VIRAL VIDEO: शॉर्ट्स घालून जाणाऱ्या मुलीला गाडी थांबवून त्याने विचारलं 'कपडे नाहीयेत का?'

VIRAL VIDEO: शॉर्ट्स घालून जाणाऱ्या मुलीला गाडी थांबवून त्याने विचारलं 'कपडे नाहीयेत का?'

महिलेच्या मते, 'पोलिसांची मानसिकताही त्या व्यक्तीसारखीच आहे. जर मी त्यांच्याकडे गेले तर ते मलाच असे कपडे न घालण्याचा सल्ला देतील आणि माझी तक्रार नोंदवून घेणार नाहीत.'

  • Share this:

बंगळुरू, 09 ऑक्टोबर- प्रत्येकाला स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्याचा पूर्ण हक्क आहे हे तर प्रत्येकजण मानतं. त्यातही ती गोष्ट स्वतःवरची असेल तर मग प्रत्येकजण हक्काच्या गोष्टी करू लागतं. पण यात मुलीच्या हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. मुलींच्या कपड्यांचा विषय येतो तेव्हा प्रत्येकजण आपआपली वेगवेगळी मतं देत असतात. कपड्यांवरून मुली फक्त पुरुषांकडूनच नाही तर इतर महिलांकडूनही टोमणे ऐकत असतात. 28 वर्षांच्या मुलीला तिच्या कपड्यांवरून भर रस्त्यात अज्ञात व्यक्तीकडून ऐकावं लागलं. मुळची मुंबईची असलेली आणि बंगळुरू येथे कामानिमित्त गेलेल्या त्या मुलीने टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातले होते. ती व्यवसायाने इंजीनिअर आहे. घटनेचा संपूर्ण व्हिडीओ मुलीच्या मित्राने रेकॉर्ड केला आणि आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला.

माहितीनुसार, ती मुलगी गुरुवारी रात्री बाइकवरून जात होती. तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने तिला रोखलं आणि अचानक तिच्यावर ओरडायला लागला. त्याने महिलेवर 'भारतीय नियमांचं' पालन न केल्याचा आरोप केला. फेसबुक पोस्टनुसार, 'त्या अज्ञात व्यक्तीने मुलीवर ओरडत विचारलं की, तू भारतीय आहेस का? असशील तर भारतीय नियमांचं पालन करं.' ही घटना बंगळुरू येथील एचएसआर लेआउट परिसरातील आहे.

ती व्यक्ती मुलीला म्हणाली की, 'तुझ्या घरी कपडे नाहीयेत का?' जेव्हा मुलीने पोलिसांकडे जायचं म्हटलं तेव्हा अज्ञात व्यक्तीने तिकडून पळ काढला. मुलीच्या मित्राने फेसबुकवर लिहिले की, तो माणूस नशेत नव्हता आणि शिक्षितही दिसत होता. असं असतानाही एका मुलीला भररस्त्यात रोखून तिच्या कपड्यांवरून टोमणे मारत होता.

द न्यूज मिनिटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात मुलीची बाजू मांडताना म्हटलं की, 'मी कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज ऐकला. मी गाडीच्या मागे बसले होते तेव्हाच मी उजव्या बाजूला पाहिलं. टू- व्हीलरवर एक माणूस होता आणि तो माझ्यावर सतत ओरडत होता. 'तुझ्या घरी कपडे नाहीयेत का' असा प्रश्न त्याने मला विचारला. मी जेव्हा त्याला त्याचा काय प्रॉब्लेम आहे असं विचारलं तर तो माझ्यावर अधिक जोरात ओरडू लागला. भारतीय महिलांनी अशाप्रकारचे कपडे घालू नये असं तो सांगू लागला. मला हे कळलं नाही की माझ्या कपड्यांनी त्याला काय प्रॉब्लेम होता.'

या प्रकरणी महिलेने कोणतीही पोलीस तक्रार केली नाही. कारण तिच्यामते याचा कोणताच उपयोग होणार नाही आणि पोलीस अधिकारी त्या व्यक्तीच समर्थन करतील. महिलेच्या मते, 'पोलिसांची मानसिकताही त्या व्यक्तीसारखीच आहे. जर मी त्यांच्याकडे गेले तर ते मलाच असे कपडे  न घालण्याचा सल्ला देतील आणि माझी तक्रार नोंदवून घेणार नाहीत.'

देशातील या बँकांमध्ये मिळतंय 9 टक्क्यांनी व्याज, लवकर घ्या फायदा

या देशात प्रेम करायला मिळते सुट्टी, जाणून घ्या कोणती आहे ती जागा...

फ्लाइटसारख्या सीट आणि ऑटोमॅटिक डोअर, कोकणात जाणाऱ्या या गाडीचे पाहा INSIDE PHOTO

कुत्र्यांना फिरवायला गेलेल्या व्यक्तीवर कोसळली वीज, पाहा हा धक्कादायक VIRAL VIDEO

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2019 12:42 PM IST

ताज्या बातम्या