मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नवरा-बायकोमधील सततचे वाद टाळण्यासाठी वास्तुशास्त्र समजून घ्या; या टिप्स येतील तुमच्या कामी

नवरा-बायकोमधील सततचे वाद टाळण्यासाठी वास्तुशास्त्र समजून घ्या; या टिप्स येतील तुमच्या कामी

कधी-कधी नातं तुटण्यापर्यंत संबंध बिघडले जातात. पण, वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे या समस्यांवर मात करून आपले वैवाहिक नाते आनंदी आणि चांगले होऊ शकते.

कधी-कधी नातं तुटण्यापर्यंत संबंध बिघडले जातात. पण, वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे या समस्यांवर मात करून आपले वैवाहिक नाते आनंदी आणि चांगले होऊ शकते.

कधी-कधी नातं तुटण्यापर्यंत संबंध बिघडले जातात. पण, वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे या समस्यांवर मात करून आपले वैवाहिक नाते आनंदी आणि चांगले होऊ शकते.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 04 जून : आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि कामाच्या ताणामुळे अनेक वेळा आपण आपल्या जोडीदाराला जास्त वेळ देऊ शकत नाही. जोडीदाराला पुरेसा वेळ न दिल्याने आपल्या लव्ह लाईफमध्ये तणाव वाढतो आणि वैवाहिक जीवनात समस्या येऊ लागतात. यामुळे कधी-कधी नातं तुटण्यापर्यंत संबंध बिघडले जातात. पण, वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे या समस्यांवर मात करून आपले वैवाहिक नाते आनंदी आणि चांगले होऊ शकते. इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार कृष्णकांत शर्मा यांनी या विषयी काही वास्तु टिप्स (Vastu Tips) सांगितल्या आहेत, ज्या तुम्हाला तुमचे प्रेम आणि वैवाहिक जीवन आनंदी बनवण्यात मदत करतील. घरात कचरा गोळा करू देऊ नका वास्तुशास्त्रानुसार, कचरा आणि जुन्या तुटलेल्या वस्तू विशेषत: इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे की बंद घड्याळे, जुने तुटलेले मोबाईल घरात ठेवल्याने नकारात्मकता निर्माण होते, ज्याचा थेट परिणाम आपल्या वैवाहिक जीवनावर होतो. तुमच्या घरातही अशा वस्तू असतील तर आजच त्या स्वच्छ करा. यामुळे आपल्या आयुष्यातील ताणतणाव कमी होऊन जीवनात आनंद येईल. बेडरूममध्ये हलके रंग वापरा - वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये गडद रंगांचा वापर केल्याने जीवनसाथीसोबतच्या नात्यात अंतर वाढते. बेडरूममध्ये नेहमी गुलाबी किंवा हलका लाल रंग वापरा. हा रंग प्रेमाचा रंग मानला जातो. लाइफ पार्टनरसोबत प्रेम वाढवण्यासाठी गुलाबी रंग उपयुक्त आहे. तसेच तुमच्या बेडरूममध्ये लाल रंगाचा दिवा असेल तर आजच तो बदला आणि दिव्यामध्ये लाल रंगाऐवजी हलका निळा रंग वापरा. हे वाचा - मुतखड्यापासून ते लठ्ठपणा कमी करण्यासाठी उकळलेल्या लिंबू-पाण्याचा असा होतो उपयोग घरामध्ये निवडुंग किंवा काटेरी झाडे लावणे टाळा - तुम्हीही तुमच्या घरात निवडुंग किंवा तत्सम काटेरी झाडे लावली असतील तर आजच त्यांना घराबाहेरील बागेत लावा. घरात अशी काटेरी झाडे ठेवल्याने आपल्या लव्ह लाईफमध्ये अडचणी येऊ शकतात. अशी झाडे घरात न लावण्याचा प्रयत्न करा. हे वाचा - विनायक चतुर्थीला अशा पद्धतीनं करा गणेशाची पूजा; सर्व आशा-आकांक्षा होतील पूर्ण बेडरूममध्ये लव्ह बर्ड ठेवा - तुमचेही तुमच्या जोडीदारासोबत जमत नसेल आणि तुमच्यात रोज भांडणे होत असतील तर लव्ह बर्ड किंवा मँडरिन डक घरी आणा आणि तुमच्या बेडरूममध्ये ठेवा. असे केल्याने तुमच्या लव्ह लाईफमधील तणाव कमी होईल आणि दोघांमध्ये प्रेम वाढेल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Lifestyle, Vastu

पुढील बातम्या