मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /या Photo मध्ये दडलेत 6 Christmas gift; तुम्ही शोधून दाखवलं तर...

या Photo मध्ये दडलेत 6 Christmas gift; तुम्ही शोधून दाखवलं तर...

Christmas Puzzle challenge - ख्रिसमसच्या या फोटोत तुम्हाला गिफ्ट सापडत आहेत का शोधा.

Christmas Puzzle challenge - ख्रिसमसच्या या फोटोत तुम्हाला गिफ्ट सापडत आहेत का शोधा.

Christmas Puzzle challenge - ख्रिसमसच्या या फोटोत तुम्हाला गिफ्ट सापडत आहेत का शोधा.

मुंबई, 12 डिसेंबर : आता ख्रिसमस (Christmas 2021) तोंडावर आळा आहे. त्यामुळे जगभरातील लोक आता या सणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ख्रिसमसची जोरदार तयरी सुरू आहे. सोशल मीडियावरही ख्रिसमसचा फिव्हर पाहायला मिळतो आहे. ख्रिसमसशी संबंधित एक पजल सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतो आहे (Christmas puzzle). फोटोमधून ख्रिसमसचं गिफ्ट शोधण्याचं चॅलेंज या फोटोत देण्यात आलं आहे (Find in photo challenge).

हा जो तुम्ही फोटो पाहत आहात त्यात तब्बल सहा ख्रिसमसचे गिफ्ट आहेत (6 Christmas Boxes Hidden In Image). वेगवेगळ्या ठिकाणी हे गिफ्ट्स ठेवण्यात आले आहेत. तुम्हाला हे गिफ्ट्स शोधायचे आहेत. तेसुद्धा 90 सेकंदात. तुम्हीही ख्रिसमसची उत्सुकतेने वाट पाहत असाल तर तुम्हालाही हे पझल सॉल्व्ह करायला नक्कीच आवडेल.

इंटीरियर एक्सपर्ट Furniturebox ने हे पझल तयार केलं आहे. यात सांता लोकांना गिफ्ट्स देण्यासाठी निघतो. घाईघाईत तो गिफ्ट एका घरातील चिमणीतून आत टाकतो. पण गिफ्ट सर्वत्र पसरतात. फर्निचर आणि ख्रिसमस डेकोरेशनमध्ये हे गिफ्ट्स अडकले आहे. तेच तुम्हाला शोधून काढायचे आहेत.

हे वाचा - 'या' माशात अडकलाय सर्वांचा जीव! ग्राहक 3 लाख देतायेत तरी मालक विकायला तयार नाही

यासाठी तुम्हाला  90 सेकंदाची वेळ देण्यात आली आहे. सोबतच गिफ्ट्स शोधण्यासाठी हिंटही देण्यात आली आहे. गिफ्ट्स शोधण्यासाठी जरा आगीजवळ जाऊन तुमचं शरीर गरम करा, असं म्हटलं आहे.

या ब्रेनटिझरबाबत कंपनीच्या सहसंस्थापक डॅन बेकलेस आणि मोन्टेग जॉर्ज यांनी सांगितलं की गेल्यावर्षी कोरोनामुळे ख्रिसमस खूपच साधा होता. यावर्षी थोडं फेस्टिव्ह सीझन असल्यासारखं वाटतं आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत ख्रिसमसचं हे टिझर सॉल्वह करा असंही ते म्हणाले आहेत.

हे वाचा - VIDEO - बेडुकही झालं फिटनेस फ्रीक; उड्यांसोबत आता हातात DUMBBELL घेऊन EXCERCISE

जर तुम्ही या फोटोतील सर्व गिफ्ट्स शोधून काढले तर तुमचं ख्रिसमस लकी मानलं जाईल. असं त्यांनी सांगितलं. चला तर मग आता तुम्ही जरा डोकं खाजवा, तुमची नजर फोटोवर केंद्रीत करा आणि चला शोधा बरं ख्रिसमसचे गिफ्टं.

तुम्हाला सापडले का या फोटोतील गिफ्ट. सापडले तर भारीच आणि नसेल सापडलं तरी डोंट वरी. हा आणखी एक फोटो तुमच्यासाठी ज्यामध्ये तुम्हाला सर्व गिफ्ट्स दिसतील.

First published:
top videos

    Tags: Game, Lifestyle