मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Vastu Tips : ग्रहांच्या अवकृपेने सुकते तुळस; 'या’ दिशेला ठेवू नका

Vastu Tips : ग्रहांच्या अवकृपेने सुकते तुळस; 'या’ दिशेला ठेवू नका

श्वासोच्छवासासंबंधी त्रास होत असेल तर तुळशीचं दूध नक्कीच प्या. हा घरगुती उपचार बदलत्या हवामानामुळे होणार्‍या त्रासांपासून आपल्याला दूर ठेवते.

श्वासोच्छवासासंबंधी त्रास होत असेल तर तुळशीचं दूध नक्कीच प्या. हा घरगुती उपचार बदलत्या हवामानामुळे होणार्‍या त्रासांपासून आपल्याला दूर ठेवते.

वास्तुशास्त्रानुसार (Vaastu Shastra) घरामध्ये तुळशीचं (Tulsi) रोप ठेवल्याने नकारात्मक शक्ती (Negative Power) दूर निघून जाते.

  दिल्ली,4 जून : वास्तुशास्त्रात (Vaastu Shastra) सुखी संपन्न जीवनासाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.  घरात सकारात्मक (Positive Power) निर्माण करण्यासाठी वास्तुशास्त्राच्या काही टिप्स (Tips) महत्त्वाच्या आहेत. घरामध्ये काही निगेटिव्हिटी (Negative Power) असेल, अडचणी असतील तर घरात केलेले छोटे बदल देखील त्यातून सकारात्मकता निर्माण करतात. अनेक वास्तुशास्त्रज्ञांनी पुस्तकांच्या माध्यमातून या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अध्यात्म नुसार आणि वास्तुशास्त्रानुसार घरांमध्ये तुळशीचं (Tulsi) रोप ठेवण्याला महत्त्व आहे. तुळस   (Basil Plant) घरात ठेवणं शुभ असतं. यामुळे घरात शांतता आणि आनंद वातावरण राहतं. याशिवाय तुळस आरोग्यदायी आहे. ज्या घरात भांडणं होतात, अशांतता आहे, अस्वच्छता आहे, त्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही.

  या दिशेला ठेवा तुळस

  वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुळशीचं झाड लावायला हवं. पूर्व,उत्तर किंवा ईशान्य दिशेला (Direction) तुळस ठेवावी. तुळशीचं झाड घरात असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.

  इकडे ठेवू नका तुळस

  वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला तुळशीचं रोप कधीही ठेवू नये. नाहीतर फायद्याऐवजी नुकसान व्हायला सुरुवात होते.

  (Chanakya Niti: आयुष्यात सफल होण्यासाठी आजच बदला 'या' वाईट सवयी)

  तुळशीला करा जल अर्पण

  वास्तूशास्त्रानुसार रविवारी, एकादशीच्या दिवशी, सूर्य आणि चंद्र ग्रहणाच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये. शिवाय सूर्यास्तानंतर देखील तुळशीला पाणी घालू नये. यामुळे वास्तूदोष निर्माण होतात. तुळशीजवळ संध्याकाळी तुपाचं निरांजन ठेवावं. त्यामुळे घरावर लक्ष्मी कृपा राहते.

  (इवल्याशा हातांनी भरभर कापतो भाजी; चिमुकल्या शेफचा VIDEO पाहून हैराण व्हाल)

  किचनमध्ये नको तुळस

  वास्तुशास्त्रानुसार तुळस स्वयंपाक घरात ठेवू नये यामुळे कौटुंबिक कलह निर्माण होतात. घरात वास्तुदोष निर्माण झाले असती तर, तुळस अग्नेय दिशेला ठेवावी. घरामध्ये तुळस लावणं शक्य नसेल तर एखाद्या कुंडीमध्ये लावून त्या दिशेच्या खिडकीमध्ये ठेवावी.

  (अजबच! या देशात नाही एकही मच्छर; कसं काय बरं?)

  तुळशीचा उपयोग

  हिंदू धर्मानुसार तुळस ही जन्मापासून मृत्यूपर्यंत उपयोगी येणारं रोप आहे. छोटसं वाटणारा हे रोप घरामधील सगळे दोष दूर करू शकतं आणि परिवाराचं आरोग्यही चांगलं राहतं. घरातली तुळस सुकली असेल तर, काढून टाकावी.  तुळशीचं सुकणं अशुभ मानलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रह हिरव्या रंगाचं प्रतिक आहे. त्यामुळेच बुध ग्रहाच्या अवकृपेमुळे तुळशीचं रोप सुकून जातं.(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

  First published:
  top videos

   Tags: Home-decor, Tree plantation