वास्तूशास्त्र- प्रगतीसाठी घरातील पडदेही आहेत तेवढेच महत्त्वाचे, कारण...

वास्तूशास्त्रानुसार, तुम्ही दिशांप्रमाणे जर पडद्यांचे रंग आणि डिझाइन निवडले तर फक्त तुमचं घर सुंदर होईल शिवाय घरात सकारात्मक उर्जाही खेळती राहील.

  • Share this:

वास्तूशास्त्रानुसार, तुम्ही दिशांप्रमाणे जर पडद्यांचे रंग आणि डिझाइन निवडले तर फक्त तुमचं घर सुंदर होईल शिवाय घरात सकारात्मक उर्जाही खेळती राहील. पर्यायाने तुमच्या घरात सुख, शांती नांदेल.

पूर्वेकडून येईल समृद्धी- जर तुमचं घर पूर्व दिशेला आहे आणि तुम्ही याच दिशेच्या खिडक्यांना आणि दरवाजांना पडदे लावू इच्छिता तर अंडाकार आकाराचे किंवा फुलांचे पॅटर्न, स्ट्रीप्स असलेले पडदे लावू शकता. पूर्व दिशेला अंडाकार डिझाइन हे जीवनात यशाचे नव- नवे मार्ग आणतं. तसेच पडद्यांच्या रंगासाठी सकारात्मक उर्जा देणारे अर्थात केशरी, पिवळा, हिरवा, गुलाबी, फिकट नारंगी रंगांचा वापर करू शकता.

पश्चिमेकडून मिळेल लाभ- या दिशेला शक्यतो गोलाकार डिझाइन आणि पांढऱ्या रंगांच्या पडद्यांची निवड करा. पांढऱ्या रंगाोबत पिवळा, तपकिरी, फिकट हिरव्या रंगाचा उपयोग करू शकता. पंचकोन असलेले सुंदर पॅटन तुम्ही पडद्यांसाठी निवडू शकता. पश्चिमेला जर तुम्ही या प्रकारचे पडदे लावले तर जीवनात अनेक लाभदायक गोष्टी येतील असं वास्तूशास्त्रात म्हटलं आहे.

उत्तरेकडून होईल धन लाभ- उत्तर दिशेला असलेल्या खोलीत पाण्याच्या गुणधर्माशी मिळते- जुळते डिझाइनचे पडदे वापरू शकता. पाण्याची दिशा ही उत्तरेकडे असते, त्यामुळे उत्तरेकडे जर तुम्हाला पडदे लावायचे असेल तर फिकट पिवळ्या, हिरव्या आणि निळ्या रंगाचे पडदे लावावेत. यामुळे घरात पैशांचा ओघ खेळता राहील. याशिवाय करिअरमध्येही यश मिळेल. पूर्व, ईशान्य आणि उत्तर दिशेला वजनाने हलके पडदे लावावेत.

दक्षिण दिशेने मिळेल यश- आग्नेय दिशेला त्रिकोणी आकाराचे पडदे ज्याचं टोकदार भाग हा वरच्या दिशेला असेल अशा डिझाइनचे पडदे लावावेत. तर दक्षिण दिशेला आयताकृती पॅटनचे पडदे लावायला प्राधान्य द्यावं. या दिशेतील पडद्याचा रंग हा शक्यतो लाल, नारंगी, गुलाबी, जांभळा यांपैकी एक निवडावा.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2019 06:46 AM IST

ताज्या बातम्या