एका वेळी अनेकांशी डेटिंग? आधी जरा हे वाचा...

जेव्हा तुम्ही रोमँटिकली कोणासोबत आकर्षित होता, तेव्हा मेंदूमध्ये तीन सिस्टिम्स कार्यरत होतात.

  • Share this:

मुंबई, 14 फेब्रुवारी : सध्याचं जग मोकळंढाकळं आहे. वेगवान आहे. बरीच माणसं भेटच असतात. अनेकांशी मैत्री होत असते. एखाद्याला अनेक मैत्रिणी असतात. मुलीलाही अनेक मित्र असतात. एखाद्याला एका वेळी दोघी आवडू शकतात. वाटतं दोघींवर प्रेम आहे. पण ही दोन्ही प्रेमं खूप वेगवेगळी असतात. मग अशा वेळी योग्य जोडीदार कसा निवडायचा?

जेव्हा तुम्ही रोमँटिकली कोणासोबत आकर्षित होता, तेव्हा मेंदूमध्ये तीन सिस्टिम्स कार्यरत होतात. पहिली असते आकर्षण, दुसरी असते रोमँटिक प्रेम आणि तिसरी सेक्सची इच्छा. तुम्हाला तीन व्यक्तींबद्दल या वेगवेगळ्या भावना असू शकतात. अनेकदा या तीनही भावना एकाच व्यक्तीबद्दल तुम्हाला वाटत नाहीत. मग अशा वेळी तुमच्यासाठी कुठली भावना महत्त्वाची आहे, हे जाणून घेऊन त्या व्यक्तीची निवड जीवनसाथी म्हणून करता येईल.

तुम्ही शांतपणे असा विचार केलात की तुम्ही अमुक व्यक्तीवर का प्रेम करता आणि रिलेशनशिपमधून तुम्ही काय अपेक्षा ठेवता, तर तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल. जीवनसाथीची निवड सोपी होईल.

केमिस्ट्री हा एक वेगळा प्रकार असतो. सगळ्यांशी ती जुळत नाही. तुम्ही अनेक मुलींना डेटिंग करत असाल तर शांतपणे विचार करा तुम्हाला प्रत्येक मुलीतली कुठली गोष्ट आवडते. तुमचं व्यक्तिमत्त्व तिच्या सान्निध्यात बदलतंय का? तुम्ही किती ओरिजनल असता? जी व्यक्ती तुमच्यातलं सर्वोत्कृष्ट समोर आणते, तुम्हाला आणखी चांगलं बनवते ती व्यक्ती तुमची जीवनसाथी बनायला योग्य असते.

असे निर्णय खूप घाईत घ्यायचे नसतात. तुम्हाला अल्टिमेटम दिला नसेल तर शांतपणे विचार करा. थोडे दिवस डेटिंग बंद करा. मग तुम्ही कुणाला भेटायला कासावीस होता, हे तुमच्या लक्षात येईल आणि उत्तर मिळेल.

शेवटी गट फीलिंगही असतं. निर्णय घेताना अजून काही वर्षांनी तुम्हाला तुमचं आयुष्य कसं पाहायला आवडेल, याचाही विचार करा. शेवटी कुणालाही न निवडण्याचंही स्वातंत्र्य तुम्हाला आहेच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 01:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading