मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आहारात पौष्टिक भाज्या नसतील तर, शरीर देईल असे इशारे

आहारात पौष्टिक भाज्या नसतील तर, शरीर देईल असे इशारे

प्रत्येक व्यक्तीने रोज 2 ते 3 कप हिरव्या भाज्या खायला हव्यात. भाज्या पोटात नाही गेल्या तर काय लक्षणं दिसतात वाचा.

प्रत्येक व्यक्तीने रोज 2 ते 3 कप हिरव्या भाज्या खायला हव्यात. भाज्या पोटात नाही गेल्या तर काय लक्षणं दिसतात वाचा.

प्रत्येक व्यक्तीने रोज 2 ते 3 कप हिरव्या भाज्या खायला हव्यात. भाज्या पोटात नाही गेल्या तर काय लक्षणं दिसतात वाचा.

  • myupchar
  • Last Updated :
भाज्या शरीरासाठी पौष्टिक द्रव्यांचा महत्वपूर्ण स्त्रोत आहे. जर खाण्यापिण्यात पोषक द्रव्ये नसतील तर काही दिवसात आजारपणाची लक्षणे दिसायला सुरुवात होते. आपले शरीर अनेक द्रव्यांनी बनले आहे, ही द्रव्ये आपल्याला भाज्यांमधून मिळतात. प्रत्येक व्यक्तीने रोज 2 ते 3 कप हिरव्या भाज्या खायला हव्यात. पुरुषांना रोज 38 ग्रॅम आणि महिलांना 25 ग्रॅम तंतुमय पदार्थांची आवश्यकता असते. यामुळे दोघांची भाज्यांची गरज वेगवेगळी असू शकते. पण त्या खायला मात्र हव्याच. तर चला जाणून घेवू भाज्या खाल्ल्या नाही तर काय समस्या निर्माण होतात - चेहरा उदास राहतो, मूड चांगला राहत नाही चेहरा उदास असणे आणि मूड चांगला नसणे ही एक सामान्य पण विचारात घेण्यासारखे लक्षण आहे. जेव्हा भाज्या कमी खातो तेव्हा आपण अधिक चरबी असलेले किंवा कर्बोदक असलेले भोजन घेतो. जेव्हा अति प्रमाणात चरबीयुक्त खातो किंवा कर्बोदक घेतो तेव्हा स्फूर्ती नाहीशी होते, आणि चेहरा उदास दिसू लागतो, मूडही ठीक राहत नाही. जेवण केल्याचे समाधान मिळत नाही जेवणात भाज्या नसतील तर जेवण केल्याचे समाधान लाभत नाही. पुनःपुन्हा काहीतरी खाण्याची इच्छा होत राहते. त्याने पचन बिघडते, वात, पित्त, आणि बद्धकोष्ठता या समस्या सुरु होतात. त्वचेची लकाकी जाते myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांच्यानुसार, जे लोक जास्त भाज्या खात नाहीत, त्यांच्या त्वचेवरील तजेला, लकाकी कमी होते. शरीर स्थूल होते आणि सुरकुत्या पडू लागतात. भाज्यांमधील जीवनसत्वे, क्षार, आणि एंटी-ऑक्सीडेंट शरीराला पोषण देतात, त्याने त्वचेच्या खराब झालेल्या पेशी ठीक होतात. स्नायूंच्या वेदना भाज्या कमी खाल्ल्या तर पर्यायाने चरबीयुक्त पदार्थ आणि कर्बोदक जास्त प्रमाणात खाल्ली जातात, त्याने कोलेस्ट्रॉल वाढू लागते. त्यामुळे रक्त गाढ होते आणि स्नायू आखडतात. आळस जाणवतो, स्नायूंची लवचिकता जाते. भाज्या आणि फळांमध्ये पोटेशियम असते त्यामुळे त्यांचे नियमित सेवन करायला हवे. पाचन बिघडते, डोळे कमजोर होतात myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांच्यानुसार, भाज्यांमध्ये तंतुमय पदार्थ भरपूर असतात , ते पचनाला सहाय्य करतात. तंतुमय पदार्थांमधे भाज्यांना सर्वोत्तम मानले जाते. हिरव्या पालेभाज्या, सॅलड खाण्याने पचन चांगली राहते. हेच कारण आहे कि भाज्या खाणाऱ्या लोकांमधे चपळता जास्त दिसते आणि त्यांना थकवा जाणवत नाही. जे लोक भाज्या कमी खातात, त्यांच्यात जीवनसत्वाचा अभाव असतो आणि त्यामुळे डोळे कमजोर होऊन चष्मा लवकर लागतो. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - सकस आहार न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
First published:

Tags: Lifestyle

पुढील बातम्या