Home /News /lifestyle /

Vastu Tips: घरात हे सोपे 10 बदल करा आणि भांडणं टाळा; नात्यात गोडवा वाढवा

Vastu Tips: घरात हे सोपे 10 बदल करा आणि भांडणं टाळा; नात्यात गोडवा वाढवा

कधीकधी घरात विनाकारण भांडणं, वाद वाढतात. यासाठी वास्तुदोषही कारणीभूत असतो, असा समज आह गृहकलह होऊ नये म्हणून या Vatu Tips करून पाहा हे सोपे उपाय

दिल्ली, 16 जानेवारी: तुम्ही पती-पत्नीला ( husband and wife) भांडताना पाहिलं असेल. कुटुंबातल्या ( family) सदस्यांमध्येही अधूनमधून खटके उडत असतात. भाऊ-बहिणींमध्येदेखील भांडणं होतात. ही भांडणं कधीकधी एकमेकांच्या विचारांमध्ये असणाऱ्या फरकांमुळे होतात. काही वेळा ती वास्तुदोषांमुळेही ( Vastu Dosh)होतात. वास्तुदोषाचे घरातल्या व्यक्तींच्या नात्यावर परिणाम (vastu dosh affects your relationship) होत असतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला काही सोप्या वास्तू टिप्स ( Vastu tips) सांगणार आहोत. त्या अंमलात आणून तुम्ही तुमच्या नात्यात ( relationships) गोडवा वाढवू शकता. चला तर मग, या टिप्स नेमक्या कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या. 1. तुम्ही विवाहित असाल, तर कधीही आग्नेय दिशेला दरवाजा असणाऱ्या रूममध्ये राहू नका. ते तुमच्या नात्यासाठी हानिकारक आहे. या दिशेला दरवाजा असलेल्या रूममध्ये राहिल्याने तुमच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. 2. तुमच्या बेडरूममध्ये हलके रंग वापरा. अनावश्यक वस्तूंनी तुमची रूम भरून ठेवू नका. अन्यथा त्या रूममध्ये राहणाऱ्या व्यक्तींमध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते. Eggs Tips: चुकूनही अंडी फ्रीजमध्ये ठेवू नका; नाहक हे त्रास मागे लागतील 3. विवाहित जोडप्याने त्यांच्या रूममध्ये नैर्ऋत्य दिशेला एकत्र फोटो लावावा. एका कोपऱ्यात स्फटिक बॉल्सची जोडी ठेवा. असं केल्याने नात्यातला गोडवा वाढतो. 4. कुटुंब प्रमुखाची रूम नैर्ऋत्य दिशेला असावी. अशा रूममध्ये राहिल्यानं नाती चांगली राहतात. 5. तुम्ही ज्या बेडवर झोपता तो लाकडाचा असावा आणि तो चौकोनी असावा. अशी रचना नात्यांसाठी चांगली असते. झोपताना तुमचं डोकं दक्षिणेला आणि पाय उत्तरेकडे असावेत. खराब डिझाइन केलेले बेड नात्यात तणाव निर्माण करू शकतात. तीन नोकऱ्या केल्यानंतर थकत होती महिला, प्रियकराला रोमान्ससाठी दिली सवत 6. तुमच्या रूममध्ये एखादा आरसा असेल व त्यामध्ये झोपताना पती-पत्नीचा चेहरा दिसत असेल तर तो तुमच्या नात्यासाठी चांगला नाही. त्यामुळे असा आरसा झाकून ठेवा. 7. तुम्ही विवाहित असाल, तर तुमच्या बेडरूममध्ये सजावटीच्या वस्तू जोडीने ठेवाव्यात. बेडरूममध्ये टीव्ही किंवा कम्प्युटर ठेवू नका. ते योग्य नाही. 8. बेडरूममध्ये तुमचा बेड दक्षिण किंवा नैर्ऋत्य दिशेला ठेवा. बेड एका तुकड्यात असावा. दोन वेगळे भाग जोडून बेड बनवू नका. 9. वास्तुशास्त्रानुसार पत्नीने नेहमी पतीच्या डावीकडे झोपावे. त्यामुळे पती-पत्नीचं नातं चांगलं राहतं. 10. तुमच्या बेडरूममध्ये कोणत्याही देवदेवतांचे किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तींचे फोटो लावू नयेत. कुटुंबातल्या नात्यांत गोडवा ठेवण्यासाठी या वास्तू टिप्स लक्षात ठेवून अंमलात आणता येतील.
First published:

Tags: Relationship tips, Vastu

पुढील बातम्या