• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Shirt button : पुरुषांच्या शर्टची बटणे उजव्या तर महिलांची डाव्या बाजूला का असतात?

Shirt button : पुरुषांच्या शर्टची बटणे उजव्या तर महिलांची डाव्या बाजूला का असतात?

जर तुम्ही महिलांसाठी शिवलेला शर्ट घातला असेल तर त्याची बटणे डाव्या बाजूला असतात (Women's shirt buttons on the left) तर पुरुषांच्या शर्टची बटणे उजवीकडे (Men's shirt buttons on the right) असतात. शर्टची बटणाची बाजू सांगते की तो महिलेचा आहे की पुरुषाचा. पण दोन्ही शर्टला वेगवेगळी बटणे का असतात?

 • Share this:
  मुंबई, 19 नोव्हेंबर : जगातील एक मोठी लोकसंख्या शर्ट घालते. इतिहास पाहिला तर बऱ्याच काळापासून लोकं शर्ट घालत आले आहेत. कारण, हा प्रकार आरामदायक असून इतर कपड्यांच्या तुलनेत लूकच्या बाबतीत अधिक चांगला दिसतो. त्यामुळेच स्त्री आणि पुरुष दोघेही हा शर्ट घालताना पहायला मिळतात. पण, तुमच्या शर्टचे बटण कोणत्या बाजूला आहे (Facts about Buttons of Shirts) यावर तुम्ही कधी विचार केलाय का? जर तुम्ही महिलांसाठी बनवलेला शर्ट घातला असेल तर त्याची बटणे डाव्या बाजूला असतात (Women’s shirt buttons on the left) तर पुरुषांच्या शर्टची बटणे उजवीकडे (Men’s shirt buttons on the right) असतात. यामागे अनेक रंजक कारणे आहेत जी वर्षानुवर्षे चर्चेत आहेत. शर्टची बटणाची बाजू सांगते की तो महिलेचा आहे की पुरुषाचा. पण दोन्ही शर्टला वेगवेगळी बटणे का असतात? या प्रश्नामागील कारणे प्रसिद्ध आहेत, त्यांचा कोणताही ठोस पुरावा नाही, किंवा त्यांना योग्य स्पष्टीकरण म्हणता येणार नाही. पण, वर्षानुवर्षे ही कारणं प्रचलित आहेत, त्यामुळे लोकं त्यांना खरे मानू लागले आहेत. यातील काही महत्वाच्या कारणांबद्दल आपण जाणून घेऊया. महिलांच्या शर्टची बटणे डावीकडे का असतात? Women’s shirt buttons on the left जुन्या काळी जेव्हा नवनवीन प्रकारचे कपडे शिवले जात होते, तेव्हा महिलांचे कपडे अतिशय गुंतागुंतीचे होती, जी घालणं फार कठीण होते. पुरुष स्वतःची कपडे स्वतःच घालत असत. मात्र, महिलांना कपडे घालण्यासाठी नोकरांची आवश्यकता होती. त्यामुळे डावीकडे बटण लावण्याचे एक कारण हे आहे की जेव्हा दासी त्यांच्या मालकिणीचे कपडे घालतात किंवा त्यांच्या कपड्यांचे बटण लावतात तेव्हा त्यांना उजव्या हाताने उलटे बटण लावता आले पाहिजे. नवऱ्याने आवडीचा शर्ट न शिवल्याने दुखावली अन्...; पत्नीने आयुष्याचा केला भयावह शेवट महिलांना काम करण्यासाठी मदत व्हावी असाही एक सिद्धांत आहे की स्त्रिया सहसा स्तनपान करताना आपल्या बाळाला डाव्या हातात धरतात आणि उजव्या हाताने काही इतर कामे देखील करतात. त्यामुळे उजव्या हाताने बटण काढता यावे म्हणून शर्टाचे बटण डाव्या बाजूला लावले जाते. याशिवाय, एक सामान्य सिद्धांत असा आहे की जेव्हा महिलांचे शर्ट बनवायला सुरुवात झाली तेव्हा त्यात डावीकडे बटण लावली गेली जेणेकरून ते पुरुषांच्या शर्टपेक्षा वेगळे दिसतील. मुलींच्या शर्टला का नसतो खिसा? तुम्हालाही पडला असेल हा प्रश्न तर वाचा.. पुरुषांच्या शर्टची बटणे उजव्या बाजूला का असतात? Men’s shirt buttons on the right यामागील मुख्य सिद्धांत असा आहे की, जुन्या काळी जेव्हा पुरुष युद्धात जात असत तेव्हा उजव्या हातात तलवार धरत असत. त्याची तलवार डाव्या बाजूला टांगलेली असायची आणि ती काढण्यासाठी त्याचा उजवा हात वापरला जायचा. त्यामुळे डाव्या हाताने ती सहज उघडता यावीत म्हणून उजव्या बाजूला बटणे ठेवण्यात आली होती. आणि तलवार काढताना बटण तुटली जाऊ नये.
  Published by:Rahul Punde
  First published: