मुंबई, 28 जानेवारी : महिला (woman) म्हणजे नाजूक, कमजोर, कोमल हृदयाच्या. काहीही झालं तरी त्यांना लगेच भीती वाटते, लगेच रडू कोसळतं. पुरुषांप्रमाणे त्या खंबीर आणि मजबूत कधीच होऊ शकत नाहीत. असं कित्येकांना वाटतं. पण आता असा विचार करणाऱ्या प्रत्येकाला त्याचा विचार बदलायला लावणारी ही घटना. नेहमी कमजोर समजल्या जाणाऱ्या महिला कठीण प्रसंग येताच काय करू शकतात, याचा व्हिडीओ (Video) सध्या सोशल (Social Media) मीडियावर व्हायरल (Viral) होतो आहे.
एका पेट्रोल पंपवरील (Petrol Pump) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक गाडी पेट (Vehicle Caught Fire At A Petrol Pump) घेते. तेव्हा तिथं बरेच पुरुष असता आणि फक्त एक महिला असते. अशा परिस्थितीत नेमकं तिथं काय होतं, ते तुम्ही व्हिडीओतच पाहा.
व्हिडीओत पाहू शकता पेट्रोल पंपवर काही गाड्या पेट्रोल भरण्यासाठी उभ्या आहेत. तेव्हा एका ऑटोला आग लागते. आग पाहताच सर्व पुरुष तिथून आपाआपल्या गाड्या घेऊन पळ काढतात. अगदी ज्याची गाडी आहे, तोदेखील ही आग विझवण्याचा प्रयत्न करत नाही. फक्त एकटी महिलाच तिथं राहते. जी या पेट्रोल पंपवर काम करते आहे.
प्रसंगावधान राखत ती आगीवर नियंत्रण मिळवते. न घाबरता आपल्या परीनं ती आग विझवण्याचा प्रयत्न करते आणि ती आपल्या प्रयत्नात यशस्वीदेखील ठरते. तिच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. पेट्रोल पंपवरच ही आग लागली होती. त्यामुळे आग जर भडकली असती तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. पण महिलेनं तसं होऊ दिलं नाही. आग लागताच तिनं तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केल्यानं मोठी दुर्घटना होता होता टळली आहे.
इंडियन फॉरेस्ट ऑफिसर प्रवीण अंगुसामी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी या महिलेचं कौतुकही केलं आहे. आपल्या निम्म्या समस्यांचं समाधान त्याचा सामना करण्यातच आहे , त्याच्यापासून दूर पळण्यानं काही होत नाही, असं कॅप्शन त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना दिलं आहे.