Valentines Day 2020 - हस्तमैथुन, स्वत:च्या शरीराला असं स्पर्श करणं योग्य आहे?

Valentines Day 2020 - हस्तमैथुन, स्वत:च्या शरीराला असं स्पर्श करणं योग्य आहे?

बहुतेक लोकांसाठी हस्तमैथुन (Masturbation) म्हणजे एक गलिच्छ शब्द आहे. त्यामुळे याबाबत बरेज गैरसमज पसरलेले आहेत.

  • Share this:

14 वर्षांच्या रिद्धीला (नाव बदलेलं) तिच्या मोठ्या भावाच्या रूममध्ये बेडखाली लपवलेलं एक मॅगझिन सापडलं. त्या मॅगझिनमध्ये काय आहे, हे पाहण्याचा मोह तिला आवरला नाही. त्यातले फोटो पाहून तीदेखील उत्तेजित झाली. फोटोकडे पाहून ती स्वत:च्या शरीराला स्पर्श करू लागली. तितक्यात तिची आई रूममध्ये आली. आपली मुलगी हे काय करते आहे, हे पाहून रिद्धीच्या आईला धक्काच बसला. तिची आई तिला खूप ओरडली आणि ती जे काही करते आहे, ते कसं चुकीचं आहे ते सांगू लागली. रिद्धीच्या आईने या सर्वाचा तिच्या विकासावर, अभ्यासावर कसा परिणाम होईल हे सांगितलं. तसंच जर कोणी तिला असं काही करताना पाहिलं तर लोकं काय म्हणतील, अशी भीतीही तिच्या मनात निर्माण केली. हे सर्व ऐकून निधीला स्वत:चीच लाज वाटू लागली, तिनं लगेचच आईची माफी मागितली आणि पुन्हा असं काही करणार नाही, असं वचनही दिलं. रिद्धीच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाल्याने वयाने मोठी झाल्यानंतरही तिनं असं काही कधीच केलं नाही.

भारतातल्या बऱ्याच शहराचा विचार केल्यास सर्व ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. बहुतेक लोकांसाठी हस्तमैथुन म्हणजे एक गलिच्छ शब्द आहे. त्यामुळे याबाबत बरेज गैरसमज पसरलेले आहेत. याबाबत किशोरवयीन मुलामुलींना योग्य माहिती देणं गरजेचं आहे. खरंतर यामुळे तुम्हाला बरं वाटू शकतं, तुम्ही स्वत:ला अगदी जवळून ओळखू शकता, स्पर्श केल्यानंतर तुमच्या शरीराला कसं वाटतं हे अनुभवू शकता आणि तुमच्या शरीराला कोणता स्पर्श आवडतो कोणता नाही हेदेखील समजून घेऊ शकता. जर का तुम्हाला नेमका आनंद कशामुळे मिळतो हे समजलं तर तुम्ही तुमच्या सेक्शुअल पार्टनरसह त्याबाबत बोलू शकता.

या वॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने हस्तमैथुनाबाबत असलेले गैरसमज दूर करूया आणि स्वत:च स्वत:च्या प्रेमात पडूया.

समज – हस्तमैथुनामुळे शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात.

तथ्य – हस्तमैथुन हे सामान्य आहे आणि त्यामुळे कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक समस्या उद्भवत नाहीत. यामुळे तुम्ही काही आंधळे होत नाहीत, तुमच्या डोक्यावर परिणाम होत नाही. शिवाय यामुळे तुमच्या गुप्तांगालाही हानी पोहोचत नाही. पिंपल्स येणं, शरीराची वाढ थांबणं असं काहीच होत नाही.  खरंतर तुम्ही स्वत:ला अगदी जवळून पाहता आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. हस्तमैथुनावेळी तुम्ही orgasm चा अनुभव घेत असता, कारण सर्वकाही तुमच्या नियंत्रणात असतं आणि याचे आरोग्यासाठी फायदेच आहेत. तुम्हाला माहिती आहे यामुळे ताण, वेदना, मळमळ, मॉर्निंग सिकनेस आणि गॅस्ट्रिक इश्यू अशा समस्याही कमी होतात. तुम्हाला रात्री चांगली झोप लागते. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुमच्या चेहऱ्यावर तेजही येतं.

समज – हस्तमैथुनामुळे तुम्ही गलिच्छ बनता

तथ्य –स्वत:च स्वत:वर सेक्स करणे हेल्दी आणि सेक्शुअलिटी समजून घेण्याचा नैसर्गिक मार्ग आहे. हस्तमैथुनाबाबत अनेकांना लाज वाटते. सुरुवातीलाच ज्यांना सेक्सबाबत शिकवलं गेलं नाही अशा तरुण लोकांमध्ये हे जास्त दिसून येतं. मात्र हस्तमैथुन हा लैंगिक विकासाचा अविभाज्य भाग आहे, असं अभ्यासात दिसून आलं आहे. तुम्ही अगदी प्रेमाने स्वत:ला आनंद देत असता. हस्तमैथुनावेळी orgasm चा अनुभव मिळतो, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे फायदेही होतात. शिवाय प्रत्यक्ष लैंगिक कृती करण्याआधी तुम्ही जर सेक्शुअॅलिटीचा अनुभव घेतला तर भविष्यात जोडीदारासह सेक्स करताना किंवा सेक्सबाबत बोलताना मदत होईल. आता तुम्हाला स्वत:वर लक्ष केंद्रीत करून न लाजता स्वत:च्या शरीराला ओळखण्याची वेळ आहे.

समज – जास्त प्रमाणात हस्तमैथुन वाईट आहे

तथ्य – हस्तमैथुन हा सर्वात सुरक्षित असा सेक्स आहे. यामुळे तुम्ही प्रेग्ननंट होत नाही किंवा तुम्हाला लैंगिक संक्रमण संसर्गाचाही धोका नसतो. हस्तमैथुन तुम्हाला तुमच्या शरीराबाबत ज्ञान देतं आणि आनंदही. प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो, त्यामुळे हस्तमैथुन किती कमी, किती जास्त याला मर्यादा नाही. मात्र obsessive masturbation म्हणजे दिवसाला तुम्ही भरपूर वेळा हस्तमैथुन करत असाल, त्याचा तुमच्या दैनंदिन दिनक्रमावर परिणाम होत असेल, त्यावरच तुम्ही जास्त लक्ष केंद्रीत करत असाल तर ती समस्या होऊ शकते. हस्तमैथुनाचा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिमाम होत असल्यास मित्रमंडळी किंवा समुपदेशकांशी बोला.

समज – हस्तमैथुन करणारी व्यक्ती हायपरसेक्शुअल असते आणि ती विकृत असं लैंगिक वर्तन करू शकते.

तथ्य –  हस्तमैथुन करणारे सर्वजण स्वत:ला उत्तेजित करत असतात. स्पर्शातून आपल्या शरीराला समजून घेत असतात. काही भागांना स्पर्श सुखावणारा असतो तर काही भागांना स्पर्श केल्यास वेदना होऊ शकतात किंवा अस्वस्थ वाटू शकतं. हस्तमैथुन हे खासगी आहे, ते बेडरूममध्ये एकट्याने करणं योग्य आहे, हे किशोरवयीन मुलामुलींना समजावणं गरजेचं आहे.

शरीर आणि सेक्सबाबत योग्य वयात योग्य माहिती जर पालकांनी दिली तर किशोरवयीन मुलंमुली सेक्सबाबत ज्या काही जोखीम उचलतात त्या कमी होतात. हस्तमैथुन करणाऱ्या किशोरवयीन मुलामुलींना सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन, गर्भनिरोधक, सुरक्षित सेक्स याबाबत जास्त माहिती असते. त्यामुळे विकृत लैंगिक वर्तन कमी होतं.

तर मग आता जरी हस्तमैथुनाबाबत लोकांना लाज वाटत असेल, ते बोलत नसतील, तरी तुम्ही त्याबाबत लाज वाटून घेऊ नका, तुम्ही हस्तमैथुन करता म्हणून अपराधीपणाची भावना ठेवू नका. खरंतर तुमच्या शरीराला सुरक्षितरित्या अगदी जवळून समजून घेण्याचा हा एक मार्ग आहे.

लेखिका – सुरभी रस्तोगी, Deloitte Consulting, Coca Cola India Inc., GE Capital Europe and Infosys यासारख्या कंपन्यांमध्ये HR professional  म्हणून काम केलं आहे. आता त्या RedWomb  या संकेतस्थळावर columnist आहे.

First published: February 9, 2020, 9:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading