मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Cancer उपचारांमध्ये व्हायग्राचा वापर होण्याची शक्यता, जाणून घ्या, अधिक माहिती

Cancer उपचारांमध्ये व्हायग्राचा वापर होण्याची शक्यता, जाणून घ्या, अधिक माहिती

viagra tablet

viagra tablet

व्हायग्राची गोळी फक्त लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीच नाही तर एका दुर्मिळ प्रकारच्या कॅन्सरवरदेखील (Cancer) परिणामकारक ठरत असल्याचा दावा एका संशोधनात केला गेला आहे.

 नवी दिल्ली, 30 डिसेंबर: जेव्हापासून 'व्हायग्रा'नावाची (Viagra medicine) गोळी बाजारात आली आहे, तेव्हापासून ती कायम चर्चेत राहिली आहे. या औषधामुळे लाखो लोकांना लैंगिक सुखाचा (Sexual pleasure) दुपटीनं आनंद मिळाला आहे, असा दावा या औषधाबद्दल केला जात आहे. तर दुसरीकडे व्हायग्राचे अनेक दुष्परिणाम (Side effect) असल्याचंही बोललं जात आहे. सध्या जगभर सर्रासपणे व्हायग्राचा वापर केला जात आहे. इरेक्टाइल डिसफंक्शन (Erectile dysfunction) या लैंगिक समस्येसाठी व्हायग्राचा वापर केला जातो. व्हायग्राची गोळी फक्त लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीच नाही तर एका दुर्मिळ प्रकारच्या कॅन्सरवरदेखील (Cancer) परिणामकारक ठरत असल्याचा दावा एका संशोधनात केला गेला आहे.

उपलब्ध असलेल्या औषधांमधून कॅन्सरवर उपाय शोधण्याचा प्रयत्न

सायन्स डेलीच्या अहवालात ईकॅन्सर मेडिकल सायन्स (eCancer medical science) या जर्नलचा संदर्भ देऊन एका संशोधनाबाबत माहिती देण्यात आली आहे. त्या माहितीनुसार व्हायग्रामध्ये कर्करोग कमी करण्याची क्षमता आहे. सध्या त्याचं परिक्षण केलं जात आहे. 'अँटीकॅन्सर फंड बेल्जियम' आणि 'ग्लोबल क्युअर' या अमेरिकन संस्थेच्या माध्यमातून हे संशोधन केलं जात आहे. व्हायग्राच्या वापराबाबत अनेक देशांमध्ये राजकीय खलबतं सुरू असली, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमेकांच्या मदतीनं त्याची उपयुक्तता तपासली जात आहे. त्या अंतर्गत करण्यात आलेल्या संशोधनाच्या माध्यमातून सध्या उपलब्ध असलेल्या औषधांच्या सहाय्यानं कॅन्सरवर उपचार करणं शक्य आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

व्हायग्रामध्ये कॅन्सरचा सामना करण्याची क्षमता

संशोधनानुसार, अभ्यासकांनी व्हायग्रातील फॉस्फोडिस्टेरेस 5 (phosphodiesterase 5) (PDE5) या घटकामध्ये असलेली नवीन औषध बनण्याची क्षमता शोधली आहे. व्हायग्राच्या सर्व औषधांमध्ये पीडीई 5 असतं. सिल्डेनाफिल म्हणजे व्हायग्रामध्ये अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. हे औषध सर्वप्रथम 'अनजाइना' (angina) या घशाच्या समस्येसाठी विकसित करण्यात आलं होतं, अशी माहिती अँटीकॅन्सर फंडाचे डॉ. पॅन पँट्झियार्का (Dr Pan Pantziarka) यांनी दिली आहे.

त्यानंतर हे औषध इरेक्टाइल डिसफंक्शनवर प्रभावी ठरत असल्याचं लक्षात आलं. कालांतरानं फुफ्फुसातील धमनीच्या (pulmonary arterial hypertension) समस्येमध्येही वापरलं जाऊ लागलं. आता तर व्हायग्रामध्ये कॅन्सर दूर करण्याचीही क्षमता असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे भविष्यात नक्कीच कॅन्सरवरील उपचारांत या औषधाचा वापर होऊ शकतो. कारण, कॅन्सर हा असा आजार आहे, ज्यावर अद्यापही ठोस उपचार उपलब्ध झालेले नाहीत. कॅन्सर पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये असताना त्याचं निदान झाल्यास किमोथेरेपी (Chemotherapy) सारख्या उपचार पद्धतींचा वापर करून त्यापासून सुटका करून घेता येते. पहिल्या दोन स्टेजनंतर मात्र, कॅन्सवर मात करणं जवळपास अशक्यच आहे. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ कॅन्सरवर ठोस उपचार शोधण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहेत. व्हायग्राबद्दलचं हे संशोधन नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा करूया.

First published: