17 फुट लांब अजगर चढला पर्यटकांच्या गाडीवर, पाहा हा VIRAL VIDEO

17 फुट लांब अजगर चढला पर्यटकांच्या गाडीवर, पाहा हा VIRAL VIDEO

कॅमेरामनने अजगराची शेपटी पकडून त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला पण त्याला फारसं यश मिळालं नाही.

  • Share this:

दक्षिण आफ्रिकेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात एक मोठा अजगर गाडीवर चढताना दिसत आहे. जसा अजगर गाडीवर चढला तेव्हा गाडीत बसलेले घाबरले. डरबन येथील एका कच्चा रस्त्यावर एक लँड रोवर गाडी उभी होती. अजगर पुढच्या चाकावरून चढत बोनेटवर चढताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.  सध्या अजगरचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रत्येकजण याच्याबद्दलच बोलताना दिसत आहेत.

रिपोर्टनुसार, मोजाम्बिक येथून सुट्टीचा आनंद लुटून पर्यटक घरी परतत होते. रस्त्यात त्यांच्या समोर एक मोठा अजगर आला. त्यावेळी गाडी उभीच होती. काही कळायच्या आत अजगर चाकावरून चढून गाडीच्या समोर बोनेटवर आला. कॅमेरामनने अजगराची शेपटी पकडून त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला पण त्याला फारसं यश मिळालं नाही. चालकाने लगेच गाडी मागे नेली, पण तरीही अजगराने गाडीचा पाठलाग करणं काही सोडलं नाही. अखेर गाडी फार मागे गेल्यानंतर अजगर झुडपांत निघून गेला.

जुलैमध्येही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात एक साप गाडीवर चढताना दिसत होता. त्यावेळी गाडीत दोन लोक बसलेले असताना साप विन्डशील्डवर येऊन  बसला होता. गाडीत बसलेल्या व्यक्तिने वायपरच्या मदतीने सापाला गाडीपासून दूर केलं.

..तर होणार थेट तुरुंगात रवानगी,या सरकारचं नवं फर्मान वाचून तुम्हालाही बसेल धक्का

LIVE TV वर रिपोर्टरला केलं किस, व्हिडीओ झाला व्हायरल

VIDEO: 'पक्षासोबत प्रामाणिक राहणं गुन्हा असेल तर तो मी केलाय'; खडसेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2019 04:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading