मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

फक्त घड्याळ वापरण्याची पद्धत बदला; काही दिवसांतच म्हणाल ‘अपना टाइम आ गया’

फक्त घड्याळ वापरण्याची पद्धत बदला; काही दिवसांतच म्हणाल ‘अपना टाइम आ गया’

वास्तुशास्त्राचे नियम (Vastu tips for success) लक्षात घेऊन तुम्ही योग्य प्रकारे घड्याळ वापरलं, तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा दिसून येऊ शकतो.

वास्तुशास्त्राचे नियम (Vastu tips for success) लक्षात घेऊन तुम्ही योग्य प्रकारे घड्याळ वापरलं, तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा दिसून येऊ शकतो.

वास्तुशास्त्राचे नियम (Vastu tips for success) लक्षात घेऊन तुम्ही योग्य प्रकारे घड्याळ वापरलं, तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा दिसून येऊ शकतो.

नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर: वास्तुशास्त्रामध्ये (Vastu Shastra) घरातल्या कित्येक गोष्टींबाबत माहिती दिलेली आहे. या गोष्टी ठराविक प्रकारे वापरल्यास त्यांचा आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. यातलीच एक गोष्ट म्हणजे, आपल्या दैनंदिन वापरातलं मनगटी घड्याळ. तुम्ही तुमचं घड्याळ कशा प्रकारे वापरता (Wristwatch tips) यावरून तुम्हाला यश मिळेल की नाही हे ठरतं, असं वास्तुशास्त्र सांगतं. त्यामुळेच वास्तुशास्त्राचे नियम (Vastu tips for success) लक्षात घेऊन तुम्ही योग्य प्रकारे घड्याळ वापरलं, तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा दिसून येऊ शकतो. वास्तुशास्त्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार, मनगटी घड्याळ (Wristwatch vastu tips) हे नेहमी गोल्डन किंवा सिल्व्हर रंगाचं असावं. परीक्षेला जाताना, नोकरीच्या मुलाखतीला जाताना किंवा अन्य महत्त्वाच्या कामांसाठी जाताना या दोन रंगांपैकी कोणत्याही रंगाचं घड्याळ वापरल्यामुळे यश मिळण्याची शक्यता वाढते. रंगानंतर दुसरी गोष्ट तुम्ही पाहायला हवी, ती म्हणजे घड्याळाची डायल. तुम्ही वापरत असलेल्या घड्याळाचा आकार (Vastu tips regarding Wristwatch) प्रमाणापेक्षा जास्त मोठा असू नये. मोठ्या आकाराचं घड्याळ वापरल्यामुळे तुम्हाला खासगी, तसंच व्यावसायिक जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यातही, गोल किंवा चौकोनी डायलची (Wristwatch habits can change your life) घड्याळं वापरणं अधिक शुभ समजलं जातं. यानंतर तुम्ही वापरत असलेलं घड्याळ किती टाइट आहे हे पाहणं गरजेचं ठरतं. जर त्याच्या पट्ट्याचं फिटिंग ढिलं असेल, तर त्याचा तुम्हाला तोटा होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार, ढिलं घड्याळ वापरल्यामुळे तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश मिळण्यास अडचण येऊ शकते. शिवाय, हातामध्ये घड्याळ हे मनगटाच्या हाडाजवळच असावं. अर्थात, घड्याळ कोणत्या हातात घालावं याबाबत कोणतेही विशेष नियम सांगितलेले नाहीत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार डाव्या किंवा उजव्या – कोणत्याही हातात घड्याळ घालू शकता. घड्याळ हातात नसताना तुम्ही ते कुठे काढून ठेवता हेदेखील पाहणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण रात्री झोपतानाच घड्याळ काढून ठेवतो. अशा वेळी हे घड्याळ उशीखाली (Never Keep wrist watch under pillow) ठेवण्याची सवय कित्येकांना असते; मात्र ही सवय घातक ठरू शकते. उशीखाली घड्याळ ठेवल्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये निगेटिव्ह एनर्जी येण्याची शक्यता असते. तसंच, तुम्हाला झोपेसंबंधीच्या समस्याही जाणवू शकतात. एकंदरीत तुमची चांगली वेळ येण्याची वाट तुम्ही पाहत असाल, तर सर्वांत आधी तुम्हाला घड्याळ वापरण्याच्या सवयी बदलण्याची गरज आहे.
First published:

पुढील बातम्या