Home /News /lifestyle /

विनायक चतुर्थीला आहे सर्वार्थ सिद्धि योग; जाणून घ्या पूजा करण्याचा विधी आणि वेळ

विनायक चतुर्थीला आहे सर्वार्थ सिद्धि योग; जाणून घ्या पूजा करण्याचा विधी आणि वेळ

विनायक चतुर्थी व्रत करतात त्यांनी पूजेच्या वेळी चतुर्थी व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी.

    नवी दिल्ली, 04 मे : वैशाख महिन्याची विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) बुधवार, 04 मे रोजी आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आहे, विनायक चतुर्थी सर्व कार्यात यश आणि सिद्धी देणारी आहे. मे 2022 ची ही पहिली चतुर्थी आहे. विनायक चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला ठेवला जातो. या दिवशी विघ्न, संकटे, दुख: दूर करणाऱ्या पहिल्या पूजनीय श्री गणेशाची पूजा केली जाते. गणपतीच्या कृपेने सर्व संकटे, त्रास दूर होतात. जे विनायक चतुर्थी व्रत करतात त्यांनी पूजेच्या वेळी चतुर्थी व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांच्याकडून विनायक चतुर्थीच्या उपवासाची पूजा, मुहूर्ताबद्दल माहिती घेतली आहे. विनायक चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग पंचांगानुसार, यावेळी वैशाख शुक्ल चतुर्थी बुधवार, 04 मे रोजी सकाळी 07:32 पासून सुरू होत आहे, ही तिथी दुसऱ्या दिवशी, 05 मे, गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत वैध आहे. उदयतिथी उपवास, उपासना इत्यादींसाठी वैध आहे, या आधारावर, चतुर्थी तारीख 04 मे रोजी आहे. या दिवशी विनायक चतुर्थी व्रत ठेवून पूजा करता येईल. विनायक चतुर्थीला संपूर्ण दिवस सर्वार्थ सिद्धी योग असतो. या योगात जे काही शुभ आणि चांगले कार्य कराल ते सफल होते. या दिवशी संपूर्ण दिवस रवि योग देखील असतो. मात्र, या दिवशी अभिजित मुहूर्त नाही. तुम्हाला 04 मे रोजी कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता. या दिवशी संध्याकाळी 05:07 पासून सुकर्म योग सुरू होत आहे. हे वाचा - या गावात जन्माला येतात फक्त मुली, वैज्ञानिकही हैराण; प्रशासनाने उचललं मोठं पाऊल विनायक चतुर्थी पूजेचा मुहूर्त - 04 मे रोजी विनायक चतुर्थीच्या गणेश पूजेचा शुभ मुहूर्त फक्त 02 तास 40 मिनिटांचा आहे. या दिवशी तुम्ही सकाळी 10.58 ते दुपारी 1.38 या वेळेत गणेशाची पूजा करू शकता. विनायक चतुर्थीला दिवसभर पूजा केली जाते. या दिवशी चंद्र पाहणे निषिद्ध मानले जाते. या दिवशी चंद्र पाहिल्यानं खोटा कलंक लागतो. विनायक चतुर्थीच्या दिवशी राहू काल दुपारी 12:18 ते दुपारी 1:58 पर्यंत असतो. या काळात पूजा वगैरे करणे टाळावे. हे वाचा - Akshay Tritiya 2022 : 100 वर्षांनी आलाय दुर्मिळ योग, अक्षय्य तृतीयेला करा हे काम (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य धार्मिक माहिती आणि संबंधित ज्योतिषी यांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ganesh chaturthi, Lifestyle, Religion

    पुढील बातम्या