• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • आहारातील स्निग्धांशाचं प्रमाण नव्हे तर त्यांचा सोर्स असतो महत्त्वाचा; नव्या संशोधनातील महत्त्वाची माहिती

आहारातील स्निग्धांशाचं प्रमाण नव्हे तर त्यांचा सोर्स असतो महत्त्वाचा; नव्या संशोधनातील महत्त्वाची माहिती

प्राण्यांपासून मिळणाऱ्या चरबी किंवा स्निग्ध पदार्थांचं जास्त प्रमाणात सेवन केल्यानं पक्षाघाताचा धोका वाढतो. तर, एका नवीन संशोधनातून असंही समोर आलंय की, वनस्पतीजन्य स्निग्धांश म्हणजेच पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटमुळं हा धोका (Vegetable fat Reduces Stroke Risk) कमी होतो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : आजच्या बदलत्या जीवनशैलीत आणि तणावामुळं 30 ते 50 वर्षे वयोगटातील लोकही स्ट्रोकच्या विळख्यात सापडत आहेत. याचं एक प्रमुख कारण म्हणजे खाण्याच्या अनियमित सवयी. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, प्राण्यांपासून मिळणाऱ्या चरबी किंवा स्निग्ध पदार्थांचं जास्त प्रमाणात सेवन केल्यानं पक्षाघाताचा धोका वाढतो. तर, एका नवीन संशोधनातून असंही समोर आलंय की, वनस्पतीजन्य स्निग्धांश म्हणजेच पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटमुळं हा धोका (Vegetable fat Reduces Stroke Risk) कमी होतो. या संशोधनाचे निष्कर्ष अमेरिकन हार्ट असोसिएशन सायंटिफिक सेशन्स 2021 (American Heart Association scientific sessions 2021) मध्ये 13 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत व्हर्च्युअल स्वरूपात सादर केले जातील. या अभ्यासात, स्ट्रोकच्या जोखमीवर भाजीपाला, दुग्धजन्य आणि गैर-दुग्धजन्य प्राणी स्त्रोतांच्या स्निग्धांशाच्या प्रभावाचं सर्वसमावेशक विश्लेषण केलं गेलंय. बोस्टनमधील हार्वर्डच्या टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील पोषण विभागातील संशोधक आणि या अभ्यासाचे लेखक फेंगलेई वांग म्हणाले, 'आमच्या अभ्यासाचे निष्कर्ष सूचित करतात की, स्ट्रोकसह इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांच्या प्रतिबंधासाठी, आहारातील स्निग्ध पदार्थांच्या प्रमाणापेक्षाही त्यांचे स्त्रोत कोणते आहेत, हे लक्षात घेणं जास्त महत्त्वाचं आहे. 'आमच्या अभ्यासाच्या निष्कर्षांवर आधारित, आम्ही लोकांना पक्षाघाताचा धोका कमी करण्यासाठी लाल मांसाचं सेवन कमी करण्याचा सल्ला देतो. तुम्ही ते वापरत असलात तरीही, प्रक्रिया केलेल्या मांसाच्या चरबीयुक्त भागांचा वापर कमी करा. अन्नामध्ये वनस्पतींपासून मिळणारं तेल, कॉर्न वापरा,' असं फेंगलेई वांग म्हणाले. अभ्यासाच्या आधारे सल्ला आणखी एक संशोधक आणि बोस्टनमधील टफ्ट्स विद्यापीठाचे प्राध्यापक. अ‍ॅलिस एच. लिक्टेनस्टीन म्हणतात, 'अनेक प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये मीठ आणि संपृक्त चरबी जास्त प्रमाणात असते. तर, वनस्पतींपासून मिळणाऱ्या स्निग्धांशात याचं प्रमाण फारच कमी असतं. या संशोधनातून असं समोर आलंय की, प्रक्रिया केलेल्या मांसाऐवजी प्रथिनांचा वापर केल्यास मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी, संपूर्ण धान्य, वनस्पती आधारित प्रथिनांसह अनेक प्रकारची फळं आणि भाज्यांचं सेवन अधिक फायदेशीर आहे. अभ्यासाचं स्वरूप या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी 1 लाख 17 हजार 136 सहभागींचा 27 वर्षे (1984 ते 2016 पर्यंत) अभ्यास केला. या अभ्यासाच्या सुरूवातीस सहभागींचं सरासरी वय 50 वर्षं होतं आणि त्यापैकी 63 टक्के महिला होत्या. यापैकी 97 लोक गोरे होते. त्यापैकी कोणालाही हृदयविकार आणि कर्करोग नव्हता. त्या सर्वांना दर चार वर्षांनी एक प्रश्नावली भरण्यास सांगितलं होतं. जेणेकरून, ते किती प्रमाणात स्निग्ध पदार्थांचं सेवन करतात आणि त्याचा स्रोत काय याची माहिती मिळू शकेल. जेवणातील स्निग्ध पदार्थांचं प्रमाण 5 गटांमध्ये विभागलं गेलं. यामध्ये रेड मीट, प्रक्रिया केलेलं मांस आणि इतर खाद्यपदार्थांच्या परिणामाचं विश्लेषण करण्यात आलं. हे वाचा - Interesting! या बेटावर राहतात फक्त महिला, चरितार्थासाठी करतात अंत्यसंस्कार असे आलेत निष्कर्ष अभ्यासादरम्यान, 6 हजार189 सहभागींना स्ट्रोक आला. यामध्ये दुग्धजन्य नसलेल्या प्राण्यांची चरबी (non-dairy animal fat) सेवन करणाऱ्यांना पक्षाघाताचा झटका अधिक प्रमाणात आला. चीज, लोणी, दूध, आइस्क्रीम आणि क्रीम यासारखे दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानं स्ट्रोकचा धोका वाढल्याचं आढळून आलेलं नाही. हे वाचा - Corona काळातल्या उपाययोजनांचा परिणाम, जगभरात जमा झाला 80 लाख टन प्लास्टिक कचरा ज्या सहभागींनी बहुतेक वनस्पतीजन्य स्निग्ध पदार्थ आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट खाल्लं त्यांच्यामध्ये स्ट्रोकची प्रकरणं 12 टक्क्यांनी कमी होती. दररोज किमान एकदा लाल मांस खाणाऱ्या सहभागींमध्ये स्ट्रोकचा धोका 8 टक्के जास्त होता. ज्या लोकांनी दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा प्रक्रिया केलेलं मांस खाल्लं त्यांना पक्षाघाताचा धोका 12 टक्के जास्त असतो.
  Published by:News18 Desk
  First published: