Valentine Day 2020 - Queer, असंही असतं प्रेम; 'या' प्रेमाचाही स्वीकार करा

Valentine Day 2020 - Queer, असंही असतं प्रेम; 'या' प्रेमाचाही स्वीकार करा

देशातील लाखो लोकं आपली सेक्शुअलिटी, रिलेशनशिप्स आणि समाजात स्थानासाठी संघर्ष करत आहेत.

  • Share this:

एकिकडे देशात 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा समलैंगिक संबंधांवर आधारित असलेला आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट चर्चेत आहे. तर दुसरीकडे अशी लाखो लोकं आहेत जे आपली सेक्शुअलिटी, रिलेशनशिप्स आणि समाजात स्थानासाठी संघर्ष करत आहेत. सप्टेंबर 2018 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारं 377 कलम रद्द केलं. यानंतर समलैंगिक संबंधांवरील कायद्याची अडचण दूर झाली मात्र समाजाने निर्माण केलेले अडथळे अजूनही कायम आहेत.

Queer (समलैंगिक, तृतीययपंथी आणि इतर) Way of Life

पेनिस (Penis) असल्यास तो पुरुष आणि व्हजायना (vagina) असल्यास ती स्त्री असं सर्वसामान्यपणे आपण समजतो. तसंच पुरुष आणि स्त्री एकत्र येऊन मुलाला जन्म देतात, असंही आजपर्यंत समजलं जातं. मात्र ह्युमन सेक्शुअॅलिटीची व्याप्ती इतकी मोठी आहे की, समाजाने तयार केलेल्या या 2 श्रेणींमध्ये सर्वच लोकं बसत नाही. लोकं आता या चौकटीच्या बाहेर पडून जोडीदार आणि प्रेम शोधत आहेत.

YouGov ने केलेल्या सर्वेक्षणानुसार 18 टक्के लोकं Tinder आणि OKCupid सारखे डेटिंग अॅप वापरतात. तर 16 टक्के लोकांनी सांगितलं की, समलैंगिक डेटिंगचा पर्याय हवा म्हणून ते LGBTQIA साठी तयार करण्यात आलेल्या Grindr सारख्या विशेष अॅपचा वापर करतात.

 Heterosexual आणि Homosexual यापलीकडेही जाऊन नवीन शब्द आणि संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे.

Bisexual/Biromantic – अशी व्यक्ती जी पुरुष आणि महिला दोघांकडेही आकर्षित होते

Pansexual/Panromantic -  अशी व्यक्ती जी पुरुष, महिला किंवा ट्रान्सजेंडर व्यक्तींकडेही आकर्षित होते.

Asexual/Aromantic - अशी व्यक्ती जिला फारच कमी किंवा बिलकुल सेक्शुअल किंवा रोमान्टिक आकर्षण वाटत नाही.

Sexually/Romantically Fluid – अशी व्यक्ती जिची सेक्सची आवड बदल राहते.

Queer या शब्दाचा अर्थ प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा असतो, लैंगिकदृष्ट्या अल्पसंख्यांक असलेल्या सर्व व्यक्ती या एकाच छताखाली येतात.

काय तुम्ही जन्मापासूनच वेगळे आहात?

भारतात straight या शब्दाचा अर्थ non-LGBTQIA लोकांसाठी वापरला जातो. 'कामसूत्र'चं एका भाग पूर्णपणे erotic homosexual वर आधारित आहे. खजुराहो मंदिरावर महिला एकमेकांना कामुक भावनेतून मिटी मारताना दिसतात आणि पुरुष एकमेकांना आपलं जननेंद्रिय दाखवतात. तरीदेखील heterosexual शी जुळवून घेण्याची कुटुंब आणि समाजाची अपेक्षा पूर्ण करताना भारतातील तरुणांना अधिक संघर्ष करावा लागतो.

"किशोरवयात मी मुलांकडे कधीच आकर्षित झाले नाही, मुलांनी जरी माझ्याकडे त्या नजरेनं पाहिलं तरी मला कधीच काही वाटलं नाही. मला इतर मुली आणि अभिनेत्रींबाबत आकर्षण जास्त वाटत होते. माझ्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये माझ्यासारखे असे अनेक जण आहेत, हे मला मी 18 वर्षांचे असताना समजलं आणि मला माझा जोडीदार मिळाला. ती माझ्यापेक्षा सीनिअर होती आणि तिला खूप काही माहिती होतं. माझ्या कुटुंबाला माझ्याबाबत असं काही माहिती नव्हतं. अखेर मी माझ्या आईला ते सांगितलं आणि ती हे स्वीकारायला तयारच नव्हती. मी आता काम करते, माझा जोडीदारही आहे, मात्र जगाच्या नजरेत आम्ही फक्त रूममेट आहोत, दाम्पत्य नाही. सध्या असलेलं हे चित्र एक दिवस नक्कीच बदलेल अशी आशा मला आहे. फेसबुकवरील Hertryst सारखे ग्रुप आमच्यासाठी खूपच चांगले आहेत" – राशी, वय 24 मेकअप आर्टिस्ट, रांची

कुछ तो लोग कहेंगे

भारतीय संस्कृतीत विशेषत बॉलीवूडमध्ये समलैंगिकांची आधीपासूनच खिल्ली उडवली जाते. हास्यास्पद व्यक्तीच्या रुपातच त्यांचं चित्रण केलं जातं. जसं की करण जोहरच्या दोस्ताना चित्रपटात gay असण्याचं नाटक करणारा व्यक्ती म्हणून कथानक चित्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे alternate sexuality हे प्रसिद्ध संस्कृतीत लपलेलं असं एक रहस्य होऊन जातं. अशा लोकांना दैनंदिन जीवनात किती तिरस्कार आणि समस्यांचा सामना करावा लागत असेल याची कल्पना त्या मुलीने सांगितलेल्या तिच्या अनुभवावरून आलीच असेल. ही मुलगी आपण Queer असल्याचं सांगते मात्र अजूनही आपल्या कुटुंबातून बाहेर पडू शकली नाही.

"जेव्हा मी 17 वर्षांचा होतो, तेव्हा मला मी gay असल्याची खात्री झाली. याबाबत मी आतापर्यंत फक्त माझ्या खास मित्रालाच सांगितलं आहे आणि हे सर्व मनात ठेवणं माझ्यासाठी खूप अशक्य झालं आहे. समलैंगिकतेमुळे माझं बालपण खूपच निराशाजनक होतं. जेव्हा मी 12-13 वर्षांचा होतो तेव्हा गुगलवर नग्न अवस्थेतील पुरुषांचे फोटो पाहायचो आणि मी जे काही करतो आहे ते पूर्णपणे सामान्य आहे, असंच मला वाटायचं. मला एका अशा मोठ्या शहरात जायचं आहे, जिथं मी स्वच्छंदपणे जगू शकेन. मात्र ते तितकं सोपं नाही – इब्राहिम (नाव बदलेलं), वय 20, विद्यार्थी, ग्वाल्हेर

मी Queer आहे, हे मला कसं समजेल?

तुमचं मन सेक्शुअली कसं आहे, हे ओळखण्यासाठी कोणतीही चाचणी नाही. दुर्दैवाने या प्रश्नाचं ठोस असं उत्तर नाही. तुम्हाला सेक्शुअली काय हवं आहे हे ओळखणं, सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं असं पाऊल आहे.

 तुम्ही सेक्शुअली तुमची ओळख काय समजता

रोमान्स, प्रेम आणि सेक्सबाबत तुमचे विचार काय आहेत

ओळख आणि आकर्षण बदलू शकते

तुमची सेक्शुअल ओळख काय आहे, याची निवड सावधानपूर्वक करा.

जेंडर (Gender) आणि ओळख (Identity) हे तांत्रिक शब्द समजण्यापूर्वी तुम्हाला आकर्षण कशाचं वाटतं हे समजणं गरजेचं आहे. आकर्षण हे शरीरापेक्षा डोक्यात जास्त असतं. शारीरिक रचना आणि जननेंद्रिये कोणाचाही सेक्शुअल ओळख काय आहे, हे परिभाषित करू शकत नाही. तुमचा विश्वास ज्यावर आहे, ती तुमची खरी ओळख आहे.

सामान्यपणे एखाद्याचं सेक्शुअल प्राधान्य काय आहे हे समाजानं ठरवलेलं नियम आणि स्वत:बाबत असलेली माहिती यावरून ठरतं. मात्र आकर्षण असं असतं, जे आपण आतून अनुभवतो. असं मानलं जातं, की आकर्षण हे कोणाच्याही नियंत्रणात नसतं. मात्र एखादी व्यक्ती आकर्षणाला कसं समजून घेते आणि त्यानुसार कसं वागते हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं.

मागच्या पिढीत अशी असंख्य लोकं आहेत, ज्यांना आपण समलैंगिक असल्याची खात्री होती, मात्र त्यांनी समाजाने घातलेल्या नियमांमुळे आणि कुटुंबाच्या दबावामुळे विरुद्धलिंगी व्यक्तीशी लग्न केलं आणि त्यांना मुलंही झाली. मात्र आता परिस्थिती हळूहळू बदलते आहे. तुम्हालादेखील असंच काही वाटत असेल तर तुम्ही स्पष्टपणे बोलायलं हवं आणि एक लक्षात ठेवा प्रेम आणि रोमान्स तुम्ही (स्त्री पुरुष किंवा ते) कुणावरही करा, सारखंच असतं.

लेखिका – पूजा प्रियंवदा या Redwomb  संकेतस्थळावर Sexual wellness columnist आहेत. Redwomb हे सेक्सबाबत लोकांना माहिती देणारं ऑनलाईन व्यासपीठ आहे.

First published: February 12, 2020, 10:57 PM IST

ताज्या बातम्या