Home /News /lifestyle /

Happy Chocolate Day 2022: आपल्या जोडीदाराला gift करा 'हे' chocolate, आहेत आश्चर्यकारक फायदे

Happy Chocolate Day 2022: आपल्या जोडीदाराला gift करा 'हे' chocolate, आहेत आश्चर्यकारक फायदे

व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुरू झाला असून आज चॉकलेट डे (Chocolate Day) साजरा केला जात आहे.

     मुंबई, 9 फेब्रुवारी -  व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुरू झाला असून आज चॉकलेट डे (Chocolate Day) साजरा केला जात आहे. यादिवशी तुमच्या जोडीदाराला (partner) तुम्ही चॉकलेट गिफ्ट करू शकता. आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आणि अतिशय सुंदर पॅकिंगमध्ये चॉकलेट्स येतात. तुमच्या जोडीदाराला चॉकलेट्स गिफ्ट करून तुम्ही त्यांना दाखवू शकता की त्यांचे प्रेम तुमच्यासाठी किती खास आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यांना डार्क चॉकलेट (dark chocolate) गिफ्ट म्हणून देऊ शकता. हेल्थलाइनच्या वृत्तानुसार, डार्क चॉकलेटमुळे आरोग्यासाठी अनेक सकारात्मक फायदे (health benefits) होतात. यामुळे ब्लड शुगर (Blood Sugar) आणि हृदयविकार यासारखे गंभीर आजार होण्याचा धोका कमी होता. हे चॉकलेट खाल्ल्याने तणावही कमी होतो. डार्क चॉकलेट खाल्ल्याने तुम्ही कोणत्या आजारांपासून दूर राहू शकता हे जाणून घेऊया. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते ब्लड शुगरची लेव्हल वाढल्याने शरीरातील अनेक गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. डार्क चॉकलेटमध्ये असे गुणधर्म आहेत कि, जे शरीरातील ब्लड शुगरची लेव्हल राखू शकतात, ज्यामुळे तुम्ही मधुमेहासारख्या आजारांना बळी पडण्यापासून देखील वाचू शकता. हृदयविकारापासून दूर ठेवण्यास मदत डार्क चॉकलेटमध्ये कार्डिओप्रोटेक्टिव्ह गुणधर्म असतात. हे हृदयाला अनेक गंभीर आजारांपासून वाचवते. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग टाळण्यासाठी, डार्क चॉकलेट खाणे फायद्याचे ठरते. वाढत्या वयाचा प्रभाव कमी होतो डार्क चॉकलेटमध्ये वृद्धत्वाचा प्रभाव कमी करण्याचा विशेष गुणधर्म आहे. त्यामुळे ज्यांना वाढत्या वयाचा प्रभाव कमी करायचा आहे, त्यांनी डार्क चॉकलेटचे सेवन जरूर करावे. हे अँटी-एजिंग म्हणून काम करते. तणाव कमी करण्याचा गुणधर्म तणाव ही एक अशी गोष्ट आहे, जी एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात कधीतरी नक्कीच त्रास देते. तणाव हे अनेक गंभीर आजारांचे मुख्य कारण मानले जाते. तणाव टाळण्यासाठी डार्क चॉकलेट खूप उपयुक्त ठरू शकते. डार्क चॉकलेटमध्ये तणाव कमी करण्याचा विशेष गुणधर्म असतो. रक्तदाब कमी करण्यास मदत रक्तदाब वाढलेल्या अवस्थेला उच्च रक्तदाब म्हणतात. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे, ते डार्क चॉकलेटचं सेवन करू शकतात. डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण असते, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते. व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला असून व्हॅलेंटाईन वीक ची सुरुवात रोझ डे (7 फेब्रुवारी) ने झाली आहे. आज चॉकलेट डे साजरा होत असून यानिमित्ताने तुमच्या जोडीदाराला तुम्ही डार्क चॉकलेट भेट देऊन प्रेम व्यक्त करु शकता. तसेच हे चॉकलेट जोडीदाराच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल.
    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle, Valentine day, Valentine day plans, Valentine week, Wellness

    पुढील बातम्या