मुंबई, 30 जानेवारी : World wrestling entertainment च्या (WWE) माध्यमातून जगभरात लोकप्रिय (popular) असलेलं नाव म्हणजे 'द ग्रेट खली'. खलीचे (Khali) असंख्य चाहते जगभरात पसरलेले आहेत. खलीसुद्धा सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो विविध फोटो आणि व्हीडिओजच्या माध्यमातून आपल्या अपडेट्स देत राहतो.
आता नुकताच खलीचा एक व्हिडीओ खूप व्हायरल (viral video) झाला. हा त्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून (Instagram account) शेअर केला आहे. या व्हिडीओला लोक भरभरून कमेंट्स आणि लाईक्स देण्यासह तो शेअरसुद्धा करत आहेत.
या व्हीडिओमध्ये खली एक बुलेट (bullet) चालवत आहे. अगदी ओबडधोबड रस्त्यावर खली एकदम आत्मविश्वासानं बुलेट भरधाव चालवताना दिसतो. रेसलिंगच्या जगात खलीचं नाव खूप मोठं आहे. आपल्या खासगी आयुष्यात खली अतिशय शांत, कूल माईंडेड असं व्यक्तिमत्व आहे. लोकांना खलीचा परफॉर्मन्स आवडतोच, मात्र सोबत त्यांचं व्यक्तिमत्वही खूप भावतं.
View this post on Instagram
हा व्हीडिओ पोस्ट करताना खलीनं कॅप्शन लिहिलं आहे, 'टेम्पररी प्यार'. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एकानं व्हीडिओ शेअर करताना लिहिलं आहे, 'घोस्ट रायडर'. दुसरा लिहितो, 'मलापण बुलेट चालवायला शिकवा ना'
द ग्रेट खली एक व्यावसायिक पैलवान आहे. खलीचा जन्म 27 ऑगस्ट 1972 मध्ये हिमाचल प्रदेशात (Himachal pradesh) झाला. त्याचं खरं नाव दिलीप सिंह राणा आहे. त्यांचं लहानपण प्रचंड हलाखी आणि संघर्षात गेलं. 2 जानेवारी 2006 रोजी WWE च्या करारावर सही करणारा खली पहिला भारतीय पैलवान ठरला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram