मुंबई, 26 मार्च: सध्या उन्हाळा सुरु झाल्याने सूर्यनारायणाचा प्रकोप वाढत चालला. प्रत्येकाच्या अंगाची अक्षरश: लाहीलाही होत आहे. या उन्हापासून बचावासाठी प्रत्येक जण नव नव्या क्लृप्त्या वापरत आहे. डोक्यावर टोपी, छत्री घेऊन बाहेर पडत आहे. तर घशाला पडलेली कोरड दूर करण्यासाठी पाणी, कोल्ड्रिंग, सरबत याचा आसरा घेत आहे. हे सगळं झालं माणसांबाबत..पण मुक्या प्राण्याचं काय? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सोशल मीडियावर तहानलेल्या कावळ्याचा व्हिडिओ (Viral Video) चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला तहानलेल्या कावळ्याचा व्हिडिओ प्रेरणा देणारा आहे.
लहानपणी ऐकलेल्या गोष्टीतला कावळा आता अॅडव्हान्स झाला आहे. कावळाही आता नव्या टेक्निक वापरायला शिकला आहे. चोचीने दगड उचलून मडक्यात टाकून घाम गाळायचा त्याला कंटाळा आला आहे. यासाठी कावळोबाने सरळ नळ उघडून पाणी पिण्याची आयडिया शिकून घेतली आहे. आपल्या चोचीने नळ उघडून आपली तहान भागवली आहे.
🐦 💦 Let the clever crow show you how to get tap water !#funny #birds pic.twitter.com/hmyiFC91VH
— ༺❆ᗙ Martin 🏳️⚧️ ᗛ❆༻ ¸.•*´¯*⊱• ⁛҉ (@KlatuBaradaNiko) March 24, 2021
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Video viral