Home /News /lifestyle /

Valentine Week List 2022: आला प्रेमाचा आठवडा! रोज डे ते व्हॅलेंटाईन डे पर्यंत, असं करा खुल्लम खुल्ला प्रेम

Valentine Week List 2022: आला प्रेमाचा आठवडा! रोज डे ते व्हॅलेंटाईन डे पर्यंत, असं करा खुल्लम खुल्ला प्रेम

Valentine Week 2022: उद्यापासून देशभरात व्हॅलेंटाईन वीक सुरू होत आहे. फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हणतात, कारण याच महिन्यात व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. या आठवड्यात जोडपे एकमेकांवर प्रेम व्यक्त करतात. या प्रेम सप्ताहात आपण या लेखात प्रेमाचे 7 दिवस कसे खास बनवायचे हे जाणून घेणार आहोत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 6 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन वीक (Valentine week) उद्यापासून जगभरात सुरू होत आहे, त्याची तयारी सुरू झाली आहे. मग ते गिफ्ट शॉप असो किंवा ऑनलाइन ई-कॉमर्स साइट, प्रत्येकाने सवलतीच्या ऑफर देण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून रसिकांना हा आठवडा चांगला साजरा करता येईल. ज्याप्रमाणे परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची धाकधूक वाढते. त्याचप्रमाणे व्हॅलेंटाइन वीक जवळ आल्यावर प्रेमी युगुलांना काळजी वाटू लागते की, आपल्या खास व्यक्तीला कसं खुश करता येईल आणि प्रत्येक दिवस कसा खास बनवता येईल. तुम्हालाही हा व्हॅलेंटाइन वीक तुमच्या जोडीदारासाठी खास बनवायचा असेल, तर व्हॅलेंटाईन वीक लिस्टसह तो खास दिवस अविस्मरणीय कसा बनवायचा ते जाणून घ्या. रोझ डे, 7 फेब्रुवारी (Rose Day, 7 Feb 2022) या दिवशी जोडपे एकमेकांना लाल गुलाब देऊन त्यांच्या भावना व्यक्त करतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, असे दिसून येते की मुले त्यांच्या जोडीदाराला फुले देतात. पण जर या दिवशी मुलींनीही त्यांच्या जोडीदाराला गुलाब दिले तर विश्वास ठेवा हा दिवस खूप अविस्मरणीय होईल. प्रपोज डे, 8 फेब्रुवारी (Propose Day, 8 Feb 2022) प्रपोज डे म्हणजे व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस. या दिवशी प्रत्येकजण आपल्या आवडीच्या मुलीला किंवा मुलाला प्रपोज करतो. प्रपोज करण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस असल्याचं म्हटलं जातं. या दिवशी जर तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीला प्रपोज करायचे असेल तर तुम्ही त्याला एखाद्या रोमँटिक ठिकाणी प्रपोज करू शकता किंवा तुम्हाला भेटता येत नसेल तर तुम्ही व्हिडीओ कॉलवरही तुमच्या मनातील गोष्ट सांगू शकता. चॉकलेट डे, 9 फेब्रुवारी (Chocolate Day, February 9) व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुमच्या पार्टनरला चॉकलेट देऊन तुम्ही हा दिवस खास बनवू शकता. जर तुम्हाला हा दिवस आणखी खास बनवायचा असेल तर तुम्ही तुमच्या हाताने बनवलेले चॉकलेट देऊ शकता. विश्वास ठेवा तुमच्या जोडीदाराला हे मिळाल्यानंतर खूप आनंद होईल. व्हॅलेंटाईन वीकमध्ये Rose Day ची गोष्ट माहितीय का? कपल्स का पाहतात आतुरतेने वाट? टेडी डे, 10 फेब्रुवारी (Teddy Day, February 10) या दिवशी आपल्या जोडीदाराला टेडी भेट देणे खूप चांगले असू शकते. मुलींना टेडी खूप आवडते. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला टेडी गिफ्ट करत असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही गुलाबी किंवा लाल रंगाचा टेडी गिफ्ट केल्यास त्यांना तो आणखी आवडेल. याचे कारण म्हणजे मुलींना लाल आणि गुलाबी रंग खूप आवडतात. प्रॉमिस डे, 11 फेब्रुवारी (Promiss Day, February 11) व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जोडपी एकमेकांना काही प्रॉमिस करुन ती पूर्ण करतात. तुम्हालाही तुमच्या जोडीदाराला काही वचन द्यायचे असेल तर लक्षात ठेवा की वचन देताना आणि मनापासून बोला, डोळ्यात डोळे घालून समोर बोला. मुलींना असे लोक आवडतात, जे त्यांच्याशी डोळ्यासमोर आत्मविश्वासाने बोलतात. खगोलप्रेमींसाठी पर्वणी! Valentine's Day दिवस आधी आकाशात दिसणार विलोभनीय दृश्य; अजिबात चुकवू नका ही संधी हग डे, 12 फेब्रुवारी (Hug Day, February 12) अलिंगण म्हणजे मिठी मारणे याचे वेगवेगळे अर्थ आहेत. काही लोक एकमेकांना सोडून जाताना मिठी मारतात तर काही लोक मैत्रीत मिठी मारतात. पण व्हॅलेंटाईन वीकमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रेमळ मिठी देऊन तुमचे प्रेम आणखी मजबूत करू शकता. किस डे, 13 फेब्रुवारी (Kiss Day, February 13) हा दिवस किस डे म्हणून साजरा केला जातो, किस डेच्या दिवशी तुमच्या पार्टनरला किस करून तुम्ही त्याला स्पेशल फील करू शकता. व्हॅलेंटाईन डे, 14 फेब्रुवारी (Valentine's Day, February 14) शेवटी 14 फेब्रुवारी हा दिवस येतो, ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे'. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक लंचसाठी जाऊ शकता किंवा लांबच्या राइडवर जाऊ शकता.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Rose, Valentine day, Valentine week

    पुढील बातम्या