Vegan चा फंडा : बटर, चीजच नव्हे तर दूध, दही, पनीर आणि ताकही पित नाहीत सेलेब्रिटीज...

मांसाहारच नाही, तर प्राणीजन्य पदार्थ पूर्ण वर्ज्य करणं म्हणजे Vegan Diet. व्हिगन डाएट म्हणजे काय आणि फॉलो करणारे सेलेब्रिटी कोणकोण आहेत ते पाहा स्क्रोल करून...

  • Share this:

अनेक बॉलिवूड, हॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये Vegan होण्याचं वेड पाहायला मिळतं. फक्त सिनेसृष्टीतीलच नाही तर अनेक क्रिकेट स्टारही आता वेगन डाएट फॉलो करताना दिसतात.

शाकाहारी लोकांनाही कॅल्शियम आणि प्रोटिनसाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. पण व्हिगन लोकांना यासाठी प्रोटीन शेकवर अवलंबून राहावं लागतं. पीनट बटरसारखा ऑप्शन व्हिगन डाएट करणारे हमखास वापरतात.

सोयाबीन हा व्हिगन डाएटसाठी महत्त्वपूर्ण पदार्थ आहे. कारण यातून मिळणारं सोया मिल्क अनेक पदार्थांसाठी वापरता येतं. याशिवाय शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन हे चांगलं प्रोटीन सोर्स आहे.

टोफू हा पदार्थ पनीरला पर्याय म्हणून आपल्याकडेही रुळला आहे. टोफू सोया मिल्कपासून बनवतात. सोयाबीन हाय प्रोटिन व्हेज डाएट आहे. म्हणूनच जास्त प्रथिनं असणाऱ्या पदार्थांचा वापर व्हिगन डाएटमध्ये आवर्जून करावा लागतो.

व्हिगन डाएटमध्ये प्रोटीन, मिनरल आणि कॅल्शियमसाठी डाळी हाच स्रोत असतो. सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य व्हिगन डाएट घेणाऱ्यांनी नियमित प्रमाणात आहारात घेणं आवश्यक ठरतं.

व्हिगन डाएट सुरू केल्यापासून आणखी सुदृढ झाल्यासारखं वाटतं असं अनेक सेलिब्रिटी बोलताना दिसतात. पण तरी व्हिगन डाएटबद्दल न्यूट्रिशनिस्ट आणि आरोग्य तज्ज्ञांमध्ये दुमत आहे. काहींचा या प्रकारच्या डाएटला तीव्र विरोध आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी गेल्या काही महिन्यांपासून मांसाहार पूर्णपणे बंद केला. ते फक्त शाकाहारीच नाही तर व्हिगन झाले आहेत.

व्हिगन डाएटमध्ये फक्त वनस्पतीजन्य पदार्थ खाणं अपेक्षित असतं. विराटनंसुद्धा प्राणीजन्य पदार्थ आहारातून पूर्णपणे बाद केले आहेत. आपण या डाएटमुळे आणखी मजबूत झाल्याचं विराटने सांगितलं होतं.

कंगना रणौत ही बॉलिवूड क्वीनसुद्धा शाकाहारी आहे. मी व्हिगन डाएटला सुरुवात केली आणि आयुष्यात खूप फरक अनुभवला. मी आता खूप आनंदी आहे, असं कंगनाने पेटा या संस्थेला सांगितलं. नॉनव्हेज सोडलं तेव्हा मी मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ खायचे. दूध, दही, चीजवर ताव मारायचे. पण या पदार्थांमुळे मला अॅसिडिटी होतेय, हे लक्षात आलं आणि मी व्हिगन डाएट स्वीकारलं. दुग्धजन्य पदार्थही बंद केले. त्यामुळे खूप फरक पडला, असं ती म्हणाली होती.

सोनम कपूर अहुजा: शाकाहारी झाल्यानंतर आतून खूप बरं वाटतं, असं सोनम सांगते. पाच- सहा वर्षांपूर्वी तिने मांसाहार सोडला. पण गेल्या काही काळापासून ती व्हेगन झाली आहे.

मल्लिका शेरावत: 'मर्डर' सिनेमानंतर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री आता व्हिगन झाली आहे. मी अगदी पूर्णपणे मांसाहार सोडला आणि शाकाहाराला आपलंसं केलं, असं मल्लिका सांगते. शाकाहार मला भावतो. म्हणूनच मी व्हिगन झाले, असं ती सांगते.

रिचा चढ्ढा: गँग ऑफ वासेपूर आणि मसानमुळे रिचानेने समीक्षकांचीही वाहवा मिळवली. तिने डाएटमधून दुग्धजन्य पदार्थ पूर्ण बंद केले असून ती व्हिगन झाली. शिवाय ग्लुटेन फ्री आहार घेते. म्हणजेच ती गहू आणि मैदा असलेले पदार्थसुद्धा खात नाही. "मी शाकाहारीच होतेच, पण आता व्हिगन झालेय. भरपूर हिरव्या भाज्या आणि फळं मी आहारात घेते आणि माझ्या शरीराला ते उपयुक्त ठरले. यामुळे मला खूप ताजं-तवानं वाटतं", असं ती सांगते.

नेहा धुपिया: स्वतः नेहा ही पेटा या प्राणीहक्क संघटनेशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे पेटाच्या व्हिगन मोहिमेतही ती पहिल्यापासून सहभाग घेतला आहे. "व्हेज डाएटमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहतं.", असं नेहा सांगते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 11, 2020 07:14 AM IST

ताज्या बातम्या