लसूण सोलण्याचा हा व्हिडिओ होतोय VIRAL, आतापर्यंत 1 अब्ज लोकांनी पाहिला

सोशल मीडियावर कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल काही सांगता येत नाही. तुम्हाला जी गोष्ट निरर्थक वाटते नेमकी त्याच गोष्टी सोशल मीडियावर चघळून बोलल्या जातात.

News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2019 06:51 PM IST

लसूण सोलण्याचा हा व्हिडिओ होतोय VIRAL, आतापर्यंत 1 अब्ज लोकांनी पाहिला

सोशल मीडियावर कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल काही सांगता येत नाही. तुम्हाला जी गोष्ट निरर्थक वाटते नेमकी त्याच गोष्टी सोशल मीडियावर चघळून बोलल्या जातात. आतापर्यंत तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील ज्यात फळं आणि भाज्या अगदी सोप्या पद्धतीने चिरल्या जातात. पण सध्या सोशल मीडियावर लसूण सोलण्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. लसूण सोलण्याची एक अनोखी पद्धत यात दाखवण्यात आली आहे. यात चाकू लसूणमध्ये टाकून जोरात ओढायचा, ज्यामुळे लसूण आपोआप सोलून बाहेर येतं.

तुम्हाला वाटलं असेल की यात काय मोठी गोष्ट. कारण आतापर्यंत तुम्ही लसूण पाण्यात टाकून, त्याचं वरचं टोक कापून आणि एखाद्या डब्यात लसणाच्या पाकळ्या टाकून ते जोरात हलवून लसूण सोलताना पाहिलं असेल. पण ही पद्धत फार वेगळी आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 1 अब्ज 70 कोटी लोकांनी पाहिला आहे आणि जवळपास 5 लाखांहून जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाइकही केला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे.

Loading...

लसूण सोलण्याच्या या अनोख्या पद्धतीवर लोकांचे रिअॅक्शनही भन्नाट आले आहेत. Jill Wine-Banks नावाच्या यूझरने लिहिले की, त्याने लसूण सोलण्याच्या यंत्रासाठी आतापर्यंत हजारो रुपये खर्च केले आणि आता जाऊन हा पर्याय शिकला. याने एका क्षणात सोप्या पद्धतीने लसूण सोलून होतं. यूझरचे अजून काही रिअॅक्शनही पाहू...

Parle G कंपनीत काम करणाऱ्या 10 हजार लोकांची जाऊ शकते नोकरी, काय आहे पूर्ण प्रकरण

Period च्या दुखण्याला आता या तेलामुळे मिळेल आराम, एकदा वापरून पाहा!

रात्री चांगली झोप घेण्यात भारतीय अव्वल- आंतरराष्ट्रीय सर्व्हे

प्रेमात सीरियस नसतात या राशीची लोकं, जोडीदाराची करू शकतात सहज फसवणूक

कपडे काढून दाखवू का? पुण्यात दारूड्या महिलेची पोलिसांनाच शिवीगाळ पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 04:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...