Home /News /lifestyle /

Vastu Tips: घरातील वास्तूदोष घालवणे आहे शक्य; या उपायांनी मिळेल धन आणि सुख-शांती

Vastu Tips: घरातील वास्तूदोष घालवणे आहे शक्य; या उपायांनी मिळेल धन आणि सुख-शांती

वास्तूदोष काही सोप्या उपायांनी दूर करता येतात. तिरुपतीचे ज्योतिषी आणि वास्तुविशारद डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांच्याकडून जाणून घेऊया वास्तू दोषांशी (Vastu Dosh) संबंधित सोपे उपाय.

    मुंबई, 26 जून : घर बांधताना वास्तुशास्त्राच्या नियमांची काळजी घेतली नाही तर त्या घरात वास्तुदोष राहू शकतो. वास्तुदोषामुळे कुटुंबात सुख-शांती नांदू शकत नाही, कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वास्तुदोषामुळे आपले उत्पन्न, संपत्ती इत्यादींवरही वाईट परिणाम होऊ शकतो. हे वास्तूदोष काही सोप्या उपायांनी दूर करता येतात. तिरुपतीचे ज्योतिषी आणि वास्तुविशारद डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांच्याकडून जाणून घेऊया वास्तू दोषांशी (Vastu Dosh) संबंधित सोपे उपाय. घरातील वास्तुदोष दूर करण्याचे उपाय - 1. आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे वास्तुदोष असतील तर आपण घर पूर्णपणे स्वच्छ करावे. त्यानंतर हळद पाण्यात मिसळून पातळ करावी. त्यानंतर घरात सर्वत्र खाऊच्या पानांनी शिंपडावी. हळदीऐवजी आपण गंगाजल देखील वापरू शकता. 2. सूर्याची किरणे आणि शुद्ध हवा रोज ज्या घरात येथे ते घर वास्तुशास्त्रानुसार चांगले मानले गेले आहे. आपल्या घराच्या खिडक्या नेहमी बंद असतील तर त्यामुळे वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यासाठी आपण दररोज सकाळी काही वेळ खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवावेत. 3. पूजेच्या ठिकाणी शिळी फुले, फळे किंवा इतर पूजा साहित्य ठेवू नका. ते दररोज स्वच्छ केले पाहिजे, अन्यथा वास्तुदोष निर्माण होतात. देवी आणि देवताचे चित्रही समोरासमोर लावू नये. हे देखील वास्तुदोषाचे कारण बनते. 4. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष आहे, असे वाटत असेल तर दररोज पूजेच्या वेळी शंख आणि घंटा वाजवा. यामुळे वास्तुदोष आणि नकारात्मकता दोन्ही दूर होतील. हे वाचा - नाक, तोंड नाही तर शरीराच्या 'या' अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा 5. घराच्या उत्तर दिशेला हिरवी झाडे-रोपं लावल्यास किंवा आग्नेय दिशेला लाल घोड्यांच्या जोडीचे चित्र लावल्याने धनात मोठी वाढ होते. 6. स्फटिक श्रीयंत्र घराच्या ब्रह्म स्थानात किंवा ईशान्य दिशेला ठेवावे. वास्तू दोष दूर करण्यासोबतच संपत्ती आणि उत्पन्न वाढवण्यासही त्यामुळे मदत होते. हे वाचा - ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या 7. घराच्या उत्तर-पूर्व दिशेला रद्दी, कचरा, जड अडगळीच्या वस्तू इत्यादी ठेवल्याने वास्तुदोष होतो. ही जागा स्वच्छ ठेवल्याने वास्तुदोष कमी होतात, कुटुंबात सुख-शांती नांदते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Vastu

    पुढील बातम्या