मुंबई, 05 जानेवारी : आजच्या काळात शूज-चप्पल हे लोकांसाठी स्टेटस सिम्बॉल बनत चालले आहे. पादत्राणांवरूनही लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावता येतो. जेव्हा आपण बाजारातून नवीन शूज खरेदी करतो आणि चप्पल घालतो. त्यामुळे आपल्याला एक नवीन ऊर्जा जाणवते आणि आपला आत्मविश्वास वाढतो. खरंतर, शूज आणि चप्पलचा आपल्या जीवनात खूप प्रभाव असतो, परंतु या शूज आणि चप्पलमुळे आयुष्यात अनेक वेळा समस्याही निर्माण होतात. काही ठराविक दिवस आहेत, त्यावेळी शूज किंवा चप्पल खरेदी करणं अशुभ ठरू शकतं. या दिवसात शूज आणि चप्पल खरेदी केल्यास नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. जाणून घेऊया शूज आणि चप्पलमुळे आपल्या आयुष्यात कोणत्या समस्या प्रवेश (Vastu Tips) करू शकतात आणि त्याचे शुभसंकेतही.
कोणत्या दिवशी शूज-चप्पल खरेदी करू नयेत
जेव्हा आपल्याला असे वाटते की, आपण आपले शूज किंवा चप्पल बदलावेत. म्हणून आपण बाजारात जाऊन नवीन शूज किंवा चप्पल आणतो. तो कोणता दिवस आहे, हे आपण पाहत नाही, पण तुम्हाला माहीत आहे का की, अमावस्या, मंगळवार, शनिवार किंवा ग्रहणाच्या दिवशी शूज किंवा चप्पल खरेदी केल्याने अशुभ घडू शकते. या दिवसात शूज आणि चप्पल खरेदी केल्यास नुकसान होण्याची शक्यता जास्त असते, असे मानले जाते.
शूज घालून इथे जाऊ नका
असे म्हटले जाते की, शूज किंवा चप्पल घालून घराची तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा कधीही उघडू नये. असे केल्याने धनाची देवी लक्ष्मी क्रोधित होते. असे मानले जाते की शूज किंवा चप्पल घालून संपत्तीला स्पर्श करणे देखील देवी लक्ष्मीचा अपमान आहे.
शूज किंवा चप्पल घालून स्वयंपाकघरात किंवा घरातील खाद्यपदार्थांच्या ठिकाणी जाऊ नये. असे केल्याने आई अन्नपूर्णा नाराज होते. स्वयंपाकघरात शूज आणि चप्पल घातल्याने कुटुंबात विश्वासाची कमतरता निर्माण होते आणि घरात अशांततेचे वातावरण निर्माण होते.
हे वाचा -
Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का?
शूज आणि चप्पल घालून नदी किंवा तलावात स्नान करू नये. असे केल्याने नशिब तुम्हाला साथ देत नाही. यासोबतच शूज-चप्पल किंवा चामड्याची कोणतीही वस्तू घालून मंदिरात किंवा पवित्र ठिकाणी जाऊ नये. असे केल्याने व्यक्तीचे आयुष्य कमी होतं, असंही मानलं जातं.
शूज चोरी
पादत्राण्यांबाबत अशीही एक समजूत आहे की, मंदिरातून किंवा रुग्णालयातून तुमचे बूट किंवा चप्पल चोरीला गेल्यास तुमचे दुर्दैव दूर होते. जर तुमचे जोडे आणि चप्पल जुने झाले असतील तर शनिवारी ते कोणत्याही शनि मंदिराबाहेर सोडून द्यावेत. असे केल्याने शनिदेवाची वाईट दृष्टी काही प्रमाणात कमी होते.
हे वाचा -
लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्रावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.