• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • Vastu Tips: तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम वाढण्यामागचे जिन्याची रचना तर नाही कारण?

Vastu Tips: तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम वाढण्यामागचे जिन्याची रचना तर नाही कारण?

काही समस्या अशा असतात, की अनेक प्रयत्न करूनही त्या सुटत नाहीत. अशा वेळी वास्तूशास्त्रासारख्या (Vastushastra) विषयात रस वाढतो आणि मदत घेतली जाते. समाधानी, आनंदी घरासाठी जिन्याची रचना कशी नसावी हेसुद्धा वास्तुशास्त्रात सांगितलं आहे.

  • Share this:
जीवनात (Life) काही समस्या अशा असतात, की अनेक प्रयत्न करूनही त्या सुटत नाहीत. मग आपण काही वेगळ्या मार्गांचा विचार समस्या सोडवण्यासाठी करू लागतो. समस्या दूर होऊन जीवनात सुख-समृद्धी यावी, प्रत्येक कामात यश मिळावं, अपेक्षित प्रमाणात पैसा मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते; मात्र प्रयत्न करूनही समस्या सुटत नसल्यास काही व्यक्ती ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्राशी (Vastu shastra) निगडित सल्ला घेण्यासाठी जाणकार व्यक्तींकडे जातात. खरं तर वास्तुशास्त्राचे काही साधे नियम प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं असतं. कारण त्यातून तुमच्या समस्यांचं निराकरण होऊ शकतं. यशाकडे वाटचाल करताना जसा मार्ग योग्य असावा, तसंच घरातल्या जिन्याची किंवा पायऱ्यांची रचनाही (Stairs) योग्य असावी, म्हणजे समस्या निर्माण होत नाहीत, असं वास्तुशास्त्रातले जाणकार सांगतात. वास्तुशास्त्रातल्या काही नियमांविषयीची माहिती `टीव्ही नाइन हिंदी`ने दिली आहे. घर बांधताना वास्तुविषयक नियमांचं पालन करणं आवश्यक असतं. विशेष करून घरातल्या पायऱ्या किंवा जिना बांधताना काळजी घेणं गरजेचं आहे. कारण या गोष्टीचा थेट संबंध सुख, सौभाग्याशी निगडित असतो. जिना हा घरातला असो अथवा कार्यालयातला, त्याचा शुभ आणि अशुभ परिणाम जाणवल्याशिवाय राहत नाही. जिना किंवा पायऱ्या योग्य दिशेला असतील तर संबंधित व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहोचू शकते; मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. काय ही विचित्र अट! इथं राहायचंय तर 'या' वेळेला अंघोळ करायला सक्त मनाई वास्तुशास्त्रानुसार, घर किंवा कार्यालयातल्या पायऱ्या, जिना कधीही अस्वच्छ ठेवू नये. ज्या घरातला जिना स्वच्छ (Clean) असतो, त्या घरात लक्ष्मी वास करते, असं मानलं जातं. जिन्यात योग्य प्रमाणात प्रकाश (Light) आवश्यक असतो. यामुळे तिथली नकारात्मक ऊर्जा (Negative Energy) दूर होते. घर बांधताना जिन्याचं काम अर्धवट सोडून देऊ नये. कारण अर्धवट बांधकाम केलेल्या जिन्यामुळे घरात मोठा दोष निर्माण होऊ शकतो आणि घरातल्या व्यक्तींची प्रगती खुंटते. वास्तुशास्त्रानुसार, घरातला जिना नैर्ऋत्य दिशेला (Southwest) असावा. जिना नेहमी उत्तरेकडून सुरू होऊन दक्षिणेकडे संपावा. पश्चिम, नैर्ऋत्य, मध्य दक्षिण, वायव्य दिशेला जिना असणं हे शुभ मानलं जातं. जिन्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी दरवाजा असेल तर तो पूर्व किंवा उत्तर दिशेला उघडणारा असावा. जिन्याच्या वरच्या भागातला दरवाजा आणि खालच्या भागातल्या दरवाजाची उंची कमी असावी.ॉ ताजंच कशाला हवं! शिळी चपाती खाण्याचेही आहेत खूप सारे फायदे वास्तुशास्त्रानुसार, जिन्याखाली कोणत्याही गोष्टींसाठी बांधकाम करू नये. जिन्याखाली कचरा, स्वयंपाकघर, अभ्यासाची खोली, देवघर असल्यास घरमालकाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसंच जिना हा कधीही ईशान्य (Northeast) दिशेच्या कोपऱ्यात नसावा. वास्तुशास्त्रात हा एक मोठा दोष मानला जातो. या दिशेला जिना असेल तर घरातल्या कर्त्या पुरुषाचा कधीही उत्कर्ष होत नाही. घर बांधताना प्रत्येक गोष्टीची रचना वास्तुशास्त्रानुसार केली गेल्यास अशी वास्तू निश्चितच लाभदायक ठरते आणि घरातल्या व्यक्तींना सुख, समृद्धी मिळते. (Disclaimer: लेखातली माहिती ही सामान्यपणे उपलब्ध ज्ञानावर आधारित आहे. News18 यातल्या विचारांची, सल्ल्याशी सहमत असेलच असे नाही. कुठल्याही अंश्रश्रद्धेला खतपाणी घालण्याचा यात उद्देश नाही.)
First published: