Valentine's Day : 'ही' जोडपी नेहमीच राहतात आनंदी

Valentine's Day : 'ही' जोडपी नेहमीच राहतात आनंदी

एका संशोधनातून हे सिद्ध झालंय की एका गोष्टीमुळे कपल्स नेहमी आनंदात असतात.

  • Share this:

मुंबई, 6 फेब्रुवारी : काही कपल्स नेहमी खूश, आनंदी दिसतात. यामागे काय रहस्य आहे? एका संशोधनातून हे सिद्ध झालंय की एका गोष्टीमुळे कपल्स नेहमी आनंदात असतात.

जे आपल्या जोडीदाराबरोबर नेहमी खेळीमेळीचं नातं ठेवतात, नेहमी विनोद करून हसत राहतात त्यांचं नातं नेहमीच चांगलं राहतं. ज्यांचा पार्टनर नेहमी मजेशीर गप्पा मारतो, ती जोडपी नेहमीच खूश राहतात. इतरांच्या तुलनेनं त्यांचं नातं जास्त मजबूत राहातं. अर्थात, विनोदी बोलणं म्हणजे एकमेकांची उगाचंच थट्टा करणं नव्हे.

ही थट्टामस्करी हलकीफुलकी असावी. दुसरी व्यक्ती दुखावली जाईल, अशी असू नये. तुम्ही तुमची मर्यादा ओलांडली तर नात्यात तणाव येऊ शकतो. तुमचा जोडीदार नाराज होऊ शकतो.

या संशोधनातून असं पुढे आलंय की थट्टा मस्करी केल्यानं जोडप्यांची नाती जास्त गहरी होतात. जास्त रोमँटिक अॅक्शन्स वाढतात. नात्यात कधी दुरावा येत नाही.

अर्थात, नात्यात दर वेळी थट्टामस्करी घातकही ठरू शकते. काही गोष्टी गंभीरपणे बोलाव्या लागतात. घरगुती प्रश्न सोडवताना परिपक्वता दाखवावी लागते. विनोद अति झाला तर तो नात्यासाठी धोका ठरू शकतो.

आता व्हॅलेंटाइन्स डे जवळ येतो. तुमच्या लग्नाला कितीही वर्ष झाली असली तरी त्या दिवशी थोडा रुमानी हो जाए म्हणायला हरकत नाही. तुम्ही तुमच्या प्रेमासाठी वेळ देऊ शकत नसाल, तर सगळंच वाया. यादिवशी बाकी सगळी कामं बाजूला ठेवून आपल्या जोडीदारासाठी पूर्ण दिवस ठेवा. तसा प्लॅन करा.

दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही एक कॅलेंडर तयार करू शकता. त्यात प्रपोझ डे, पहिली डेट, पहिला लाल गुलाब दिला होता तो दिवस अशा तारखा बनवा. हे रोमँटिक कॅलेंडर नक्कीच आवडेल.

First published: February 12, 2019, 7:04 AM IST

ताज्या बातम्या