Home /News /lifestyle /

चुलबुल पांडे जेव्हा भाजी विकतो...; भाजीवाल्या पांडेजीचा हटके VIDEO व्हायरल

चुलबुल पांडे जेव्हा भाजी विकतो...; भाजीवाल्या पांडेजीचा हटके VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर सध्या या भाजीवाल्या पांडेजीचीच (chulbul pandey style vegetable seller) चर्चा आहे.

    रांची, 21 मार्च :  भाजीवाला... दस रुपये पाव... असेच काहीसं आपल्याला भाजी विक्रेत्यांकडून ऐकायला मिळतं. भाजीवाले सामान्यपणे असेच ओरडतात. पण सध्या सोशल मीडियावर एक असा भाजी विक्रेता व्हायरल होतो आहे, जो हटके पद्धतीने भाजी विकतो आहे. भाजी विक्रीच्या त्याच्या या हटक स्टाईलमुळे तो सोशल मीडियावर फेमस तर झालाच आहे, शिवाय त्याचा धंदासुद्धा एकदम जोमात आहे. झारखंडच्या (Jharkhand vegetable seller) एका भाजी विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. धनबादमधील भाजी विक्रेता रितेश पांडेचा हा व्हिडीओ (ritesh pandey viral video) आहे. एका सामान्य भाजीवाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात असं आहे तरी काय? डोक्यावर पगडी, डोळ्यांवर चष्मा आणि हातात घडी घालून सलमान खानच्या चुलबुल पांडेच्या शैलीत रितेश  (ritesh pandey chulbul pande style video) भाजी विकतो आहे. सोबतच त्याच्या गाड्यावर जोरजोरात लावलेल्या म्युझिकच्या तालावर तो डान्सही करताना दिसतो. पांडेयजीच्या या स्वॅगचं मनापासून स्वागत करत आहेत. धनबादच्या हिरापूर डीएस कॉलनीत राहणारे रितेश पांडे सकाळपासून रात्री दहापर्यंत रस्त्यांवर भाजी विकतो. विशेष म्हणजे पांडेजीनं भाजी विकण्यासाठी खास गाणंही बनवलं आहे. हेही वाचा - डुक्कराच्या पेंटिगमुळे मालकीण झाली श्रीमंत; हा अनोखी प्रकार वाचून थक्क व्हाल! रितेश पांडेची युनिक स्टाईल लोकांना खूप आवडते आहे. लोक त्याच्याकडून खूप भाज्या विकत घेतात. काही लोक असेही आहेत जे पांडेजीच्या गाडीची वाट पाहतात. विविध भागांमध्ये पांडेजीची एंट्री एखाद्या बॉलिवूड हिरोसारखी होते. लोकांचं म्हणणं आहे, की पांडेजींच्या भाजीची किंमत इतरांहून जास्त नाही आणि भाज्याही एकदम ताज्या असतात. सोबतच खूप मनोरंजनही होतं.  त्याच्याकडून भाजी घेण्यासाठी लोकांची रांग लागते, पांडे यांच्या या मनोरंजनावर फिदा होत लोक भरभरून भाजी विकत घेतात. रितेश पांडे म्हणतो, की तो लोकांचं मनोरंजन करतो कारण त्याला वाटतं की लोकांनी त्यांच्याकडून भाजी विकत घ्यावी. सोबतच आपल्या कुटुंबाचं त्यांना नीट पालनपोषण करता यावं. हेही वाचा चोरी करण्याचा प्रयत्न आला अंगलट, शेवटी पोलिसांचीच घ्यावी लागली मदत पांडेजीचा 17 सेकंदांचा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ बनवणारी तरुणी एका पेट्रोल पंपावर काम करते. तिचं म्हणणं आहे की, एके दिवशी ती काम करत असताना एक माणूस नाचत-नाचत भाजी विकत होता. तिनं व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.व्हिडिओ इतका व्हायरल होईल आणि लोकांना तो इतका आवडेल, असं आपल्यालाही वाटलंही नव्हतं असं ती म्हणाली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Jharkhand, Salman khan, Viral, Viral video.

    पुढील बातम्या