कमी खर्चात जोडीदाराला करा इम्प्रेस, Valentine day साठी Dating tips

कमी खर्चात जोडीदाराला करा इम्प्रेस, Valentine day साठी  Dating tips

डेटिंगवर (Dating) जाताना खिशावर लक्ष टाकण्यापेक्षा डोक्याचा वापर करा. यामुळे कमी खर्चात तुमचा जोडीदारही आनंदी होईल.

  • Share this:

मुंबई, 3 फेब्रुवारी : वॅलेन्टाइन डे (Valentine day) जवळ आला आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराला डेटिंगवर घेऊन जायचं आहे, जोडीदारालाला इम्प्रेस करायचं आहे, मात्र तुमचा पॉकेटमनी तितका नाही. Don't worry तुमच्या पॉकेटला परवडेल आणि तुमच्या जोडीदारालाला इम्प्रेस करेल, अशा काही टीप्स आम्ही तुम्हाला देत आहोत.

1) सर्वात आधी म्हणजे डेटिंगचा निर्णय तुम्ही मुद्दाम घेतला आहात, हे तुमच्या जोडीदाराला समजू देऊ नका, तर तुम्हाला डेटिंगवर जायला आवडतं असं दाखवून द्या

2) डेटवर जाताना खिशावर लक्ष टाकण्यापेक्षा डोक्याचा वापर करा. यामुळे कमी खर्चात तुमचा जोडीदारही आनंदी होईल.

3) जोडीदाराला समजून घेण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा. मॉल, हॉटेलऐवजी, बोटिंग, स्केटिंग किंवा फिशिंगचा पर्यायही तुम्ही निवडू शकता.

4) लॉन्ग ड्राईव्ह किंवा लाँग वर जाण्यासही हरकत नाही. यावेळी तुम्ही पाणीपुरी, भेलपुरी खाण्याचा आनंद लुटू शकता

5) मोठ्या आणि महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याऐवजी कमी खर्चात चविष्ट जेवण मिळत असेल, अशी ठिकाणं ट्राय करून बघा.

6) एखाद्या ढाब्यावर चहा-कॉफीचा आस्वाद घेऊ शकता

7) घरीदेखील तुम्ही चमचमीत जेवणाचा प्लॅन करून कॅन्डल लाइट डिनर करू शकता. स्वतच्या हाताने सुंदर असं डेकोरेशन करा, ज्यामुळे जोडीदार इम्प्रेस होईल

8) तुम्हाला दोघांनाही गेम्स आवडत असतील, तर व्हिडिओ गेम, बास्केटबॉल, पतंग उडवणं, स्विमिंग, बॅडमिंटन खेळू शकता

9) चित्रपट पाहायला जाऊ शकता

10) मित्रमैत्रिणींसोबत एक छोटंसं गेट टुगेदर प्लॅन करा, म्हणजे तुम्हाला जोडीदाराचाही अधिक सहवास लाभेल

अन्य बातम्या

8 लाख भारतीयांचे Extra-marital affair;  मुंबई, पुणे, नागपूरकरांचाही समावेश

Live-in relationship मध्ये राहण्याचा विचार, Side effects जरूर वाचा

First published: February 3, 2020, 8:37 PM IST

ताज्या बातम्या