Home /News /lifestyle /

Vastu Tips: कासवाची अंगठी कधी चुकून पण अशी नाही घालायची; नियम समजून घ्या

Vastu Tips: कासवाची अंगठी कधी चुकून पण अशी नाही घालायची; नियम समजून घ्या

धार्मिक मान्यतेनुसार कासव हा भगवान विष्णूचा कच्छप अवतार मानला जातो. हा अवतार भगवान विष्णूंनी समुद्रमंथनाच्या वेळी घेतला होता. ही अंगठी धारण केल्याने आत्मविश्वास वाढतो, तसेच सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.

  मुंबई, 06 जुलै : अनेकांना अंगठी घालण्याची आवड असते. काही लोक आपल्या राशीनुसार अंगठी परिधान करतात तर काहींना सोन्या-चांदीच्या अंगठ्या घालायला आवडतात. सध्या कासवाच्या अंगठीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. वास्तुशास्त्रानुसार कासवाची अंगठी घातल्याने व्यक्तीचे भाग्य खुलते, असे मानले जाते. याचा थेट संबंध धनाची देवता लक्ष्मीशी आहे. कोणतीही व्यक्ती ही अंगठी घालते त्याला लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो. वास्तुशास्त्राव्यतिरिक्त, चीनी फेंगशुईमध्ये, कासवाला संपत्ती आकर्षित करण्याचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. आपणही अशी अंगठी घालण्याचा विचार करत असाल तर इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा यांनी त्याबाबत काही नियम सांगितले (Vastu Tips For Turtle Ring) आहेत. कासवाची अंगठी घालण्याचे फायदे - वास्तुशास्त्रानुसार जो व्यक्ती कासवाची अंगठी घालतो, त्याला जीवनात सर्व प्रकारच्या सुख-सुविधा आणि संपत्ती प्राप्त होते. याशिवाय आर्थिक चणचण दूर होते. धार्मिक मान्यतेनुसार कासव हा भगवान विष्णूचा कच्छप अवतार मानला जातो. हा अवतार भगवान विष्णूंनी समुद्रमंथनाच्या वेळी घेतला होता. ही अंगठी धारण केल्याने आत्मविश्वास वाढतो, तसेच सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. या राशीच्या लोकांनी सल्ल्याशिवाय परिधान करू नये - ज्योतिष शास्त्रानुसार मेष, कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय ही अंगठी परिधान करू नये. असे केल्याने ग्रह दोषांमुळे मोठे नुकसान होऊ शकते. कासवाटी अंगठी कधी खरेदी करावी - कासवाची अंगठी खरेदी करण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. खरेदी केल्यानंतर घरात माता लक्ष्मीच्या चित्रासमोर ती काही वेळ ठेवा. त्यानंतर ती दूध-पाण्याच्या मिश्रणात धुवावी किंवा गंगेच्या पाण्याने धुऊन पवित्र करावी. त्यानंतर देवी लक्ष्मीच्या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि नंतर उदबत्ती दाखवून हातात धारण करा. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार कासवाची अंगठी घालण्याचा योग्य मार्ग आणि दिवस शुक्रवारी कासवाची अंगठी घालणे शुभ असते. ती परिधान करताना, लक्षात ठेवा की त्याचा चेहरा आपल्या दिशेला असावा. त्यामुळे पैसा आपल्याकडे आकर्षित होतो. कासवाचा चेहरा बाहेरच्या बाजूला असेल तर पैसे खर्च होण्याची शक्यता जास्त आहे. ही अंगठी नेहमी उजव्या हाताच्या मधल्या बोटात किंवा तर्जनीमध्ये घालावी. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम अंगठी कोणती धातूची - चांदीच्या धातूमध्ये कासवाची अंगठी घालणे नेहमीच शुभ असते. त्यामुळे त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या मनावर होतो. एकदा अंगठी घातली की ती पुन्हा पुन्हा काढू घालू नये. त्यामुळे त्याची दिशा बदलते आणि पैशाच्या येण्यामध्ये अडचण येते.
  (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Lifestyle, Vastu

  पुढील बातम्या