Viral Video: जे गायीला कळलं ते तुम्हाला कधी कळणार, प्रिती झिंटाने व्हिडीओ शेअर करत विचारला प्रश्न

सध्या या व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर होत असून अनेकांनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 6, 2019 06:49 PM IST

Viral Video: जे गायीला कळलं ते तुम्हाला कधी कळणार, प्रिती झिंटाने व्हिडीओ शेअर करत विचारला प्रश्न

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या लाइमलाइटपासून दूर आहे. ती सोशल मीडियावरही फार क्वचितच काही शेअर करते. पण नुकताच तिने ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे तिने शेअर केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून तिने लोकांना काही शिकण्याचा सल्ला दिला आहे. तिच्या या व्हिडीओला तुफान लाइक आणि कमेन्ट मिळत आहेत. प्रितीने एका गाईचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही गाय रहदारीचे नियम पाळताना दिसत आहे.

प्रिती झिंटाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक गाय रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसते. पण जेव्हा तिला लाल लाइट सुरू झाल्यावर ती इतर वाहनांप्रमाणे स्वतः उभी राहते. प्रितीने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, 'आता या गायीला बघून रहदारीचे नियम कसे पाळले जातात ते शिका. लोकांचं सोडा आपल्या गायीही रहदारीच्या नियमांचं पालन करतात. जर तुमचा विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ नक्की पाहा.' सध्या या व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर होत असून अनेकांनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी नवे रहदारीचे नियम राबवण्यात आले आहेत.

Loading...

काय आहेत नवे रहदारीचे नियम-

- अल्पवयीन मुलांनी गाडी चालवल्यास 25 हजार रुपये दंड तसेच गाडीचं रजिस्ट्रेशनही रद्द करण्यात येईल. याशिवाय अल्पवयीन मुलांना वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही.

- हेल्मेटशिवाय दुचाकी चावल्यास 500 ते 1500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. याआधी हा दंड 100 ते 300 रुपये एवढा होता.

- दुचाकी वाहनावर तिघंजण बसून वाहन चालवताना दिसल्यास 500 रुपये दंड आकारला जाईल. याआधी हा दंड 100 रुपये होता.

- प्रदुषण प्रमाणपत्र नसल्यास 500 रुपये दंड आकारला जाईल. याआधी हा दंड 100 रुपये होता.

- लायसन्सशिवाय गाडी चावल्यास 5 हजार रुपये दंड आकारला जाईल. याआधी 500 रुपये दंड आकारला जात होता.

- जीवघेण्या पद्धतीने गाडी चालवल्यास आता 1 हजार ऐवजी 5 हजार रुपये दंड आकारला जाईल.

- गाडी चालवताना फोनवर बोलताना आढळल्यास आता 1 हजार ऐवजी 5 हजार रुपये दंड आकारला जाईल.

- चुकीच्या दिशेने ड्रायव्हिंग करताना दिसल्यास 1 हजार 100 रुपयांऐवजी 5 हजार रुपये दंड आकारला जाईल.

- सिग्नल तोडल्यास 10 हजार रुपयांचा दंड होईल. याआधी हा दंड 1 हजार रुपये होता.

- सीट बेल्ट लावला नसल्यास आता 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.

Breast Cancer Awareness Month: जाणून घ्या Breast Cancer ची लक्षणं

तब्बल 400 तास लावून टॉयलेट पेपरपासून तयार केलेला वेडिंग ड्रेस पाहिलात का?

हे आहेत जगातील सर्वात धोकादायक देश! इथे जायची हिंमत तुम्ही दाखवाल का...

VIDEO : माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 06:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...