असा DIET पडेल महागात; हाडं मोडण्याचा वाढतो धोका

अशा आहाराकडे लोकांचा वाढता कल पाहता त्यांच्या आरोग्याबाबत संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे.

अशा आहाराकडे लोकांचा वाढता कल पाहता त्यांच्या आरोग्याबाबत संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे.

  • Share this:
    ब्रिटन, 25 नोव्हेंबर : वेगनिझम (veganism) ही संकल्पना चांगल्या दृष्टिकोनातून सुरू झाली असली तरी दीर्घकाळ याचा अवलंब करणाऱ्यांच्या हाडांच्या (Bones) मजबुतीवर परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं (Oxford University) अलीकडेच केलेल्या एका संशोधनात मांसाहार करणाऱ्यांच्या तुलनेत वेगन डाएट (vegan diet) करणाऱ्यांमध्ये हाडं मोडण्याचा धोका 43 टक्के अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे. बीएमसी मेडिसीन जर्नलमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी मांडलेल्या या अभ्यासात जगभरातील विशेषतः ब्रिटनमध्ये वेगनिझमच्या वाढत्या लोकप्रियतेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. वेगनिझमच्या अनुयायांनी त्यांच्या डाएटमध्ये बदल न केल्यास त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू होण्याची शक्यता यात व्यक्त करण्यात आली आहे. वेगन लोकांनी त्यांना पुरेसे कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन बी 12 कसं मिळेल याचा विचार करावा, असा सल्ला नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसने दिला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासात ब्रिटनमध्ये राहणाऱ्या जवळपास 50 हजार लोकांनी सहभाग घेतला होता. शाकाहारी आणि जे लोक मासे खातात पण चिकन, मटण खात नाहीत, त्यांना हिप फ्रॅक्चर्सचा धोका मांसाहार करणाऱ्या लोकांपेक्षा अधिक आहे. अर्थात हा धोका कमी करता येतो जेव्हा आहारात कॅल्शियम, प्रथिने यांचा पुरेसा समावेश होतो आणि बॉडी मास इंडेक्स नियंत्रणात असतो. हे वाचा - कशाला हवं Diet food; इंडियन फूड खाऊनच कमी होईल तुमचं वजन या संशोधनाचे मुख्य संशोधक डॉ. टॅमी टोंग यांच्या मते, या संशोधनात  वेगवेगळ्या पद्धतीचा आहार घेणाऱ्या लोकांचे गट करून त्यांच्यातील अंशतः आणि संपूर्ण फ्रॅक्चरचा धोका याबाबत सर्वसमावेशक अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. टोंग हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील नुफफिल्ड डिपार्टमेंट ऑफ पॉप्युलेशन हेल्थ विभागाचे न्युट्रिशनल एपिडेमिलॉजिस्ट आहेत. द इंडिपेंडटच्या अहवालानुसार वेगन सोसायटीने यावर्षी जाहीर केलेल्या सर्वेक्षणानुसार ब्रिटनमध्ये सध्या वेगनिझमचा कल वाढत असून 2016  पासून  2019 पर्यंत इथं वेगन लोकांची संख्या दुप्पटीनं वाढून 6 लाखांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे वेगन आहाराची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी खाद्यपदार्थ उत्पादकांनी लाल मांसाची प्रतिकृती वाटेल अशा बीट ज्यूस वापरून केलेले रोल्स, बर्गर अशा वनस्पतीजन्य खाद्यपदार्थांची निर्मिती करण्यावर भर दिला आहे. हे वाचा - Mediterranean आहार म्हणजे काय? या आहारामुळे मधुमेहाचा धोका कसा कमी होतो? आपल्या संशोधनाबद्दल बोलताना डॉ. टोंग म्हणाले, याआधी केलेल्या संशोधनात कमी बीएमआयमुळे हिप फ्रॅक्चरचा धोका वाढतो, कॅल्शियम, प्रथिनं यांचं कमी प्रमाण हाडांचं आरोग्य कमकुवत करतं असं आढळलं होतं. अलीकडच्या संशोधनात सरासरी बीएमआय असणाऱ्या आणि कॅल्शियम, प्रथिनं यांचे कमी प्रमाण असलेल्या वेगन लोकांना हाडं मोडण्याचा धोका अधिक असल्याचं दिसून आलं आहे. योग्य संतुलित आणि वनस्पतीजन्य आहार पोषणमूल्यं वाढवू शकतो आणि हृदयविकार, मधुमेह आदी आजारांचा धोका कमी करतो. लोकांनी त्यांच्या आहाराचे फायदे आणि तोटे जाणून घेतले पाहिजेत. कॅल्शियम, प्रथिने यांचे योग्य प्रमाण आणि योग्य बीएमआय कायम राहील, याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला डॉ. टोंग देतात.
    Published by:Priya Lad
    First published: