन डाएट काय आहे?

 •  या डाएटमधल्या पदार्थांमध्ये प्रोटिन आणि आयर्न असतं. त्यानं तुमची एनर्जी वाढते. थकावट जाणवत नाही.
 • अँटिआॅक्सिडेंट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असलेल्या पदार्थांमुळे बाॅडी डिटाॅक्स होतं.
 • या डाएटमध्ये भाज्या, फळं, बिन्स, डाळ, धान्य, ब्राऊन राइस आणि नट्स असतात
 • हिरव्या भाज्यांमध्ये कमी फॅट कॅलरीज, मॅग्नेशियम, आयर्न आणि कॅल्शियम भरपूर असतं. यामुळे चरबी तर तयार होत नाहीच, पण शरीरातले विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात.
 • बिन्स आणि डाळीत फायबर आणि सॅच्यरेटेड फॅट असतं. त्यामुळे वजन कमी होतं. डाळीतलं  प्रोटिन आणि फायबर खूप काळपोटात राहतं. पचनाला मदत करतं.
 • धान्य आणि ब्राऊन राइसमध्ये फायबर, मॅग्नेशियमव्यतिरिक्त आयर्न, झिंक, व्हिटॅमिन बी, ई असतं. त्यामुळे काॅलेस्ट्राॅल नियंत्रणात राहतं.

यात वेगन प्रोटिन असतं

 • चणे
 • बटाटे
 • हिरवे वाटाणे
 • पिनट बटर
 • बदाम
 • आक्रोड
 • काजू
 • ब्राझील नट्स
 • भोपळ्याच्या बिया
 • पालक
 • ब्रोकोली

या दिग्गजांनी केलंय वेगन डाएट

-टेनिस स्टार्स व्हिनस आणि सेरेना विलियम्स

-लियोनेल मॅस्सी (फक्त वर्ल्ड कपसाठी)

-एक्स-स्प्रिंटर कार्ल लुइस

-फार्मूला 1 चँपियन, लुईस हॅमिल्टन

-बास्केटबॅाल खेळाडू काइरी ईरविंग

-स्ट्राइकर सर्जियो एगुएरो

-मिक्सड मार्शल आर्टिस्ट नेट डियाज

या बाॅलिवूड स्टार्सनी वेगन डाएट घेतलंय

-आमिर खान

-सोनम कपूर

-सोनाक्षी सिन्हा

-कंगना रनौत

-जॅकलीन फर्नांडिस

 

First published: March 6, 2019, 1:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading