Home /News /lifestyle /

Vastu Tips: घरात वारंवार पैशांची चणचण भासते का? वास्तुदोषाचे हे असेल कारण, जाणून घ्या उपाय

Vastu Tips: घरात वारंवार पैशांची चणचण भासते का? वास्तुदोषाचे हे असेल कारण, जाणून घ्या उपाय

Vastu Tips: अनेक वेळा लाख प्रयत्नांनंतरही पैशांशी संबंधित एक ना अनेक समस्या लोकांना सतावत राहतात. यासाठी वास्तुशास्त्रात वर्ज्य मानल्या गेलेल्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, घरातील एखादी वस्तू चुकीच्या दिशेने आणि चुकीच्या स्थितीत ठेवल्याने देखील अशा समस्यांना तोंड द्यावे लागते.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 11 जानेवारी : वास्तुशास्त्रानुसार घर बांधण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, कित्येकजण आपलं नवीन घर बांधताना वास्तुशास्त्राचा विचार करत नाहीत किंवा अनेकांना त्यावर विश्वास नसतो. मात्र, वास्तुशास्त्रानुसार (Vastu shastra) घर नसेल तर विविध समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. ज्यामध्ये पैशांची उधळपट्टी होऊ लागते आणि विनाकारण पैसे वाया जाऊ लागतात. या सर्व त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी घर बांधताना वास्तू जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा. पण अनेक वेळा लाख प्रयत्नांनंतरही पैशांशी संबंधित एक ना अनेक समस्या लोकांना सतावत राहतात. यासाठी वास्तुशास्त्रात वर्ज्य मानल्या गेलेल्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, घरातील एखादी वस्तू चुकीच्या दिशेने आणि चुकीच्या स्थितीत ठेवल्याने देखील अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. पैसे हरवणे, अडकणे आणि चोरी होण्यापासून वाचवणे यासाठी वास्तुशास्त्रात कोणते उपाय सांगितले आहेत ते जाणून (Vastu Tips) घेऊयात. 1 तुम्ही जर एखादे नवीन घर घेतले आहे किंवा बांधले आहे आणि तिथे राहायला गेल्यानंतर सतत पैशांची हानी होत आहे. तर एखादा वास्तुदोष असू शकतो. यावर उपाय म्हणून घराच्या एका कोपऱ्यात तुरटीचा तुकडा ठेवू शकता. पण, लक्षात ठेवा की तुरटी अशा ठिकाणी ठेवावी जिथे ती कोणाला दिसणार नाही. असे केल्याने तुमच्या घरातील वास्तुदोष संपून तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल. 2. वास्तूशास्त्रानुसार असे मानले जाते की, जर तुमच्या घराचे दरवाजे तुटलेले असतील, उघडताना आणि बंद करताना त्यामध्ये आवाज होत असेल किंवा दरवाजा उघडताना आणि बंद करताना अडकत असेल तर या तिन्ही परिस्थितीत तुमचे नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे तुमची धन हानी होऊ शकते. तुमच्या घराच्या दाराच्या अशा काही समस्या असल्यास लवकरात लवकर त्याचे निराकरण करा. हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात 3. अनेकदा आपण घरातील छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. घराच्या छतावरील टाकीतून टपकणारे पाणी किंवा घरातील खराब नळातून टपकणारे पाणी. वास्तुशास्त्रानुसार घरातील नळातून पाणी टपकणे अजिबात चांगले नाही. वास्तूशास्त्रानुसार असे मानले जाते की, सतत पाणी वाहत असल्याने घराचे उत्पन्नही पाण्यासारखे वाहू लागते. घर बांधताना हेही लक्षात ठेवावे की पाण्याचा निचरा घरामध्ये नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावा. 4. घरातील गॅस किंवा स्टोव्हवर नेहमी भांडी ठेवू नयेत, यामुळे आई अन्नपूर्णेचा अपमान होतो, असे वास्तू तज्ञांचेही मत आहे. हे वाचा - Vastu Tips: भाग्य चमकण्यात तुमच्या चप्पलचाही असतो महत्त्वाचा रोल; जाणून घ्या त्यामागचं सूत्र (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Vastu

    पुढील बातम्या