लतादीदींचं गाणं गाणाऱ्या रस्त्यावरच्या गायिकेचा थक्क करणारा मेकओव्हर; आयुष्य एका Viral VIDEO ने बदललं

रस्त्यावरची एक महिला लतादीदींचं 'एक प्यार का नगमा है' गात होती. लोक तिला पैसे देत होते. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. पुढे काय झालं पाहा....

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2019 10:13 PM IST

लतादीदींचं गाणं गाणाऱ्या रस्त्यावरच्या गायिकेचा थक्क करणारा मेकओव्हर; आयुष्य एका Viral VIDEO ने बदललं

काही दिवसांपूर्वी लता मंगेशकरांचं एक गाणं अगदी हुबेहूब तसंच गाणाऱ्या या रस्त्यावरच्या गायिकेचा व्हिडिओ तुम्ही कदाचित पाहिला असेल. ओळखताही येणार नाही एवढा बदल तिच्यात झालाय. निमित्त ठरला तो व्हायरल व्हिडिओ

गेल्या आठवड्यात या बाईचा या अवस्थेत रस्त्यावर गातानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवर एक महिला लतादीदींचं 'एक प्यार का नगमा है' गात होती.

लता मंगेशकरांचं अवघड गाणंही ती अगदी सहजतेने गात होती. तिचं आवाज ऐकून आश्चर्यचकित झालेल्या एकाने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. 20 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आणि रस्त्यावरची ही गायिका अचानक प्रसिद्ध झाली.

काही दिवसांपूर्वी तिची अवस्था किती वाईट होती हे फोटो पाहून कुणाला खरं वाटणार नाही.

Loading...

हा व्हिडिओ ऐकून एका इव्हेंट कंपनीने तिला गाठलं आणि मुंबईत एका गाण्याच्या कार्यक्रमात गाण्यासाठी तिला तयार केलं. तिचा मेकओव्हरही त्यांनी केलाय. ही कंपनीच तिला स्पॉन्सर करणार आहे.

या रस्त्यावरच्या बाईचं नाव राणू असं आहे. ती बंगाली आहे. मुंबईत बबलू मंडल नावाच्या इसमाशी राणूचं लग्न झालं.

पतीच्या निधनानंतर ती बंगालमध्ये परतली आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर गाणी गाऊन तिने गुजराण करायला लागली.

राणाघाट स्टेशनबाहेर लतादीदींचं 'एक प्यार का नगमा है' गात असतानाचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि तिचं आयुष्य पालटलं. आता ओळखू येणार नाही, असं तिचं रूप आणि अवस्था बदलली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 10:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...